कांद्याच्या पातीचा झुणका

by Vaishali Chaudhari

कांद्याच्या पातीचा झुणका


प्रस्तावना::

कांद्याची पात ही अत्यंत पौष्टिक असते. बऱ्याच जणांना कांद्याचे पात आवडत नाही पण याप्रमाणे जर तुम्ही झुणका केला तर सहजपणे कोणालाही आवडेल….


साहित्य::

  • एक जुडी कांद्याची पात
  • तीन बारीक हिरव्या मिरच्या
  • सात ते आठ लसूण पाकळ्या
  • एक वाटी बेसन पीठ
  • पाव चमचा हळद
  • पाव चमचा गरम मसाला
  • अर्धा चमचा धने पूड
  • अर्धा चमचा लाल तिखट
  • फोडणीसाठी तेल
  • जिरे मोहरी
  • मीठ
  • कोथिंबीर


कृती::


प्रथम वातीची जोडी स्वच्छ धुऊन घ्या.. पाच कांद्यांसोबत वारी चिरून घ्या कांद्याची पुढचे टोक कट करून घ्या आणि संपूर्ण पात बारीक चिरून घ्या.

लसणाचे काप करून घ्या. मिरचीचे सुद्धा काप करून घ्या. कोथिंबीर बारीक चिरून घ्या. कढईमध्ये फोडणीसाठी तेल गरम करा.

तेल कडकडीत गरम झाले की त्यामध्ये जिरे मोहरी घाला. त्यामध्ये लसणाचे काप मिरचीचे काप घालून परतून घ्या.

मिरच्या तांबूस रंगावर झाले की त्यामध्ये कापलेली कांद्याची पात घाला. आता या कांद्याच्या पातीवर दोन ते तीन मिनिटे झाकण ठेवा.

कांद्याची पात चमच्याने चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पूड अर्धा चमचा तिखट पाव चमचा गरम मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.

कांद्याची पातीचे मिश्रण चांगले परतून घ्या. आता कांद्याची पात आपली शिजलेली आहे. या मिश्रणमध्ये चवीप्रमाणे मीठ घाला.

मीठ आपण आधीच घातलेले आहे कारण झुणक्यामध्ये मीठ सुरुवातीलाच घालावे म्हणजे ते सर्व दूर व्यवस्थित एकत्र होते.

आता त्यामध्ये एक वाटी बेसन पीठ घाला आणि मिश्रण व्यवस्थित खालून वरून परतून घ्या. त्यानंतर पुन्हा दोन मिनिटे झाकण ठेवा.

झाकण काढून आजूबाजूला साधारण एक पळी इतके तेल सोडा म्हणजे झुणका खाली कढईला चीटकणार नाही.

त्यानंतर त्यानंतर कांद्याच्या पातीची भाजीला चांगले चमच्याने परतवून घ्या आता त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घाला आणि एक वाफ येऊ द्या…. आणि गॅस बंद करा..

आता आपली कांद्याच्या पातीचा झुणका तयार झालेला आहे. हा कांद्याच्या पातीचा झुणका पोळी सोबत ज्वारीच्या भाकरी सोबत एकदम अप्रतिम लागतो….

तर तयार झालेला आहे आपला कांद्याच्या पातीचा झुणका…..



टिप्स::

झुणका अशा भाजीमध्ये तेलाचा वापर जास्त करावा लागतो. पण काहींना कमी तेलाचा वापर आवडत असल्यास तुम्हाला हवे त्याप्रमाणे तेल घालू शकतात. फक्त भाजी थोडी वाफत आल्यानंतर आपल्याला पीठ घातल्यानंतर त्यावर एक कडची तेल सोडावे लागते. त्यामुळे झुणका कढईला चीटकणार नाही किंवा लागणार नाही…….


वेळ व परिमाण::


तयारीची वेळ :१० मिनिटे
एकूण वेळ :३०मिनिटे
परिमाण :दोन व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4319

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.