उडीदाच्या डाळीचा दाल तडका

by Vaishali Chaudhari
233 views
The current image has no alternative text. The file name is: Green-and-Red-Colorful-Playful-Blob-Abstract-Vegetable-Illustrative-Healthy-Food-Healthy-Life-Salad-YouTube-Thumbnail-1.png

🥘 १. रेसिपीचं नाव

उडीदाच्या डाळीचा दाल तडका

📸 २. फोटो / फीचर्ड इमेज :

✨ ३. प्रस्तावना
खांदेश भागात उडीदाच्या डाळीचा दाल तडका फार लोकप्रिय आणि पाहूणचारासाठी खास मेजवानीचा मुख्य भाग आहे. ह्या भागातील हॉटेल ,धाब्यावरचा हा अगदी लोकप्रिय असा पदार्थ आहे.

हा खाद्य पदार्थ सर्व ऋतूत बनवतात,

📝 ४. साहित्य (Ingredients

  • अर्धा कप उदीड डाळ,
  • २ चमचा हरबरा डाळ
  • १ कांदा
  • १ टमाटर,
  • कढीपत्ता 5 ते 6 पाने,
  • जिरे,
  • ३ हिरवी मिरची,
  • अर्धा चमचा हळद ,
  • 04 पाकळी लसूण,
  • अर्धा चमचा गरम मसाला,
  • १ चिमटी हिंग,
  • छोटा तुकडा अद्रक/आले,
  • कसूरी मेथी
  • ४ चमचा तेल,
  • अर्धा चमचा तिखट,
  • पाणी,
  • मीठ चवीप्रमाण

🔥 ५. कृती (Steps)

प्रथ‌म उडीदाची काळी डाळ व हरबरा डाळ धुवून घेणे व कुकरमध्ये टाकणे व पाणी घालून चार शिट्या घेणे.

नंतर १ कांदा बारीक चिरून चिरून घेणे

१ टमाटर बारीक बारीक चिरून घ्यावे

आले-लसूणाची पेस्ट करून घेणे.

नंतर कढाईत तेल घालून जीरे फोडणी काढून मग कांदा टमाटर कढीपत्ता घालून परतवा.

नंतर लसूण – आले पेस्ट घालून परतवा

त्यात हळद, मिरची काप, तिखट, गरम मसाला घालून परतवा.

नंतर पातळ असे डाळचे मिश्रण घाला.

त्यात थोडे पाणी घालून मीठ चवीप्रमाणे घाला.

कोथींबीर चिरुन घालणे दोन उकळ्या येवू देणे

व नंतर तेलात जीरे हिंग घालून लसूण तुकडा करून भाजीत तडका मारा

आपला डाल-तडका तयार !

दाल तडका हा तुम्ही फुलक्या सोबत किंवा चपाती सोबत खाऊ शकतात आणि बाजरीच्या भाकरी सोबत ही खाऊ शकतात बर का.
दाल तडका सोबत जीरा राईस ही खूप छान चवीला लागतो.

💡 ६. टिप्स (Cooking Tips)

उडदाच्या दाल तडका म्हटला म्हणजे आपण फिरायला गेल्यानंतर थांबलेल्या ढाब्यावरची एक आठवण. ढाब्यावरच दाल तडका आणि विशेषतः त्यावर बटर घालून केलेला दाल तडका वरील डाळ तडका हा धाब्याच्या प्रकारामध्येच केलेला असून त्यावर तुम्ही फक्त बटरचा तुकडा घ्या अत्यंत रुचकर असा लागेल.तसेच यामध्ये कमी मसाल्याच्या वापरामुळे हा उडदाच्या डाळीचा दाल तडका आरोग्यासाठी अत्यंत चांगला आहे.

🍽️ ७. सर्व्हिंग सुचना (Serving Suggestion)

भाकरी, चपाती उत्तम लागते.

🕒 ८. वेळ व परिमाण

• तयारीची वेळ: १० मिनिटे
• शिजवण्याची वेळ: १५ मिनिटे
• एकूण वेळ: २५ मिनिटे
• परिमाण: २ जणांसाठी

❤️ ९. निष्कर्ष / लेखकाची टिप्पणी

हा पदार्थ आरोग्यदायी, झटपट आणि पारंपरिक चवीचा आहे. आठवड्याच्या शेवटी नक्की करून बघा!

📚 १०. टॅग्स / कीवर्ड्स

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

11642

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.