रवा मोदक किंवा सुजी मोदक
प्रस्तावना:::
रवा मोदक झटपट तयार करण्यासाठी ते कसे तयार करायचे ते आपण आज बघणार आहोत…
साहित्य::
- एक वाटी बारीक रवा किंवा सुजी
- अर्धी वाटी साखर
- अर्धी वाटी पाणी
- ३ चमचे साजूक तूप
- 10 काजू
- 10 बदाम
- 10किसमिस
कृती::
सर्वप्रथम तीन चमचे कढईमध्ये तूप घाला… तू चांगले गरम झाले की त्यामध्ये काजू बदाम आणि किसमिस व्यवस्थित फ्राय करून घ्या आणि ते काढून घ्या…
लागत असल्यास पुन्हा दोन चमचे तूप घाला आणि त्यामध्ये रवा घाला इथे आपण बारीक रव्याचा वापर करणार आहे….
रवा चांगला गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला परतावायचा आहे.. प्रवास सतत ढवळत रहा आता रव्याला गोल्डन रंग आला की गॅस बंद करा…
एका पातेल्यामध्ये अर्धी वाटी साखर घालून त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घाला त्यानंतर त्याला उकळी आल्यानंतर एका तारेचा पाक करा…
पाक तयार झाला की गॅस लगेच बंद करा त्यामध्ये हा रवा घाला रवा घातल्यानंतर आपण जे ड्रायफूट फ्राय करून घेतलेले आहेत किंवा तळून घेतलेले आहेत ते घाला …..
आणि सर्व मिश्रण एकदम व्यवस्थित एकत्र करून घ्या… इथे आपल्याला पाकामध्ये मिश्रण शिजवायचे नाही नाहीतर मोदक कडक होतील…
पाक रव्याच्या मिश्रणामध्ये छान पैकी मुरून जाईल… आता मिश्रण थंड झाले की लगेचच त्याचे मोदकाच्या साच्याला तूप लावून रव्याचे सारण त्यामध्ये घाला….
आणि मोदक तयार करून घ्या आपले रव्याचे मोदक बाप्पासाठी तयार आहे…
चला तर मग तुम्ही करून बघताय ना बाप्पा साठी नैवेद्य रव्याचे मोदक किंवा सुजी मोदक!!!!!
टिप्स::
तुपामध्ये रवा चांगला मंद आचेवर चांगला दहा ते पंधरा मिनिटे परतून घ्यावा… रवा चांगला परतला की आपले मोदक एकदम चवदार आणि खरपूस लागतात….
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ::३० मिनिटे
परिमाण:: ११मोदक
