उकळीचे मोदक

by Vaishali Chaudhari
11 views

उकळीचे मोदक


प्रस्तावना::

उकडीचे मोदक म्हटले की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते परंतु हे कळण्यास अत्यंत कठीण असतात असे सर्व समजतात… पण उकड कशी काढायची ते आपण बघू अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला दोनही पद्धत मी आता सांगणार आहे आणि सोप्या पद्धतीने मोदक आपण तयार करणार आहोत!!!


साहित्य:::

  • एक मोठी वाटी तांदळाची पिठी
  • एक ओला नारळ
  • एक वाटी किसलेला गूळ
  • चार वेलचीनची पूड
  • ५ काजू
  • ५ बदाम चे काप
  • आणि साजूक तूप


कृती:::

सर्वप्रथम ओला नारळ फोडून घ्या. तू सोलून घ्या आणि तो खवणीच्या साह्याने खवून घ्या…

किंवा ओला नारळाचे तुकडे करून किंवा बारीक किस करून मिक्सरमधून फिरवून घ्या म्हणजे एकदम बारीक किस होईल…

एका कढईमध्ये एक ते दीड चमचा तूप घाला आणि त्यामध्ये ओल्या नारळाचा कीस घाला आणि एक वाटी गूळ घाला….

आणि चांगलं गुळ वितळेपर्यंत शिजवून घ्या त्यामध्ये वेलचीची पूड घाला आणि काजू बदाम चे काप घाला आणि मिश्रण घट्ट झाले की गॅस बंद करा….

खोबऱ्याचा मिश्रण तयार झाले आहे… आता सर्वप्रथम पातेल्यामध्ये एक चमचा तूप घाला त्यामध्ये दोन वाट्या पाणी घाला आणि चिमूटभर मीठ घाला ….

आणि पाण्याला उकळ्या आल्यानंतर तांदळाची पिठी घालून लाटण्याच्या साह्याने पीठ घेरून घ्या आणि झाकण ठेवा …..

दहा मिनिटे साधारण मंद आचेवर वाफ येऊ द्या आणि गॅस बंद करा आपली छानशी तांदळाची उकड तयार झालेली आहे…

किंवा मी एक दुसरी पद्धत सुद्धा तुम्हाला सांगणार आहे परातीमध्ये तांदळाची पिठी घाला आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये पातेल्यामध्ये दोन वाट्या पाणी ठेवा….

त्यामध्ये एक चमचा तूप घाला आणि पाणी चांगले उकळून घ्या हे पिठी मध्ये घाला आणि सराट्याच्या साह्याने पीठ सगळ्या पिठी मध्ये मिक्स करा ….

आणि हातात एक पॉलिथिन बॅग घालून त्याचा गोळा मळून घ्या म्हणजे हाताला गरम लागणार नाही गोळा व्यवस्थित मळून घ्या …

आणि चांगला मळल्यानंतर आपल्या तांदळाच्या पारीला चिरा जाणार नाही आणि आपली उकड चांगली तयार होईल….

तांदळाचा गोळा चांगला तयार झाल्यानंतर गोल असा गोळा तयार करून घ्या आणि पुऱ्या तयार करून घ्या ….

आणि हातावर त्याच्या कळा पाडून घ्या आणि त्यामध्ये खोबऱ्याचे मिश्रण भरा आणि ज्याप्रमाणे मोदक आपण वरच्या साईडने वळतो त्याप्रमाणे वळून घ्या….

ही एक पद्धत झाली मोदक तयार करण्याची आपला घडून उकडीचा मोदक तयार झाला आहे ….

त्यानंतर तो आपण चाळणीला तूप लावून खाली पातेल्यामध्ये पाणी ठेवून साधारण दहा मिनिटे वाफवून घेणार आहे मग आपल्या उकडीचा मोदक तयार आहे…..


मोदक तयार करण्याची दुसरी पद्धत:::


मोदकाच्या साच्याला तूप लावून घ्या गोल गोळा तयार करून घ्या तो मोदकाच्या साच्यामध्ये घाला सर्व बाजूंनी तो दाबून घ्या ….

आणि मधील एक्स्ट्रा किंवा जास्तीचा मिश्रणाचा जो गोळा असेल तो काढून घ्या त्यानंतर मध्ये जागा तयार करा आणि त्यामध्ये खोबऱ्याचे सारण भरा…

हा गोळा तयार करण्यासाठी बऱ्याचदा आपण तांदळाच्या उकडीचा गोळा जास्तीचा गोळा बाहेर काढत नाही त्यामुळे मोदकाच्या साच्यातील मोदक यामध्ये सारणाची कमी होते….

आणि तांदळाचे उकड जास्त लागते… परंतु जास्त सारणचे मोदकच चवदार लागतात… त्यानंतर खालच्या बाजूने थोडी तांदळाचे पीठ लावून मोदक बंद करावा….

आपला उकडीचा मोदक एकदम उत्तम तयार होतो आणि सारणही योग्य पद्धतीने भरले जाते… फक्त उकड साच्यामध्ये जी जास्त आहे ती नक्की दाबून बाहेर काढून घ्या….

आपल्या कड्याही खूप छान पडतात आणि आकाराला मोदक सुंदर दिसतो…. त्यावर तुम्ही केसराच्या काड्या लावू शकतात…


आता हा मोदक चाळणीमध्ये तूप लावून एका पातेल्या त पाणी घालून दहा मिनिटे झाकण ठेवून वाफवून घ्या.. त्यावर तूप सोडा…. गरमागरम उकडीचे मोदक तयार आहे….


टिप्स:::

उकड काढताना गरम पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे पाणी गार असल्यास उकडाला लाटताना चिरा जातील… आणि गोळा तयार करताना चांगला मळून घ्या चांगला एकजीव करा म्हणजे मोदक करताना चिरा जाणार नाही..


वेळ व परिमाण::


तयारीची वेळ::२० मिनिट
एकूण वेळ:: ६०मिनिटे
परिमाण::११मोदक

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

13357

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.