पौष्टिक ड्रायफ्रूट मोदक | Dry Fruit Modak Recipe

by Vaishali Chaudhari
41 views

ड्रायफूट मोदक


प्रस्तावना:::

ड्रायफूट मोदक तयार करत असताना तुमच्याकडे जेवढे ड्रायफूट असतील तेवढे तुम्ही वापर करू शकतात…


साहित्य:::

  • एक वाटी काजू
  • एक वाटी बदाम
  • एक मोठी वाटी खोबरा कीस
  • दोन वाटी शिंगाडा पीठ
  • एक वाटी किसमिस
  • एक वाटी पमकीन सीड
  • एक वाटी अक्रोड
  • अर्धी वाटी खारीक पावडर
  • एक वाटी पिठीसाखर
  • एक वाटी साजूक तूप


कृती:::

सर्वप्रथम सर्व ड्रायफ्रूट काजू बदाम अक्रोड त्याची जाडसर अशी पूड तयार करून घ्या…

एक चमचे साजूक तुपामध्ये ड्रायफ्रूट काजू बदाम जाडसर अशी पूड अक्रोड भाजून घ्या……

परतवलेले खारीक पावडर एका ड्रायफ्रूट घातलेल्या बाऊलमध्ये काढा…
खोबरा कीस परतून घ्या… त्यामधला कच्चापणा गॅस बंद करा….

हे केल्यानंतर थोडे ड्रायफूट त्यात वरून गार्निश करण्यासाठी राहू द्या ……बाकीचे एका वाटीत काढून घ्या…. एक चमचा तूप घालून खारीक पावडर सुद्धा परतून घ्या…

त्यानंतर कढईमध्ये चार चमचे साजूक तूप घाला …..

त्यामध्ये दोन वाटी शिंगाळ्याचे पीठ चांगले चार ते पाच मिनिटे तूप सुटेपर्यंत परतवून घ्या… जोपर्यंत शिंगाळा पिठाला तूप सुटत नाही तोपर्यंत ते परतवून घ्या…

त्यानंतर हे मिश्रण एका बाउल मध्ये काढा….. त्यानंतर त्यामध्ये खोबरा कीस काजू, बदाम अक्रोड चे पूड घाला….

नंतर त्यामध्ये किसमिस घाला …. त्यानंतर यामध्ये एक वाटी पिठीसाखर घाला आता याचे मिश्रनाचे गरम गरमच आपल्याला मोदक करून घ्यायचे आहे….

मोदकाच्या साच्याला तूप लावून त्यावर थोडे काजू बदाम पसरवून त्यामध्ये हे मिश्रण व्यवस्थित भरून घ्यायचे आहे…..

मोदकांच्या साच्याला प्रत्येक वेळेस आपल्याला तूप लावायचे आहे… कारण मोदकाचे मिश्रण साच्याला चिकटते….तूप लावल्या मुळे मोदक साच्यातून पटकन निघतो…….

आणि असे सर्व मोदक आपल्याला तयार करून घ्यायचे आहे….

इथे मी लहान आणि मोठा दोन्ही साच्याचा वापर केला आहे….

आपले ड्रायफूट मोदक तयार झाले आहे… आपल्या बापाच्या नैवेद्यासाठी तयार आहे ड्रायफ्रूट मोदक!!!


टिप्स:::

इथे मोदक करताना पिठीसाखरेचा वापर आपण केलेला आहे तुम्हाला गुळाचा वापर करायचा असल्यास त्याच प्रमाणात गुळ घालावा मात्र गुळ घालताना गूळ हा बारीक किसून घ्यावा… म्हणजे मिश्रणाचा चांगला गोळा ही तयार होईल आणि सर्व मिश्रणामध्ये गूळ व्यवस्थित एकत्र होईल…


वेळ आणि परिमाण:::
तयारीची वेळ::३०मिनिटे
एकुण वेळ:: ५०मिनिटे
परिमाण::२१ मोदक

#UkadicheModak #ModakRecipe #EasyModakRecipe #GanpatiRecipe #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #SwaadGharcha

Recipees खालील लिंक्स वर click करून माहिती माहिती मिळवून घ्यावी.

  1. रवा मोदक किंवा सुजी मोदक
  2. मोतीचूर मोदक
  3. ड्रायफूट मोदक
  4. पान मोदक
  5. पनीर मोदक
  6. खुसखुशीत खोबरा मोदक
  7. चॉकलेट खोबरा मोदक
  8. गुलकंद खोबरा मोदक
  9. खोबरा मोदक
  10. पाकाचे काजूचे मोदक
  11. काजूचे मोदक
  12. उकळीचे मोदक
  13. मावा मोदक
  14. चॉकलेट मावा मोदक
  15. मावा गुलकंद मोदक
  16. ओरिओ बिस्कीट मोदक
  17. केसर मावा मोदक
  18. सुजी मोदक प्रकार 2
  19. रवा मोदक किंवा सुजी मोदक प्रकार 1

आपणास हा पोस्ट आवडली असल्यास जास्तीत जास्त share करा

ही रेसिपी करून पाहिल्यावर तुम्हाला कशी वाटली, हे आम्हाला खालील comment मध्ये लिहून नक्की कळवा. तसेच आपण हि ह्याच पद्धतीने भरीत बनविता काय ? आपण कोणत्या पद्धतीने बनविता ते हि कळवा

अशाच पारंपरिक, घरगुती आणि खानदेशी चवीच्या रेसिपीसाठी Swaad GharCha ला भेट देत राहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

5 comments

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

17493

Edtiors' Picks

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.