गुलकंद खोबरा मोदक
गुलकंद खोबरा मोदक
प्रस्तावना::
मोदक ही खूप प्रकारची असतात.. मुलांना गणपतीला नैवेद्य दाखवण्यासाठी रोजच एक नवीन प्रकार हवा असतो त्यासाठी अत्यंत चवदार असा हा मोदक तयार होतो…
साहित्य::
- 100 ग्रॅम खोबरा कीस
- 20 ग्रॅम किंवा दोन चमचे मिल्क पावडर
- 50 ग्रॅम पिठीसाखर
- 50 ग्रॅम गुलकंद
- एक ते दोन थेंब रोज इसेन्स
- गुलाब पाकळ्या
कृती::
सर्वप्रथम आपण घरगुती किस वापरत असल्यास तो मिक्सर मधून एकदम बारीक करून घ्यावा… ताज्या गुलाबाच्या पाकळ्या त्याचे काप करून घ्या…
एका बाऊलमध्ये खोबऱ्याचा कीस त्यानंतर मिल्क पावडर दोन चमचे 50 ग्रॅम पिठीसाखर घालून मिश्रण एकदम व्यवस्थित एकत्र करून घ्या….
त्यानंतर त्यामध्ये 50 ग्रॅम गुलकंद घाला आणि त्याचा गोळा तयार करून घ्या.. आपला गोळा तयार होत नसल्यास तुम्ही अजून 20 ग्रॅम गुलकंदांचा वापर तुम्ही करू शकता…
त्यामध्ये दोन ते तीन थेंब रोज इसेन्स घाला… आणि गोळा व्यवस्थित एकत्र करून घ्या… त्यानंतर मोदकाच्या साच्याला साजूक तूप लावून घ्या…
त्यावर तीन-चार गुलाबाच्या पाकळ्यांचे काप घाला…आणि त्यामध्ये सारण भरा आणि मोदक तयार करा….
आपली सुंदर असे गुलकंद मोदक आता तयार झालेले आहे दिसायला एकदम सुंदर आणि चवीला अप्रतिम चला तर मग एन्जॉय करूया आपण गुलकंद खोबरा मोदक!!!!!
टिप्स:::
मोदक तयार करताना गुलकंद किती घालायचा आपल्या खोबऱ्याच्या मिश्रणाचा गोळा तयार होईल इतपत आपण गुलकंद घालू शकतो….
म्हणजे आपल्याला इथे दुधाचा वापर करण्याची गरज नाही.. दुसरी टीप म्हणजे इथे तुम्ही पिठीसाखरेचा वापर नाही केला तरी चालेल गुलकंदामध्ये साखर आधीच असते पण ज्यांना जास्त गोड आवडत असेल त्यांनी पिठीसाखरेचा वापर नक्की करावा…
वेळ व परिमाण:::
तयारीची वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ::३० मिनिटे
परिमाण::११ मोदक
