कच्च्या केळीची झणझणीत भाजी: उपवासाठी Fast spicy Banana Sabji

by Vaishali Chaudhari
428 views

केळीची भाजी: उपवास

कच्च्या केळीची  झणझणीत भाजी: उपवासाठी Fast spicy Banana Sabji

प्रस्तावना

ही एक सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे

पोषक तत्वे: कच्च्या केळ्यामध्ये व्हिटॅमिन बी 6 आणि पोटॅशियमसारखे महत्त्वाचे जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर असतात. त्यामुळे

आरोग्यदायी:  बटाट्याऐवजी कच्च्या केळ्याचा आहारात खास करून उपवासाच्या दिवशी समावेश करणे फायदेशीर ठरते. 

पचन सुधारते: 
कच्च्या केळ्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, जे पचनासाठी उत्तम आहे.  कच्च्या केळ्यामध्ये फायबर (तंतूमय पदार्थ) मोठ्या प्रमाणात असल्याने पचन सुधारण्यास मदत होते

साहित्य

  • एक फणी केळे (६ केळे)
  • ४ बारीक मिस्ची,
  • १ जाड मिरची,
  • १ चमचा जीरे,
  • भाजलेले शेंगदाणे,
  • तेल,
  • मीठ

कृती

  • कच्ची केळीची भाजी ही उपवासाला केली जाणारी भाजी आहे तर आता आपण कृती पाहूया. कच्ची केळी सर्वप्रथम स्वच्छ धुवून घ्या कारण त्याला चीक असतो…..एका केळ्याचे साधारण दोन दोन तुकडे करा……केळी कापताना कपड्यांना डाग पडतात …काळजीपूर्वक कापावे…
कच्च्या केळीची  झणझणीत भाजी: उपवासाठी Fast spicy Banana Sabji – फोटो 2
  • एका पातेल्यात अर्धे पातेले पाणी घ्या …..त्यामध्ये तुकडे केलेली केळी घाला. कच्ची केळी साधारण नरम होईपर्यंत म्हणजेच दहा मिनिटे झाकण ठेवून वाफवून घ्या.
  • केळी चांगली नरम झाली आहे की नाही हे सुरीच्या साह्याने बघा.म्हणजे सुरी केळीमध्ये टाकून बघा …सुरी अलगद गेली की केळी शिजली ……
  • चांगली नरम झाली असल्यास गॅस बंद करा केळी एका डिशमध्ये काढून घ्या आणि पाणी फेकून द्या. कच्ची केळी सोलून घ्या.
  • कच्च्या केळीचे गोल चकत्यांप्रमाणे कापू शकतात किंवा आपल्याला आवडत असल्यास तर चौकोनी आकारामध्ये कापून घ्या. किंवा वेफर्स किसणी ने चकत्या करू शकतात …..
कच्च्या केळीची  झणझणीत भाजी: उपवासाठी Fast spicy Banana Sabji – फोटो 3
  • जाड मिरची आणि बारीक मिरचीचे ही आपण कापून घ्यावी. गरम तव्यावर मंद आचेवर चांगले खरपूस शेंगदाणे भाजून घ्या.
  • शेंगदाण्याचे साल काढून घ्या. आता शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक असे कूट करून घ्या….यामुळे भाजी खरपूस बनते …
  • एका कढईमध्ये साधारण चार पळ्या तेल घालून त्यामध्ये जिरे फोडणी घाला. त्यामध्ये कापलेली जाड मिरची आणि बारीक मिरचीचे काप घाला चांगले परतवून घ्या.
  • मिरच्या चांगल्या लाल खरपूस झाल्यानंतर त्यामध्ये आपण कापलेल्या केळीचे काप घाला.
  • आणि चांगले खरपूस पाच मिनिटे परतवत राहा. हे मंद आचेवर परतवावे. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला आणि पुन्हा परतून घ्या.
कच्च्या केळीची  झणझणीत भाजी: उपवासाठी Fast spicy Banana Sabji – फोटो 4
  • सर्वात शेवटी आपण त्यामध्ये शेंगदाण्याची कूट घालणार आहोत. आता केळ्याची भाजी चांगली एक मिनिट परतवून घ्या .
  • ती खमंग होईल इतपर्यंत परतावा. केळ्याच्या भाजीमध्ये आपण शेंगदाण्याचे कूट सर्वात शेवटी घातले ……
  • याचे कारण असे की शेंगदाण्याचे कूट जर लवकर घातले तर ते करपून जाईल त्यामुळे भाजी कडसर लागेल.
  • शेंगदाण्याची कूट घातल्यानंतर भाजी जास्त परतून नका. केळ्याची भाजी तयार आहे यावर तुम्ही लिंबू घेऊन खाऊ शकतात …..
  • भाजी अत्यंत रुचकर लागते आणि बनवण्यासही सोपी आहे.

टिप्स

केळाची भाजी वाफवताना केळ्यांचे दोन दोन तुकडे केले किती पटकन वाफते. तसेच आपण कुकरमध्येही हे वाफवू शकतो पण एक किंवा दोनच शिट्या होऊ द्या…..

कारण ते जास्तच नरम होऊ शकतात त्यामुळे भाजीचा गोळा तयार होईल.

म्हणून आपण पातेल्यात शिजवले तर आपल्याला ते सारखे बघता येईल की कितपत नरम हवे जास्त नरम झाल्यास भाजीची चव वेगळी लागते.

कच्ची केळी

कच्च्या केळीची  झणझणीत भाजी: उपवासाठी Fast spicy Banana Sabji – फोटो 5

सर्व्हिंग सुचना

कच्ची केळीची भाजी

🕒 ८. वेळ व परिमाण

• तयारीची वेळ: १० मिनिटे
• शिजवण्याची वेळ: १५ मिनिटे
• एकूण वेळ: २५ मिनिटे
• परिमाण: २ जणांसाठी

❤️ ९. निष्कर्ष / लेखकाची टिप्पणी

हा पदार्थ आरोग्यदायी, झटपट आणि पारंपरिक चवीचा आहे.

📚 १०. टॅग्स / कीवर्ड्स

, #SwaadGharCha, #IndianMeals, #GharKaKhana, #MaharashtrianThali, #MarathiFood, #HomemadeRecipe

कच्च्या केळ्याच्या भाजीचे फायदे:

  • पचन सुधारते: कच्च्या केळ्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, जे पचनासाठी उत्तम आहे. 
  • आरोग्यदायी: बटाट्याऐवजी कच्च्या केळ्याचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते. 

You may also like

Leave a Comment

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.