उपवासासाठी अगदी साधा सोपा असा राजगिऱ्याचा शिरा झटपट होणारा!!!!Rajgeera Shira

by Vaishali Chaudhari
1 views

उपवासासाठी अगदी साधा सोपा असा राजगिऱ्याचा शिरा झटपट होणारा!!!!Rajgeera Shira


रेसिपी नाव(Racipe Name)::


राजगिरा शिरा

रेसिपीचा फोटो (Racipe Photo)::


प्रस्तावना (Introduction)::


आता घटस्थापनेचे उपवास सुरू होतील… अनवले उपवास केले जातात… अनवले म्हणजे मीठ न खाताच म्हणजेच आपल्याला मिठाचा वापर न करता तयार केलेले पदार्थ….. यामध्ये बरेच गोड पदार्थ सुद्धा तयार होतात…

तसेच मीठ न घालता काही पदार्थ आपण तळून सुद्धा खाऊ शकतो…. यामध्ये आपण वेगवेगळ्या कंद मुलांचा शिरा तयार करू शकतो… त्यातलाच आपण एक प्रकार पाहणार आहे आपण गोड म्हणजे राजगिऱ्याचा शिरा…. हा शिरा पचनासाठी सुद्धा हलका असतो आणि पटकनही पचतो….


साहित्य: (Ingridident)::

  • एक मोठी वाटी राजगिरा
  • अर्धी वाटी दूध
  • पाव वाटी किसलेला गूळ किवा साखर
  • चार ते पाच बदाम
  • चार ते पाच काजू
  • चार ते पाच किसमिस
  • दोन ते तीन चमचे साजूक तूप


शिरा बनवण्याची कृती (Preparation of Rajgeera Shira)::


राजगिऱ्याचा शिरा बनवला हा एकदम सोपा आहे तो इतका झटपट तयार होतो की तुम्हाला बाहेरून काही आणायची गरज नाही…..

तुम्ही रोजही खाल्ला तर तो आरोग्यासाठी चांगला असतो आणि लहान मुलांना तर तो अत्यंत आवडतो…..

कारण हा लहान मुलांच्या पत्नीसाठी एकदा हलका असतो…..प्रथम आपल्या घरामध्ये राजगिरा असल्यास कढई गरम करून त्यामध्ये राजगिरा फोडून घ्या….

आणि त्यातील आकर सुद्धा काढून घ्या… किंवा आता रेडीमेड राजगिऱ्याच्या फोडलेल्या लाह्या मिळतात त्या सुद्धा तुम्ही शिऱ्यासाठी वापरू शकतात…

राजगिराचा शिरा बनवण्यासाठी गुळ पाव वाटी किसून घ्या…

तसेच काजू आणि बदामचे तुकडे किवा बारीक कप करून घ्या …..

सर्वप्रथम आपण एका पातेल्यामध्ये अर्धी वाटी पाणी घेऊन त्यात हा वेळ विरघळून घेऊ पाणी गरम करून त्यात गूळ घालून गुळाचे पाणी तयार करून घ्या…,.

नंतर हे गुळाचे पाणी गाळून घ्या….. कढईमध्ये साजूक तूप गरम करून घ्या…. त्यामध्ये काजू-बदामाचे काप आणि मनुका घाला….

काजू बदाम आणि मनुका चांगल्या परतल्या की मग त्यामध्ये राजगिरा झाला आणि तो चांगला परतवून घ्या…..

त्यानंतर त्यामध्ये तयार केलेले गुळाचे पाणी घाला आणि अर्धी वाटी तूप घाला… आता हे मिश्रण चांगले गोळा होईपर्यंत शिजू द्या…

राजगिरा लगेचच शिजतो…. त्यानंतर चिरायचा गॅस बंद करा आपल्या शिरा लगेचच तयार होईल… बंद करा आणि अजून वरून काजू-बदामाचे काप घालून आपल्या गरमागरम राजगिऱ्याचा शिरा तयार झालेला आहे…..

शिरा करत असताना मी ते गुळाचा वापर केलेला आहे तुम्हाला गुळ आवडत नसल्यास तुम्ही साखर घातली तरी चालेल जर तुम्ही साखर वापरत असल्यास पाणी घालायची गरज नाही त्या ऐवजी तुम्ही दीड वाटी या प्रमाणामध्ये दूधच घालू शकतात….

साखर घालताना ज्यावेळेस आपण राजगिरा घालतो लगेचच साखर घाला आणि त्यामध्ये दूध घाला आणि छान गोळा होईपर्यंत तयार होऊ द्या आपला राजगिऱ्याचा शिरा तयार होईल…..


टिप्स::Tips::


शिरा तयार करताना राजगिऱ्याच्या लाह्यांचा तुम्ही वापर करायचा…. पिठाचा वापर करू नये कारण पिठाचा शिरा हा चिकट लागतो त्यामुळे फोडलेल्या लाह्यांचा शिरा हा रवेदार आणि चवीला सुरूस लागतो….


वेळ आणि परिमाण (Time and Quantity)::


तयारीची वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ:: १५मिनिटे
परिमाण:: १व्यक्तींसाठी


टॅग्स आणि कीवर्ड (Tags/ Keyword)::

, #SwaadGharCha, #IndianRecipes, #HomemadeFood, #EasyCooking, #MarathiFood, #HomemadeRecipe

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

16058

Edtiors' Picks

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.