उपवासाची जाळीदार अशी खरपूस ऐळनी!!! Fast Chila or Dosa
प्रस्तावना/ Introduction;;;
उपवासासाठी आपण वेगवेगळे पदार्थ तयार करत असते…. साबुदाणा खाऊन खाऊन कंटाळा आला असतो त्यामुळे आपण अशा वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करूया…. आज आपण साधी सोपी आणि कमी तेलकट होणारी आणि खरपूस जाळीदार अशी केळीचे पीठ साबुदाण्याचे पीठ आणि भगर चे पीठ एकत्र करून आपण खेळणी तयार करणार आहे…
.
साहित्य/ Ingridident:::

- एक मोठी वाटी केळीचे पीठ
- अर्धी वाटी उपवास भाजणी पीठ
- एक मोठा बटाटा
- एक मोठी जाड हिरवी मिरची
- एक चमचा जिरे
- एक चमचा सुकलेल्या मिरच्यांची तिखट
- तेल
- एक चमचा मीठ
- अर्धी वाटी शेंगदाण्याचे कूट
कृती/Procedure:::
सर्वप्रथम शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्या त्याची साल काढून घ्या आणि त्याची बारीक असे कूट तयार करून घ्या…..
त्यानंतर बटाटा सोलून घ्या आणि त्याचा किस तयार करून घ्या मिरचीचे बारीक असे काप तयार करून घ्या….

एका मोठ्या पातेल्यामध्ये सर्वप्रथम किसलेला बटाट्याचा कीस घाला त्यावर मिरचीचे काप घाला त्यावर एक चमचा सुकलेल्या मिरच्यांची तिखट घाला आणि एक चमचा इतके मीठ घाला….

आता हे मिश्रण व्यवस्थित एक एकत्र करून घ्या त्यानंतर त्यामध्ये एक ग्लास इतके पाणी घाला…..
पाणी घातल्यानंतर मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या…..
त्यानंतर त्यामध्ये केळीचे पीठ घाला त्यानंतर उपवासाच्या भाजणीचे पीठ घाला आणि शेंगदाण्याचे कूट सुद्धा घाला…. हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या त्यामध्ये कुठल्याही गुठळ्या होऊ देऊ नका…..

अगदी स्मूथ असे बॅटर तयार करून घ्या….
ज्याप्रमाणे डोस्यांचे बेटर असते त्याप्रमाणे आपल्याला हे मिश्रण तयार करायचे आहे…..

मिश्रण घट्ट वाटत असल्यास अजून त्यामध्ये अर्धा ग्लास इतके पाणी घाला आणि मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्या…..
आता आपले ऐळणी मिश्रण तयार झालेले आहे……
छान असे बेटर तयार झाल्यानंतर आपण दोषा तव्यावर किंवा पॅनमध्ये तेल लावून घ्या आणि ज्याप्रमाणे आपण डोसा पसरवतो त्याचप्रमाणे या बॅटरचे सुद्धा डोसा प्रमाणे घाला म्हणजे आपली छान गोल अशी ऐळणी तयार होईल….

दोघ बाजूने तिला छान शेकून घ्या त्यावर चमच्याच्या साह्याने तेल सोडा आणि दोघं बाजूने चांगली भाजली की आपली उपवासाची ऐळणी तयार झालेली आहे…..

त्या येळणीला छान अशी जाळी पडलेली आहे जाळी पडल्यानंतर ती अगदी डोसा प्रमाणे मऊसर लागते आणि खमंग सुद्धा तयार होते….. यासोबत आपण उपवासाची चटणी खाऊ शकतो आणि उपवासाची कढी सुद्धा घेऊ शकतो…..

उपवासाच्या कढीची आणि चटणीची रेसिपी पहिले आपल्या वेबसाईटवर दाखवलेलीच आहे….
लिंक खाली दिलेली आहे….
तर आज एन्जॉय करूया!!!! उपवासाची कुरकुरीत अशी ऐळणी
टिप्स Tips:::
हे पीठ भिजवत असताना आपण इथे केळीच्या पिठाचा वापर केलेला आहे तुमच्याकडे केळाचे पीठ नसल्यास तुम्ही फक्त भाजणीच्या पिठाचा वापर सुद्धा करू शकतात….
आणि मी पूर्वी भाजणीचे पीठ तयार करून ठेवलेले होते त्याचा वापर केलेला आहे भाजणीचे पीठ कसे तयार करायचे मी तुम्हाला सांगेलच एक वाटी साबुदाणा एक वाटी भगर हे मिश्रण भाजून त्यामध्ये जिरे भाजून बारीक असे पीठ करून घ्यावे हे झाले आपले भाजणीचे पीठ तयार….
वेळ व परिमाण/Times and Quantity:::
तयारीची वेळ:: २०मिनिटे
एकूण वेळ::५० मिनिटे
परिमाण:::१५ ऐळनी
टॅग्स Tags:::
#उपवासाचीऐळनी #जाळीदारऐळनी #उपवासाचाडोसा #उपवासाचाचिला #खरपूसडोसा #उपवासाचीरेसिपी #उपवासाचेपदार्थ #उपवासाचानाश्ता #मराठीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #SwaadGharcha #FastingChila #FastingDosa #UpvasRecipe #UpvasDosa #VratRecipe #CrispyDosa #NetDosa #IndianFood #FastingFood
उपवास चटणी

DalBatiRecipe DesiKhandeshi DesiKhandeshiZaiqa Diwali Faral Diwali Sweets easy homemade recipe GavrooranFood Homemade Flour homemade recipe Homemade Sweets Indian Snacks Indian Sweets Indian Traditional Sweets Indian Vegetarian Recipes JalgaonFood KalnyachiBhakri khandesh-special KhandeshiFlavors KhandeshiFood KhandeshiRecipes KhandeshiShevBhaji KhandeshiVangyacheBharit KhandeshiVaranBatti KhandeshiZanazanit KhandeshiZatpat KhandeshSpecial Maharashtrian food Maharashtrian Recipe MaharashtrianRecipe Maharashtrian Recipes MaharashtrianRecipes MaharashtrianThali Marathi recipe Marathi Recipes MarathiSwayampak ShevBhaji Swaad GharCha sweet Traditional Diwali Recipes Traditional Indian Sweets TraditionalMarathiFood VaranBatti {mar} recipe घरगुती रेसिपी मराठी रेसिपी
-
उपवासाची जाळीदार अशी खरपूस ऐळनी!!! Fast Chila or Dosa

📅 23 Nov 2026👁 5 वेळा पाहिले 💬 WhatsApp वर शेअर करा 🔗 लिंक कॉपी ♡ सेव्ह उपवासाची जाळीदार अशी खरपूस ऐळनी!!! Fast Chila or Dosa प्रस्तावना/ Introduction;;; उपवासासाठी आपण वेगवेगळे पदार्थ तयार करत असते…. साबुदाणा खाऊन खाऊन कंटाळा आला असतो त्यामुळे आपण अशा वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करूया…. आज आपण साधी सोपी आणि कमी तेलकट…





