उपवासाचा डोसा

by Vaishali Chaudhari
11 views

उपवासाचा डोसा


प्रस्तावना:::

आपण नेहमीचे डोसे खातो त्याप्रमाणेच हे उपवासाचे डोसे सुद्धा तयार होतात अगदी चव एकदम छान लागते आणि त्यासोबत असणारी शेंगदाण्याची चटणी झणझणीत अशी शिवाय त्यासोबत आपण बटाट्याची भाजी सुद्धा करू शकतो…


साहित्य::::

  • एक वाटी वरईचे तांदूळ
  • अर्धी वाटी साबुदाणा
  • अर्धी वाटी दही
  • एक चमचा मीठ
  • पाव चमचा खायचा सोडा
  • अर्धा लिंबू
  • आणि तेल


कृती:::

पाच ते सहा तास आधी वरईचे तांदूळ आणि साबुदाणा एका पातेल्यामध्ये धुऊन घ्या आणि एक ग्लास पाण्यामध्ये तो भिजत घाला साधारण पाच ते सहा तास आपल्याला तो भिजत घालायचा आहे…

पाच ते सहा तास झाल्यानंतर त्यावरील पाणी काढून घ्या आणि मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी पेस्ट करा….

शेवटच्या मिश्रणामध्ये पेस्ट करताना त्यामध्ये दही चवीप्रमाणे मीठ घाला आणि सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या….

सर्व मिश्रण एकत्र केल्यानंतर त्यामध्ये वरती सोडा घाला आणि अर्धा लिंबू पिळा.. त्यामुळे लिंबूच्या रसामुळे सोडा ऍक्टिव्हेट होईल….

आणि हे सर्व हळूच सर्व मिश्रणामध्ये एकत्र करा…

(इथे तर तुम्हाला सोड्याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही एक हिरवी इनो ची पुडी वापरू शकतात त्यामध्ये तुम्हाला लिंबू घालायची आवश्यकता पडणार नाही… इनो घालताना इनो ची अर्धी पुडी घाला त्यावर एक चमचा इतके पाणी घाला आणि मग ते मिश्रणामध्ये एकत्र करा म्हणजे आणि डोशाचे बेटर जाळीदार होईल…)

त्यामुळे डोशाचे जे बॅटर आहे ते जाळीदार बनेल त्यामुळे आपला डोसा जाळीदार होईल … आता ही दोन मिश्रण साधारण दोन तास असेच ठेवून द्या त्यानंतर त्याचे डोसे बनवा…

डोसा तव्याला तेल लावून घ्या आणि त्यावर ज्याप्रमाणे आपण साधा डोसा पसरवतो त्याप्रमाणे वरईचा डोसा सुद्धा घाला…

हा डोसा अगदी अलगद निघतो आजूबाजूंनी तेल सोडून डोसा दोघ बाजूनी शेकून घ्या… अगदी सुंदर जाळीदार डोसा तयार होईल…

डोसा अत्यंत जाळीदार असा बनेल आणि खरपूस आणि खमंग बनेल…. आता या डोस्यासोबत आपण चटणी किंवा बटाट्याची भाजी खाऊ शकतो….

बटाट्याची भाजी मी माझ्या मागच्या रेसिपींमध्ये दाखवलेलीच आहे कारण यामध्ये आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट वापरता येणार नाही बिना अद्रक लसणाची पेस्ट वापरता तयार केलेली भाजी मी दाखवलेली आहे….

आता आपले गरमागरम जाळीदार डोसे तयार झालेले आहे तर आपण एन्जॉय करूया उपवासाचे डोसे!!!!


टिप्स:::

डोसे तयार करताना जे वरई प्रमाण दिलेले आहेत त्याचप्रमाणे प्रमाण घ्यावे. एक वाटी वरई साठी अर्धी वाटी साबुदाणा इतकाच वापरावा नाही तर साबुदाण्याचे प्रमाण जास्त झाल्यास डोसे चिकट होतील….


वेळ व परिमाण:::


तयारीची वेळ ::३०मिनिटे
एकूण वेळ::: ६०मिनिटे
परिमाण:::२ व्यक्तीसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

10995

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.