कांद्याच्या पातीचा भूगरा
कांद्याच्या पातीचा वापर आपण फक्त भरतातच नाही तर चायनीज मध्ये सुद्धा करतो किंवा आपण त्याच्या झुणका बनवतो…
त्यानंतर भूकला सुद्धा बनवू शकतो जेणेकरून त्याच्यासोबत पोळी किंवा भाकरी खायची ही गरज पडणार नाही आणि नाश्त्याला सोपा पदार्थ तयार होईल….
साहित्य:::

- पाव किलो कांद्याची पात
- सात ते आठ लसूण पाकळ्या
- कोथिंबीर
- एक वाटी ज्वारीचे पीठ
- पाव चमचा हळद
- पाव चमचा धनापूर
- पाव चमचा गरम मसाला
- अर्धा चमचा तिखट
- चवीप्रमाणे मीठ
- फोडणीसाठी तेल
- जिरे मोहरी
कृती:::
सर्वप्रथम कांद्याची पात स्वच्छ धुऊन घ्या… कांद्याची पात बारीक चिरून घ्या… कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घ्या…

लसणाचे काप करून घ्या. कढईमध्ये तेल कडकडीत गरम करा त्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी लसणाचे काप परतवून घ्या..

लसणाच्या पाकळ्यांचा तांबूस रंग आला की मग त्यामध्ये कांद्याची पात घाला आणि व्यवस्थित चांगली परतून घ्या…

त्यानंतर पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धणापूड अर्धा चमचा तिखट घालून व्यवस्थित परतवून घ्या त्यानंतर त्यामध्ये ज्वारीचे पीठ घाला…
त्यानंतर व्यवस्थित परतून घ्या… ज्वारीचे पीठ घातल्यानंतर मिश्रण कोरडे होईल त्यावर दोन ते तीन हातात पाणी घेऊन शिपके मारा….

म्हणजे भूगरा एकदम कोरडा सर होणार नाही… तुम्हाला भूगरा एकदम खोडा वाटत असल्यास थोडे एक पळी के तेल सोडा.

आजूबाजूंनी तेल सोडा… त्यावर झाकण ठेवून पाच ते सात मिनिटे चांगले वाफवून घ्या… त्यानंतर त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घाला
.. यामध्ये आपण बेसनाचा वापर केलेला नाही पण जर तुम्हाला बेसन आवडत असल्यास तुम्ही साधारण एक ते दीड चमचा बेसन तुम्ही घालू शकता….
त्यानंतर तुम्ही पाच मिनिटे मोगरा वाफवून घ्या कारण ज्वारीचे पीठ कच्चे लागणार नाही…. आपल्याला हे भाकरी सोबत खायची गरज नाही किंवा पोळी सोबतही खायची गरज नाही…
त्यासाठी आपण इथे ज्वारीच्या पिठाचा वापर केलेला आहे आणि ज्याप्रमाणे आपण पोहे खातो त्याप्रमाणे यावर लिंबू पिळून आपण भूगरा खाऊ शकतो…..

हा तुम्ही नाश्त्याला सुद्धा तयार करू शकतात किंवा एखाद्या भाजीसोबत नुसता खाण्यासाठी सुद्धा तयार करू शकतात गरमागरम भूगरा तयार आहे…

वरून तुम्ही बारीक शेव घेऊन सुद्धा खाऊ शकतात…. हा गरमागरम खा म्हणजे एकदम चवदार लागेल….
टिप्स:::
भूगरा करताना इथे ज्वारीचा पिठाचा वापर केलेला आहे तुम्ही इथे थोडा बेसनाचाही वापर करू शकतात अर्धी वाटी ज्वारीचे पीठ अर्धी वाटी बेसनाचे पीठ असा वापर करू शकतात….
वेळ आणि परिमाण:::
तयारीची वेळ:१० मिनिटे
एकूण वेळ:३० मिनिटे
परिमाण:१ व्यक्तीसाठी
आपणास हा पोस्ट आवडली असल्यास जास्तीत जास्त share करा
ही रेसिपी करून पाहिल्यावर तुम्हाला कशी वाटली, हे आम्हाला खालील comment मध्ये लिहून नक्की कळवा. तसेच आपण हि ह्याच पद्धतीने भरीत बनविता काय ? आपण कोणत्या पद्धतीने बनविता ते हि कळवा
अशाच पारंपरिक, घरगुती आणि खानदेशी चवीच्या रेसिपीसाठी Swaad GharCha ला भेट देत राहा.
- आईसक्रीम
- इतर
- ईतर
- उपवास
- उपवास पापड
- उपवास विशेष
- ऋतु नुसार
- किलबिल
- केक
- कैरी लोणचे
- कोजागिरी
- खान्देश विशेष
- गणेश चतुर्थी
- गोड
- गोडवा
- चटणी-कोशिबीर
- चटर पटर
- चायनीज
- झटपट (फास्ट फूड)
- झणझणीत-मसालेदार
- तांबडा रस्सा
- दिवाळी फराळ
- नानकटाई
- न्याहरी
- पंजाबी
- पराठा / भाकरी
- पापड
- पेय
- प्रादेशिक
- बर्फी
- बेकरी
- मकरसंक्राती
- मसालेदार
- महाराष्ट्रीयन
- मुंबई स्पेशल
- रस्सा भाजी
- लस्सी
- लाडू
- लिंबू लोणचे
- लोणचे
- वर्षभर साठवणूक चटपटीत
- शिरा
- शेक
- सण विशेष
- सरबत
- सुकी भाजी
- सूप
- हिरवा रस्सा
- होळी

Leave a Reply