कटोल्यांची भाजी (कटूर्ले/कटेले)

by Vaishali Chaudhari
147 views

कटोल्यांची भाजी (कटूर्ले/कटेले)


प्रस्तावना:::

कटोल्यांची भाजी (कटूर्ले/कटेले) – फोटो 2

कटेले ही पावसाळ्यात येणारी रानभाजी आहे… ही भाजी अत्यंत दुर्मिळ असते त्यामुळे ती सहजासहजी उपलब्ध होत नाही पण पावसाळ्यामध्ये शेतकरी बांधव ही भाजी आवर्जून विकण्यासाठी आणतात… ही भाजी एक ते दोन वेळा नक्की खावी यामध्ये खूप प्रकारचे विटामिन्स असतात…


साहित्य:::

कटोल्यांची भाजी (कटूर्ले/कटेले) – फोटो 3
  • अर्धा किलो कटेले
  • पाच हिरव्या मिरच्या जाड
  • आठ ते दहा लसूण पाकळ्या
  • पाव चमचा हळद
  • पाव चमचा धनापुर
  • पाव चमचा गरम मसाला
  • अर्धा चमचा जाड भरड तिखट
  • साधारण दोन ते तीन मोठे चमचे शेंगदाण्याचे कूट
  • फोडणीसाठी तेल
  • जिरे मोहरी
  • कोथिंबीर


कृती:::

सर्वप्रथम कटेली छान धुवून घ्या त्याचे काप करून घ्या… कटेले कापण्यासाठी भरपूर वेळ लागतो…. त्यानंतर कोथिंबीर चिरून घ्या मिरचीचे काप करून घ्या आणि नंतर लसणाची सुद्धा काप करून घ्या….

कटोल्यांची भाजी (कटूर्ले/कटेले) – फोटो 4

कढईमध्ये तीन ते चार पोळ्या तीळ घालून कडकडीत गरम करा…. त्यामध्ये जिरे मोहरी फोडणी घाला …

कटोल्यांची भाजी (कटूर्ले/कटेले) – फोटो 5

त्यानंतर लसणाची काप आणि मिरचीचे काप व्यवस्थित परतून घ्या…… त्यानंतर कटेले घाला आणि व्यवस्थित भाजी परतून घ्या…

कटोल्यांची भाजी (कटूर्ले/कटेले) – फोटो 6

त्यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा धणापूड गरम मसाला पाव चमचा आणि अर्धा चमचा इतके जाड भरडे मिरचीचे तिखट घालून भाजी व्यवस्थित परतून घ्या…

त्यानंतर पाच ते सात मिनिटे आपल्याला झाकण ठेवून भाजी चांगली वाफवून घ्यायची आहे…. त्यानंतर अधून मधून भाजी उघडून एकत्र घ्यायची आहे….

कटोल्यांची भाजी (कटूर्ले/कटेले) – फोटो 7

त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घाला तसेच दोन चमचे शेंगदाण्याचे कूट घाला…

(शेंगदाण्याचे कूट करताना शेंगदाणे भाजून घ्या त्याची साल काढून त्याचे जाडभर शेंगदाण्याचे कूट तयार करून ठेवा)

कटोल्यांची भाजी (कटूर्ले/कटेले) – फोटो 8

त्यानंतर आपल्याला पुन्हा पाच ते सात मिनिटे भाजी चांगली वाफवून घ्यायची आहे… आता आपली भाजी चांगली शिकलेली असेल त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घाला …..

आणि ही भाजी तुम्ही पोळी सोबत किंवा भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकतात ज्वारीच्या भाकरी सोबत ही भाजी खाऊ शकतात आरोग्यदायी अशी कटुल्यांची भाजी!!!!

कटोल्यांची भाजी (कटूर्ले/कटेले) – फोटो 9


टिप्स:::

कटोल्यांची भाजी (कटूर्ले/कटेले) – फोटो 10

भाजी शिजवत असताना मीठ सर्वात शेवटी घालावे कारण भाजी शिजण्यास वेळ लागतो मीठ जर आधीच घातले तर भाजी लवकर शिजणार नाही…


वेळ व परिमाण:::


तयारीची वेळ: २०मिनिटे
एकूण वेळ:४० मिनिटे
परिमाण:: ३ व्यक्तीसाठी

  1. चिवय च्या भाजीचे फुणके (भेणके)
  2. वरण बट्टी https://swaadgharcha.com/batti/ 
  3. घोटलेली वांग्याची भाजी https://swaadgharcha.com/ghotleli-vange-bhaji/ 
  4. वांग्याचे भरीत https://swaadgharcha.com/bharit-vange/
  5. शेव-भाजी (रस्सा) https://swaadgharcha.com/shev-bhaji/

आपणास हा पोस्ट आवडली असल्यास जास्तीत जास्त share करा

ही रेसिपी करून पाहिल्यावर तुम्हाला कशी वाटली, हे आम्हाला खालील comment मध्ये लिहून नक्की कळवा. तसेच आपण हि ह्याच पद्धतीने भरीत बनविता काय ? आपण कोणत्या पद्धतीने बनविता ते हि कळवा

अशाच पारंपरिक, घरगुती आणि खानदेशी चवीच्या रेसिपीसाठी Swaad GharCha ला भेट देत राहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

Leave a Comment

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.