गोल गोल गुलगुले (आषाढ महिना स्पेशल आखाड गोड असे गुलगुले)

by Vaishali Chaudhari
10 views

गोल गोल गुलगुले

आषाढ महिना स्पेशल आखाड गोड असे गुलगुले


प्रस्तावना::

चला आषाढ महिना आला आता आखाड्याला सुरुवात केली पाहिजे…. आखाडा मध्ये गोड म्हणून गुलगुले जे लहानापासून मोठ्यापर्यंत आवडतात…. हे सर्वच जण आवडीने खातात….. तिखट तिखट वड्यांसोबत गोड असे गुलगुले तर हवे…..


साहित्य:::

  • पाव किलो गव्हाचे पीठ
  • एक वाटी गोड दही ५० ग्रॅम
  • एक वाटी गूळ (१५०ग्रॅम)
  • एक चमचा तीळ
  • दोन चमचे साजूक तूप
  • पाणी
  • तळण्यासाठी तेल
  • मीठ


कृती:::

सर्वप्रथम गुळ घेऊन त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घ्या… त्यात गुळ विरघळून घ्या… गुळाचे पाणी गाळून घ्या….त्यामध्ये दही फेटून घ्या…..

त्यामध्ये गव्हाचे पीठ चांगले एकत्र करून घ्या …. रवण जवळ पातळ वाटत असल्यास तुम्ही थोडे अजून गव्हाचे पीठ घालून शकतात…

हे पीठ घट्टसरच हवे एकदम पातळ नको कारण आपल्याला त्याचा गोळा करून गुलगुला थापायचा आहे….

गव्हाचे पीठ व्यवस्थित एकत्र केल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर मीठ घाला आणि साजूक तुपाचे दोन चमचे घाला आणि व्यवस्थित फेटून घ्या….

यामध्ये एक चमचा तीळ घाला…हे रवण साधारण दोन ते तीन तास चांगले मुरू द्या….. आणि त्यानंतर हाताला थोडे पाणी लावून त्यावर गोळा तयार करून गोळा थापून घ्या…..

आणि नंतर तेलामध्ये तळा दोघ बाजूनी तांबूस रंगावर तळून घ्या…. गुलगुला अगदी गोल आणि छान तुडुंब फुगतात…. गुलगुला तळल्यानंतर तिळ ची चव अगदी छान लागेल…


टिप्स:::

आपण रवण भिजवताना आपण दही चा वापर केलेला आहे… त्यामुळे गुलगुला एकदम नरम होईल…. आणि गुलगुला चांगला फुगेल..,


वेळ आणि परिमाण::


तयारीची वेळ:: भिजण्यासाठी २तास
एकूण वेळ:: तळण्यास २०मिनिटे
परिमाण:: ३व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

10778

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.