मराठी फूड रेसिपी ब्लॉग — स्टँडर्ड फॉरमॅट
🥘 १. रेसिपीचं नाव
दालमूठ
📸 २. फोटो / फीचर्ड इमेज : रेसिपीचा एक सुंदर, नैसर्गिक फोटो —

✨३. प्रस्तावना(Introduction)
थोडक्यात त्या पदार्थाबद्दल माहिती — हा खाद्य पदार्थ सर्व ऋतूत बनवतात,चला सण आला दिवाळी आली ….वेगवेगळ्या खमंग आंबट गोड तिखट पदार्थ फराळा ची बनवण्याची वेळ झाली….काय मग काय बनवताय शेव तिखट शेव चिवडा का दालमूठ!!!!!!!
चला तर मग तुम्ही काय बनवताय मी तर आज डाळमुठ बनवणार आहे …..तिखट आणि चटपटीत अशी……
हि दालमूठ मी चिवड्यासाठी तसेच लहान मुलांना आवडणारी पटकन चावली जाणारी अशी खमंग पण !!!!!!
📝 ४. साहित्य (Ingredients
१वटीअख्खे मसूर,
काळे मीठ,
तेल,
हिंग,
निखट
पाणी,
मीठ चवीप्रमाणे
🔥 ५. कृती (Steps)
१ वाटी अख्ख्ये मसूर 6 तास भिजत टाकून ठेवावे. सकाळी ते चाळणीत काढावे पाणी निघाल्यानंतर कॉटन कपड्यावर वाळत घालावे.
नंतर वरून अख्ख्ये मसूर कोरडे झाले का ते बघावे म्हणजे २० ते २५ मिनिटे लागतात त्यातील पाणी निघण्यासाठी वरून कोरडे हवे……
आतून तर ते ओलेच राहतील …. एका कढाईन तळणासाठी तेल गरम करावे ….
मग चिवडा तळायच्या चाळणीत सुकलेले मसूर खरपूस मंद आचेवर साधारण ३ ते ४ मिनिटे होईपर्यंत तळा…..
नंतर चाळणी वर घ्या सर्व तेल निघाल्यानंतर एका पेपर वर घाला …..आता छान काले मीठ ,तिखट, साधे मीठ, हिंग घालून एकत्र करा………
हे सर्व मसाले तुमच्या आवडीनुसार घालावे यात तुम्ही चाट मसाला तसेच आमचूर पावडर घालू शकतात……..
…… दालमूठ तयार आहे…..
हि दालमूठ सर्व लहान मुलांना खूपच आवडते…..या दालमूठ मध्ये तुम्ही बारीक शेव घालून खाऊ शकतात ….तसेच चिवड्यात एकत्र करू शकतो …..
आणि झटपट तयार होते….अगदी हलवाई style……
(सर्व साहित्य मेझरींग कप व बाकी स्पून ने मेझर केलेले आहे.इथे मी एक वाटीच प्रमाण घेतलेले आहे तुमच्या घरात किती मेंबर्स आहेत….
त्याप्रमाणे तुम्ही एक किलो डाळ ही भिजत घालून मसुरीची डाळ बनवू शकतात. मसूर ही लहान मुलांना अत्यंत आवडते त्यामध्ये पौष्टिकपणा असतो…..
करण लहान मुले मसुरीची भाजी खात नाहीत. ही तळलेली मसूर ची डाळ लहान मुलांना अत्यंत आवडते आणि ते आवडीने खातात.)

💡 ६. टिप्स (Cooking Tips)
या दालमोटमध्ये लहान मुलांना खायला देताना त्यामध्ये बारीक शेव एकत्र करून द्यावेत लहान मुलांना दिसायला छान तसेच चवीला छान लागल्यामुळे लहान मुले लगेच खातात.
🍽️ ७. सर्व्हिंग सुचना (Serving Suggestion)
ही दालमूठ तुम्ही चिवड्यामध्ये घालून खाऊ शकतात. किंवा अशी ही खाऊ शकतात. मुरमुरे मध्येही तुम्ही दालमूद कालवून खाऊ शकतात. किंवा दालमूठची कापलेले कांदा ,टोमॅटो, कोथिंबीर चाट मसाला ,घालून भेळ बनवू शकतात
🕒८. वेळ व परिमाण /Time and Quantity
• तयारीची वेळ: १० मिनिटे
• शिजवण्याची वेळ: १५ मिनिटे
• एकूण वेळ: २५ मिनिटे
• परिमाण: २ जणांसाठी
❤️ ९. निष्कर्ष / लेखकाची टिप्पणी
हा पदार्थ आरोग्यदायी, झटपट आणि पारंपरिक चवीचा आहे. आठवड्याच्या शेवटी नक्की करून बघा!
📚 १०. टॅग्स / कीवर्ड्स
, #SwaadGharCha, #IndianRecipes, #HomemadeFood, #EasyCooking, #MarathiFood, #HomemadeRecipe







