पापडी:अगदी मऊ तोंडात टाकताच विरघळणारी अशी बेसन पापडी !!Besan Papdi

by Vaishali Chaudhari
90 views

🥘 रेसिपीचं नाव(Racipe Name)

पापडी

📸२. फोटो / फीचर्ड इमेज :Photo ]

पापडी:अगदी मऊ तोंडात टाकताच विरघळणारी अशी बेसन पापडी !!Besan Papdi

✨३. प्रस्तावना(Introduction)

पापडी ही फिका पदार्थ असून लहान मूले खूप आवडीने खाता हा खाद्य पदार्थ सर्व ऋतूत बनवतात,तसेच चिवडा मध्ये सुद्धा हि घातली जाते ….जाड बारीक शेवाचे mixture मध्ये तसेच मिसळ मध्ये हि पापडी वापरली जाते ….दिवाळी आली की फराळा मध्ये हि केली जाते …..

📝४. साहित्य (Ingredients)

  • बेसन -१ किलो, (हरबरा डाळ पीठ )
  • तेल १ किलो
  • ओवा २० ग्रॅम
  • मीठ ५० ग्रॅम –
  • सोडा १० ग्रॅम,
  • पाणी
पापडी:अगदी मऊ तोंडात टाकताच विरघळणारी अशी बेसन पापडी !!Besan Papdi

🔥 ५. कृती (Steps)

सर्वप्रथम १ किलो बेसन घ्या …ते छान गाळून घ्या … बेसनामध्ये , ओवा, सोडा. मीठ एकत्र करून घ्यावे.बेसन पीठ एकजीव करा……

नंतर बेसनाचे मध्यभागी आळे म्हणजेच गोल करून त्यामध्ये पाव ग्लास (५०ग्रम ) तेल घालून अर्धा ग्लास पाणी वापरून चांगले पाणी आणि तेल फेटून घावे……

नंतर हळू हळू बेसन फेटत घ्यावे असे करत करत गोळा करून घ्यावा.मऊ असा गोळा तयार करा.

नंतर साच्याला पापडीची म्हणजेच आडव्या रेष वाली चकती लावा ………नंतर पाण्याचा हात घेईन साचत बेसनाच गोळा भरा ……..साचा बंद करा ……

आता कढाई मध्ये तेल घालावेआणि साच्याच्या सहाय्याने पापडी पाडावी …… नंतर टी दोनी बाजूस मंद आचेवर तळून घ्यावी….

लाल करू नये …कडसर लागेल….पिवळसर तळावी ……यापद्धतीने सर्व मिश्रणाची पापडी काढून घ्यावी …..आता आपली मऊसर पापडी तयार आहे ……

💡 ६. टिप्स (Cooking Tips)

सोडा नको असल्यास वापरु नये कारण तेलाचे मोहन दिल्याने पापडी मऊ होतेच पण चवीसाठी सोडा वापरतात.

🍽️ ७. सर्व्हिंग सुचना (Serving Suggestion)

हि पापडी मिसळ पाव मध्ये अगदी छान चवदार लागते तसेच चिवडा मधेही तुम्ही घालून चिवडा बनवू शकतात ……

🕒८. वेळ व परिमाण(Time & Quantity)

वेळ व परिमाण

तयारीची वेळ २० मिनीटे

एकूण वेळ परिमाण -१ तास १० जणासाठी

❤️ ९. निष्कर्ष / लेखकाची टिप्पणी

📚 १०. टॅग्स / कीवर्ड्स

, #SwaadGharCha, #IndianSnacks, #TeaTimeSnacks, #CrispySnacks, #MarathiFood, #HomemadeRecipe

पापडी:अगदी मऊ तोंडात टाकताच विरघळणारी अशी बेसन पापडी !!Besan Papdi

You may also like

Leave a Comment

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.