घरीच बनवा लेयर दिसणारे शंकरपाळे अगदी छान फुलणारे !!! Shankarpale

by Vaishali Chaudhari
195 views

खमंग, कुरकुरीत आणि खुसखुशीत शंकरपाळे | अगदी पारंपरिक पद्धतीने बनवा घरच्या घरी!

आजीच्या हातची चव आठवण करून देणारे खुसखुशीत शंकरपाळे!

तोंडात टाकताच विरघळणारे गोड आणि कुरकुरीत शंकरपाळे

दिवाळीसाठी खास पारंपरिक गोड शंकरपाळे अगदी सोप्या पद्धतीने बनवा खमंग आणि खुसखुशीत शंकरपाळे

कमी साहित्यात बनवा बाजारासारखे कुरकुरीत शंकरपाळे!

रेसिपीचे नाव (Racipe Name)

शंकरपाळे

प्रस्तावना(Introduction) :

शंकरपाळे हा गोड पदार्थ असून चवीला शंकरपाळे हा अत्यत खमंग, गरमागरम चहासोबत खाता येईल…असा आहे… हा लहान ते मोठ्यापरेन सर्वना खूप आव्डतो ….पण शंकरपाळे हे लेयर हवेत हे प्रत्येकाला वाटत असते ……

पण ते कसे तयार करायचे आणि अगदी योग्य प्रमाण हवे असे वाटत असेल तर हे प्रमाण वापरा तेलात न विरघळणार नाही…..प्रत्येक गोष्टीला योग्य प्रमाण गरजेचे असते …..

आली आली दिवाळी आली शंकरपाळे करण्याची वेळ झाली!!!!!

घरीच बनवा लेयर दिसणारे शंकरपाळे अगदी छान फुलणारे !!! Shankarpale

साहित्य(Ingridients):

  • 200 म्हशीचे तूप ग्रॅम
  • पाणी,
  • मीठ.
  • १ किलो मैदा,
  • 300 ग्रॅम पीठीसाखर,
  • १ किलो तेल

कृती(Procedure) :-

1 किलो मैदा चाळून घ्या. मैदयामध्ये चिमूटभर मीठ घाला,मैदा चाळल्याने मैदा हलका होतो ……. नंतर 200 ग्रॅम तूप गरम करून वितळून घ्या….इथे मी साजूक तुपाचा वापर केला आहे….

साजूक तुपाचा सुगंध आणि चव छान लागते …..ते तूप मैद्यात् घालून मैदा चोळा…… म्हणजे मोहन छान बसेल……..

सर्व मैदा हा व्यवस्थित एकत्र करा ..तूप चांगले पसरेल ……..नंतर ३०० ग्राम पीठीसाखर घालून चोळून चोळून घ्या………

पिठीसाखर नसल्यास साधी साखरेचा वापर करायचा असल्यास अगदी वाटीभर पाण्यात साखर विरघळून घ्या आणि मग मैद्यात घालून गोळा मळा….

तुम्हाला गोड आवडत असल्यास ४०० ग्राम पिठीसाखर तुम्ही वापरू शकतात. परंतु जास्त गोड मुळे शंकरपाळे जरा कडक होतील ….

घरीच बनवा लेयर दिसणारे शंकरपाळे अगदी छान फुलणारे !!! Shankarpale – फोटो 2

नंतर पाणी किवा तुम्ही दुधात सुद्धा गोळा भिजवू शकतात पण दुधात नाही भिजवला तरी चालेल……

टाकून गोळा करून घ्या………गोळा हा थोडा मुऊच मळा……कारण थोड्या वेळात पुन्हा कडक होतो ….एकदम कडक नको एकदम पातळ हि नको ……..नंतर त्याचे गोळा करा …….

घरीच बनवा लेयर दिसणारे शंकरपाळे अगदी छान फुलणारे !!! Shankarpale – फोटो 3

गोळा लाटून सहा ते सात वेळा दुमडून घ्या म्हणजे शंकरपाळ्या ला लेयर येतील …….आपल्याला शक्य तेवढे दुमडा…. पाटावर लाटून घ्या…….

घरीच बनवा लेयर दिसणारे शंकरपाळे अगदी छान फुलणारे !!! Shankarpale – फोटो 4

शंकरपाळे कटरने कट करून घ्या,……… शंकरपाळे पाहीजे त्या आकारात कापा,…….आता हे कागदावर पसरवा ……

घरीच बनवा लेयर दिसणारे शंकरपाळे अगदी छान फुलणारे !!! Shankarpale – फोटो 5

असे सर्व गोळे लाटून घ्या ……आणि शंकरपाळे कट करून घ्या …….पेपर वर पसरवा ….

घरीच बनवा लेयर दिसणारे शंकरपाळे अगदी छान फुलणारे !!! Shankarpale – फोटो 6
घरीच बनवा लेयर दिसणारे शंकरपाळे अगदी छान फुलणारे !!! Shankarpale – फोटो 7

एका कढाईत तेल गरम कुरुन घ्या……… त्यात शंकरपाळे थोडे थोडे थोडे घालून तळून घ्या…..मध्यम आचेवर तळून घ्या …इथे तुम्ही तुपात सुद्धा शंकरपाळे तळू शकतात …..

परंतु इथे तेलात तळले आहे आणि तुपाचे मोहन दिले आहे …… .अआपल्या आवडीनुसार आपण तळू शकतो……

कारण तेल गार असल्यात शंकरपाळे वितळतात…..तेल गरम झाल्यावर मगच शंकरपाळे त्यात घाला ……. शंकरपाळे गुलाबी रंगावर तळा छान खुसखुशीत होतात……तळल्यानंतर छान फुलतील ……

घरीच बनवा लेयर दिसणारे शंकरपाळे अगदी छान फुलणारे !!! Shankarpale – फोटो 8

टिप्स(Tips):::

शंकरपाळ्यात साखरेची प्रमाण ५० ग्रॅमु वाढवू शकतात परतू जास्त घालू नका, शंकरपाळे वितळतात तेलकट होतात.

वेळ आणि परिमाण (Time And Quantity):::

तयारीची वेळ – 30 मिनीटे.

एकूण वेळ:१ तास ३० मिनीटे.

‘परिमाण: १ ते दिड किलो

कीवर्ड Tags/Keywords::

#SwaadGharCha, #IndianRecipes, #HomemadeFood, #EasyCooking, #MarathiFood, #HomemadeRecipe #Shankarpale #Shankarpali #SweetShankarpali #CrispyShankarpale #MaharashtrianFood #DiwaliFaral #DiwaliSpecial #TraditionalRecipe #HomemadeSnacks #IndianSweets #शंकरपाळे #गोडशंकरपाळे #कुरकुरीतशंकरपाळे #खुसखुशीतशंकरपाळे #दिवाळीफराळ #मराठीरेसिपी #घरगुतीपदार्थ #पारंपरिकपाककृती #स्वादिष्टपदार्थ #स्वादघरचा

अजून दिवाळी special काही racipe

Shankarpali Recipe
Sweet Shankarpali Recipe
Crispy Shankarpali
Maharashtrian Shankarpali
Traditional Shankarpali
Homemade Shankarpali
Sweet Shankarpale
Diwali Faral Recipe
Crispy Indian Snacks
Easy Shankarpali Recipe

You may also like

Leave a Comment

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.