पातळ पोह्यांचा विदर्भ स्पेशल चिवडा. !!!Vidarbha Special Chivda
विदर्भ स्पेशल पातळ पोह्यांचा खमंग आणि कुरकुरीत चिवडा विदर्भ स्पेशल पातळ पोह्यांचा खमंग, कुरकुरीत आणि चविष्ट चिवडा बनवण्याची सोपी रेसिपी. दिवाळी फराळासाठी आणि चहासोबत खाण्यासाठी उत्तम नाश्ता.
प्रस्तावना/Introduction:::
विदर्भामध्ये हा पोह्यांचा चिवडा एकदम स्पेशल असतो…. आपल्या तळलेल्या चिवड्यापेक्षा हा चवदार आणि कमी तेलकट असतो….. शिवाय हा झटपट असा तयार होतो… यामध्ये फक्त पोह्यांचा वापर करून चिवडा तयार केला जातो….
साहित्य/Ingridident:::
- एक किलो पातळ पोहे
- पाव किलो भाजलेल्या डाळ्या
- पाव किलो शेंगदाणे
- पाव किलो बारीक शेव
- मोठी वाटी कढीपत्ता
- एक खोबऱ्याच्या वाटीचे काप
- दहा ते बारा काजूचे काप
- आठ ते दहा मिरच्यांचे काप
- एक चमचा शोप
- एक चमचा धने
- एक ते दीड चमचा पिठीसाखर
- दोन चमचे हळद
- दोन चमचे तिखट
- चवीप्रमाणे मीठ
- आवडत असल्यास लिंबू सत्व पावडर
- दोन चिमूट मोठे हिंग
- एक वाटी तेल
कृती/ Procedure:::
सर्वप्रथम पातळ पोहे चांगले चाळून घ्या त्यातील बारीक पोहे चाळून घ्या…
पोहे चाळून झाले की मग खोबऱ्याची बारीक असे पातळ काप करून आणि मिरच्यांचे सुद्धा बारीक पातळ काप करून घ्या…
हे सर्व काप करून झाले की मग कढईमध्ये त्यामध्ये पाव चमचा हळद घाला आणि पाव किलो पोहे चांगले पाच मिनिटे चांगले परतवून घ्या….
याच पद्धतीने पुढच्या तीन बॅचेस सुद्धा परतवून घ्या कढईमध्ये तेल घालून पाव चमचा हळद घालून पोहे झाले पाच मिनिट परतवून घ्या म्हणजे आपले पोहे खमंग होतील आणि आपल्या चिवडा खमंग लागेल…..
आता आपण एका तगारीमध्ये सर्व पोहे काढून घ्या..
आता कढईमध्ये पुन्हा तेल घाला आणि सर्वप्रथम शेंगदाणे तळून घ्या शेंगदाण्याला चांगला तांबूस रंग येऊ द्या…. आता ते तळलेले शेंगदाणे आपण जी पोहे परतून घेतलेले आहे त्यावर घाला……
आता जाळ्या तळून घ्या त्याही तांबूस रंगावर तळून घ्या आणि परतवलेल्या पोह्यांवर घाला…
आता कडीपत्ता तळून घ्या चांगला कडकडीत झाला की मग तो काढून घ्या आणि परतवलेल्या पोह्यांवर घाला….
आता राहिले आपली खोबऱ्याचे काप तेही चांगले तांबूस रंगावर तळून घ्या आणि परतवलेल्या पोह्यांवर घाला….
आणि हिरव्या मिरच्या चांगल्या मंद आचेवर तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्या….
असेच काजूचे काप सुद्धा तांबूस रंगावर परतून घ्या आणि पोह्यांवर घाला…आणि ते पोह्यांवर घाला….
नंतर मग सर्व साहित्य तळून झाले की मग उरलेल्या तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी घाला…..
मोहरी जिरे तडतडले की त्यामध्ये शोप आणि धने घाला आणि पुन्हा एक चमचा हळद दोन चमचे तिखट आणि दोन चमचे मीठ घालून परतवून हे सर्व मिश्रण परतवलेल्या पोह्यांच्या मिश्रणावर घाला …..
आणि सर्व हे एकत्र करून घ्या आपला चिवडा तयार झालेला आहे….
टिप्स::
आपण चिवड्यासाठी पोहे आधीच परतून घेतले होते आणि त्यामध्ये हळद सुद्धा घालून ते पिवळे करून घेतले होते…..
कारण काही वेळ चिवड्याची शेवटी फोडणी घालताना आपल्याला जो हवा तो रंग येत नाही..
.
वेळ आणि परिमाण Time and Quantity::
तयारीची वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ::: ४०मिनिटे
परिमाण:::१५०० ग्रॅम चिवडा होतो

टॅग्स आणि कीवर्ड Tags and Keywords
#VidarbhaSpecialChivda #PohaChivda #ThinPohaChivda #CrispyChivda #MaharashtrianFood #DiwaliFaral #TraditionalRecipe
#VidarbhaSpecial #पोह्यांचाचिवडा #विदर्भस्पेशल #SwaadGharcha #VidarbhaSpecialChivda #PohaChivda #MaharashtrianFood #DiwaliFaral #SwaadGharcha
विदर्भ स्पेशल पातळ पोह्यांचा खमंग आणि कुरकुरीत चिवडा
विदर्भ स्पेशल पतले पोहे का कुरकुरा और स्वादिष्ट चिवड़ा
Vidarbha Special Thin Poha Chivda Recipe | Crispy & Crunchy Poha Chivda







