अनारसे पीठ कसे तयार करायचे??? Anarase Pith

प्रस्तावना/Introduction:::
अनारसे पीठ कसे तयार करायचे आणि अनारसे जाळीदार कसे तयार होते हा सगळ्यांना प्रश्न पडतो तर आपले अनारसे हे जाळीदार तयार होण्यासाठी कशी पद्धत आहे ते आज आपण बघणार आहे… आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे अगदी कमी साहित्यामध्ये आपले अनारसे बनतात….
साहित्य/ Ingridident::
एक किलो तांदूळ अर्धा किलो पिठीसाखर
पीठ तयार करण्याची कृती/Making of Anarasa floor:::
अनारसा पीठ तयार करण्यासाठी सर्वप्रथम एक किलो जाड तांदूळ घेऊन ते पाण्यामध्ये धुऊन घ्यावे….
आणि चार दिवस भिजत घालावे…. दररोज हे तांदूळ पाण्याने धुऊन घ्यावे आणि पाणी बदलवून घ्यावे म्हणजे त्याला वास येणार नाही…
चार दिवस झाल्यानंतर तांदूळ पुन्हा स्वच्छ धुऊन घ्यावे आणि एका चाळणीवर काढावे….
तांदूळ चाळणीवर काढल्यानंतर सादर अंथरून पंख्याखाली तांदूळ पसरवून घ्यावे…
तांदूळ पान तुटे झाल्यानंतर म्हणजेच पाणी सुकल्यानंतर लगेचच मिक्सरमध्ये त्याचे रव्याप्रमाणे वाटून घ्यावे…
आता ही चाळणीच्या साह्याने गाळून घ्यावे…
हे गाळल्यानंतर त्यामध्ये अर्धा किलो म्हणजेच 500 ग्रॅम की पिठीसाखर घालावी….
आणि चांगलं पिठी हातावर चांगली मळून घ्यावी…
सर्व तांदळाच्या पिठी मध्ये पिठीसाखर व्यवस्थित मिक्स व्हायला हवी…
आता ही पिठीसाखर चांगली एकत्र झाल्यानंतर या पिठी चे गोळे तयार करावे त्यामध्ये पाण्याचा वापर करू नये….
पाण्याचा वापर न करता हाताने दाबून पिठाचे गोळे तयार करून घ्यावे आणि हे गोळे स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवावे आणि साधारण चार दिवस ते तसेच ठेवावे म्हणजे आपली पिठीसाखर त्या पिठामध्ये चांगली मुरेल….
पिठीसाखर चांगली पिठामध्ये मुरली की मग आपले अनारसेचे पीठ तयार झाले आहे…
टिप्स Tips:::
अनारसे चे पीठ तयार करत असताना आपण अनारसेचे तांदूळ सतत चार दिवस धुवून घ्यावे म्हणजे त्या तांदळाला वास येणार नाही…
टॅग्स आणि कीवर्ड/Tags and Keywords
#AnarasePith #AnarsaPith #AnarsaRecipe #AnarsaFlour #HomemadeAnarsa #MaharashtrianRecipes #DiwaliFaral #DiwaliSpecial #TraditionalRecipes #IndianSweets #AnarsaPreparation #SwaadGharcha
अगदी पारंपरिक पद्धतीने घरच्या घरी तयार करा अनारसे पीठ!
दिवाळीसाठी खास अनारसे पीठ कसे तयार करायचे?
खुसखुशीत अनारसे बनवण्यासाठी परफेक्ट अनारसे पीठ!
आजीच्या पद्धतीने बनवा पारंपरिक अनारसे पीठ
अनारसे छान होण्यासाठी पीठ तयार करण्याची योग्य पद्धत!
How to Make Anarase Pith at Home
Traditional Anarsa Flour Preparation
Homemade Anarsa Flour Recipe
How to Prepare Rice Flour for Crispy Anarsa
घर पर पारंपरिक तरीके से अनारसे का आटा कैसे बनाएं?
खस्ता अनरसे बनाने के लिए परफेक्ट अनरसे का आटा
दिवाली के लिए बनाएं पारंपरिक अनरसे का आटा







