अगदी मऊसूद असा दही पोह्यांचा चिवडा!!!Dahi Poha Chivda
प्रस्तावना/Introduction::
दही पोहे हे इतर पोहापेक्षा पातळ आणि अत्यंत मऊ असतात…..हा पोहा चवीला अत्यंत मऊ शिवाय लहान मुलांना आणि वयस्कर व्यक्तींना चावण्यास अगदी सोपा जातो… म्हणजे आपली चिवड्याची भूकही भागवली जाते आणि शरीरामध्ये जास्त तेलही जात नाही या चिवड्यामध्ये तेलाचा वापर एकदम कमी आहे ज्याला कोलेस्ट्रॉल आहे त्या व्यक्तीने हा चिवडा सहजरीत्या खाऊ शकतो असा हा चिवडा आहे… तुम्ही असा चिवडा कधी बनवला आहे का????
साहित्य/Ingredients::
200 ग्रॅम दही पोहे 100 ग्रॅम शेंगदाणे50 ग्रॅम डाळ्या 20 ते 25 कढीपत्त्याचे पाने चार ते पाच हिरवी मिरची जिरे मोहरी, हिंग एक चमचा पिठीसाखर चवीप्रमाणे मीठ फोडणीसाठी तेल
कृती/Procedure::::
दोनशे ग्रॅम दही पोहे चांगले चाळून घ्या त्यानंतर कढईवर गरम करा त्यामध्ये दही पोहे थोडे थोडे करून छान असे गरम करून घ्या… पोहे सतत परतवत राहा जेणेकरून ते कढईला लागणार नाही… दही पोहे परतवत असताना मंद आचेवर परतावे…. सर्वप्रथम मिरचीचे बारीक असे काप करून घ्या…… एका कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल घाला…….. त्यामध्ये शेंगदाणे तळून घ्या… शेंगदाणे चांगले तांबूस आला की ते काढून घ्या….. आता आपण ज्या गाड्या घेतलेल्या आहे भाजलेल्या डाळ्या त्या त्याच्यामध्ये तळून घ्या आणि तांबूस रंग आला की काढून घ्या….. तसेच कढीपत्ताही मंद आचेवर खरपूस असा तळून घ्या त्यातील पचवटपणा निघू द्या चांगला खमंग कढीपत्ता होऊ द्या…. आता मिरच्यांची काप मंद आचेवर तेलावर खमंग होईपर्यंत तळून घ्यायचे आहे…. काप अत्यंत खमंग होऊ द्यावे…. शेंगदाणे डाळ्या मिरच्यांचे काप आणि कढीपत्ता हे सर्व साहित्य आपण भाजलेल्या दही पोह्यांवर घाला…..त्यानंतर तेल कडकडीत गरम करून घ्या…. त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घाला…. त्यामध्ये अर्धा चमचा हळद घाला….दोन चिमटी इतका हिंग घाला….. यामध्ये साधारण दीड चमचा इतके मीठ घाला… किंवा तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे सुद्धा मीठ घालू शकता…. आणि तेल चांगले व्यवस्थित परतून घ्या… आता हे परतलेले तेल गरम गरमच आपल्या दही पोह्यांच्या मिश्रणावर घाला…. आणि दही पोहे दोन चमच्याने खालचे वर करून घ्या म्हणजे आपले फोडणी दिलेले तेल व्यवस्थित सर्व चिवड्याला लागेल….. आणि छान असा चिवड्याला पिवळसर रंग येईल….. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काजू-बदामाचे काप सुद्धा घालू शकतात….. आपला दही पोह्यांचा अत्यंत मऊसर असा चिवडा तयार झालेला आहे….. अगदी झटपट असा तयार होणारा आणि तेलाचं प्रमाण अगदी कमी असणारा असा हा चिवडा आहे…. आणि पचायला तर एकदमच हलका जातो….. लहान मुलांच्या छोट्या भुक साठी हा चिवडा एकदम योग्य आहे…..तयार आहे दही पोहे चिवडा !!!!
टिप्स/ Tips::
हे पोहे परतत असताना मंद आचेवर परतवावे…… हे पोहे आधीच खमंग असतात पण बऱ्याचदा आपण पाकीट उघडतो आणि जर ते उघडेच राहिले तर ते थोडे त्यातील कुरकुरीतपणा कमी होतो…. त्यामुळे या कुरकुरीतपणासाठी पुन्हा आपल्याला ते परतवून घ्यावे लागतात….
वेळ आणि परिमाण Time and Quantity:::
तयारीची वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ::३० मिनिटे
परिमाण::२५० ग्रॅम
टॅग्स आणि कीवर्ड Tags Keyword




