🥘१. रेसिपीचं नाव(Racipe name)
बारीक शेव (Zero ) झिरो
📸 २. फोटो / फीचर्ड इमेज :
✨३. प्रस्तावना(Introduction)
बारीक शेव हे बऱ्याच पदार्थावर सर्व्हिगसाठी वापरतात. चाट मध्ये बारीक शेव वापरले जातात. चाट हा सर्वाना आवडणारा असल्याने चाट मध्ये बारीक शेव हवेच
📝४. साहित्य (Ingredients)
- बेसन (हरबरा डाळ पीठ ) – १ किलो,
- तेल १ किलो.
- नमक- मीठ ५० ग्रॅम,
- पाणी
🔥 ५. कृती (Steps)
नरम शेव तयार करण्यासाठी (Soft Shev Making Process)::
सर्वप्रथम बेसन एकदम बारीक दळून घ्या …बेसनात (हरबरा डाळ पीठ ) मीठ घालावे व एकत्र करावे.
बेसनात आळ करून घ्या ५० ग्रॅम तेल त्यात अर्धा ग्लास पाणी घालून चांगले फेटून घ्या.तेल घालणे म्हणजेच पिठलं मोहन देणे यामुळे आपले शेव अगदी मऊ होतात…. बेसन फेटून चांगले मऊ असे मळून घ्या …
नंतर गरजेप्रमाणे पाणी घालून घट्टसर गोळा करा करा बारीक शेवांचा गोळा, हा घट्ट हवा. शेव काढण्यासाठी एकदम बारीक शेवांची जाळी घ्या…सर्वात बारीक जालीनेच बारीक शेव तयार होऊ शकतात…
त्यानंतर साच्यामध्ये शेवांचे मिश्रण साच्यामध्ये घाला ….आणि साचा बंद करून घ्या …कढाईत तेल गरम करावे.आणि साच्यामधून कढाईत शेव घाला ….
तेलात शेव टाकावी,नंतर मंद आचेवर कुरकुरीत होईपारेंत तळून घ्या …….
याप्रमाणे याप्रमाणे बाकी मिश्रणाची तळून शेव काढून घ्यावी.
कडक शेव बनवण्यासाठी (Hard Shev MAking)::
बेसनात (हरबरा डाळ पीठ ) मीठ घालावे व एकत्र करावे.
इथे आपण तेल घालणार नाही ….कारण आपल्याला कडक शेव तयार करण्यासाठी मोहन अजिबात घालू नका …हि शेव अगदी छान करारी लागतात …..तुम्ही चाट वारू घेऊन खाऊ शकतात ….
नंतर गरजेप्रमाणे पाणी घालून घट्टसर गोळा करा करा बारीक शेवांचा गोळा, हा घट्ट हवा. शेव काढण्यासाठी एकदम बारीक शेवांची जाळी घ्या…सर्वात बारीक जालीनेच बारीक शेव तयार होऊ शकतात…
त्यानंतर साच्यामध्ये शेवांचे मिश्रण साच्यामध्ये घाला ….आणि साचा बंद करून घ्या …कढाईत तेल गरम करावे.आणि साच्यामधून कढाईत शेव घाला ….
तेलात शेव टाकावी,नंतर मंद आचेवर कुरकुरीत होईपारेंत तळून घ्या …….
याप्रमाणे याप्रमाणे बाकी मिश्रणाची तळून शेव काढून घ्यावी.
💡 ६. टिप्स (Cooking Tips)
बारीक शेवामध्ये सोड्याची गरजच नाही. तसेच मोहन प्रमाण कमी घेतले तरी चालते कारण ती कडक असल्यास चवीला छान लागतात.
🍽️ ७. सर्व्हिंग सुचना (Serving Suggestion)
चाट वर तसेच पोहे उपमा पाणीपुरी वर घेऊन तुम्ही हि शेव खाऊ शकतात ……..
🕒८. वेळ व परिमाण::(Time& Quantity)::
तयारीची वेळ:१० मिनिटे
एकूण वेळ -१ तास १५ मिनीटे
परिमाण -१० जणांसाठी
❤️ ९. निष्कर्ष / लेखकाची टिप्पणी
📚१०. टॅग्स / कीवर्ड्स(Tags)
बारीक शेव (Zero ) झिरो, Zero recipe, मराठी रेसिपी, घरगुती रेसिपी, Maharashtrian food, easy homemade recipe
, #SwaadGharCha, #IndianRecipes, #HomemadeFood, #EasyCooking, #MarathiFood, #HomemadeRecipe








1 comment
[…] बारीक शेव (Zero ) झिरो paratha-bhakri […]