अगदी खुसखुशीत असे खमंग खारे शंकरपाळे !!! Namkin Shankarpade -दिवाळी फराळासाठी खुसखुशीत खारे शंकरपाळे | Crispy Namkeen Shankarpali – चहासोबत खाण्यासाठी कुरकुरीत खारे शंकरपाळे – कमी साहित्यात बनवा खारे शंकरपाळे | नमकीन शंकरपाळी रेसिपी
प्रस्तावना Introduction:::
गोड शंकरपाळी हे तर आपण नेहमीच बनवतो पण अशी खारे शंकरपाळे तुम्ही कधी बनवले आहेत का???
अगदी चवीला अप्रतिम लागणारे आणि आपल्याला चहा सोबत खाता येणारे जी आपली खारी आणि बिस्किटांची गोडी कमी करणारे!!!
एकदा मुलांनी हे खारे शंकरपाळे खाल्ले तर बिस्किट मुले विसरूनच जातील….
सहज पडणारे प्रश्न
खारे शंकरपाळे कसे बनवायचे?
खारे शंकरपाळे कुरकुरीत कसे होतात?
या प्रश्नासाठी हि पोस्ट नक्की वाचा
साहित्य Ingridident::::
एक किलो मैदा 100 g रवा 225 ग्रॅम तूप दोन चमचे मीठ दोन चमचे जिरे दोन चमचे ओवा 25 मिरे दहा लवंग शंकरपाळे बनवण्याची
कृती Preparation of shakarpade:::::
सर्वप्रथम मैदा हा चाळून घ्या…..
एका मोठ्या तगारीमध्ये घाला….
तगारीमध्ये घातल्यानंतर त्यामध्ये 100 ग्रॅम रवा घाला….
आणि व्यवस्थित एकत्र करून घ्या आधी आपण याचा मसाला तयार करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये 25 मिरे 10 लवंग एक चमचा ओवा एक चमचा जिरे हे मिक्सरला चांगले वाटून घ्या थोडा बारीक भरडा झाला तरी चालेल परंतु मिरे मात्र बारीक झाले पाहिजे….
त्यामध्ये एक चमचा ओवा एक चमचा जिरे दोन चमचे मीठ घाला आणि व्यवस्थित एकत्र करून घ्या…..
आता आपण जो मसाला तयार केलेला आहे तो मैद्याच्या मिश्रणामध्ये घाला….
आणि सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या…
एका पातेल्यामध्ये 225 ग्रॅम चांगले गरम करून घ्या आणि ते मैद्यामध्ये घाला गरम गरम तूपच आपल्याला मैदा मध्ये घालायचे आहे जेणेकरून त्याला मोहन बसेल आणि आपले शंकरपाळे चांगले खुसखुशीत होतील….
हे मोहन देताना दोन्ही हातांनी चांगले मैद्याला सर्व मैद्यामध्ये व्यवस्थित चोळून घ्या…..
आता या महिलांमध्ये पाणी घालून ज्याप्रमाणे आपण गोड शंकरपाळ्यांचा गोळा मळतो त्याप्रमाणेच हा गोळा मळून घ्या हा गोड शंकरपाळ्यांपेक्षा थोडा मऊ भिजवला तरी चालेल…..
एकदम कडक भिजवायची गरज नाही….
त्यानंतर आपल्याला छोट्या छोट्या गोळे करून घ्या दोन ते तीन गोळे एकमेकांना चिकटवा आणि मग लाटा ज्याप्रमाणे आपण पोळी फुल करतो त्याप्रमाणे त्याचे फोल्ड करा….
ही फूल केल्यामुळे आपले शंकरपाळी लेयर दार तयार होतात…..
छान त्याचे तळल्यानंतर लेयर दिसतात आणि खुसखुशीत होतात….
आता याची बारीक अशी पोळी लाटून घ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याची थिकनेस दाखवलेलीच आहे…..
त्यानंतर आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण शंकरपाळी कट करून घ्या….
हे शंकरपाळी छान स्क्वेअर शेप मध्ये कापू शकतात किंवा तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये सुद्धा तुम्ही कापू शकतात…..
आता दहा मिनिटे त्याला रेस्ट द्या…..
त्यानंतर तेल छान कडकडीत गरम करून गॅसची आच मंद करा आणि मग त्यामध्ये शंकरपाळे घाला मध्यम आचेवर आपल्याला हे शंकरपाळी तळून घ्यायचे आहेत……
म्हणजे आपल्या शंकरपाळे एकदम खुसखुशीत आणि खरपूस होतील…..
साधारण पाच ते सात मिनिटे आपल्याला शंकरपाळी तळण्यासाठी वेळ लागतो खारे शंकरपाळे तळण्यास गोड शंकरपाळ्यांपेक्षा थोडा जास्त वेळ लागतो…..
कारण एक बॅच तळण्यास पाच ते सात मिनिटे लागतात…..
या पद्धतीने आपण सर्व शंकरपाडे तळून घेऊ……
छानसे खुसखुशीत आपले शंकरपाळी आता तयार झालेले आहेत हे तुम्ही चहा सोबत दररोज सकाळी एन्जॉय करू शकतात…..
अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत हे शंकरपाळी लोक अगदी आवडीने खातात कारण याची चव एकदम अप्रतिम लागते….
एन्जॉय खारे शंकरपाळी!!!!!
टिप्स Tips:::
शंकरपाळे तयार करत असताना आपण जे मैद्याला मोहन देतो ते सर्व मैद्याला सोडले जाईल या पद्धतीने द्यावे कारण सर्व बाजूला मोहन व्यवस्थित पसरले तर आपली शंकरपाळे एकदम खुसखुशीत येतील…..
आणि तुपाचे प्रमाण योग्यच पद्धतीने ठेवावे कमी जास्त करू नये त्यावरच शंकरपाळ्यांचा खुसखुशीतपणा असतो….
वेळ आणि परिमाण Time and Quantity:::
तयारीची वेळ:::२० मिनिटे
एकूण वेळ:::१ तास ३० मिनिटे
परिमाण::: दिड किलो शंकरपाडे
टॅग्स आणि कीवर्ड Tags and Keywords:::

Crispy Shankarpali, Namkeen Shankarpali, Indian Snacks
#खारे_शंकरपाळे #शंकरपाळी #दिवाळी_फराळ #घरगुती_फराळ #कुरकुरीत_शंकरपाळे #KhareShankarpali #CrispyShankarpali #NamkeenShankarpali #MaharashtrianRecipes #HomemadeSnacks #IndianSnacks







