भाजणीची खमंग अशीचकली तयार करण्यासाठी भाजणीचे पीठ!!भाजणी पीठ Flour mix (bhajani) for making delicious, crispy chakli!! Bhajani flour
प्रस्तावना Introduction:::
भाजणी तयार करण्याच्या अनेक पद्धती आहे शिवाय त्यामध्ये वापरले जाणारे जिन्नस किंवा साहित्य हे सर्वजण वेगवेगळे वापरत असतात… काहीजण सर्व डाळीचा वापर करतात तर काहीजण ठराविक डाळींचा वापर करून भाजणी तयार करतात…. तर तुम्ही अशी भाजणी कधी तयार करून बघितली आहे का आणि त्याची चकली तुमची खमंग तयार झाली का…. का चकली तयार झाल्यानंतर थोड्यावेळानंतरच ती नरम पडली??? भाजणी तयार करत असताना हे सर्व प्रश्न आपल्या मनात येत असतात??? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठीच आपण आज एक भाजणीचे पीठ तयार केलेले आहे ज्यापासून तयार केलेली भाजणीची चकली तुमची अगदी कुरकुरीत तयार होईल….
साहित्य/Ingredients:::
400 ग्रॅम तांदूळ 200 ग्रॅम हरभऱ्याची डाळ 100 ग्रॅम उडदाची डाळ 50 ग्रॅम साबुदाणा आणि 100 ग्राम पोहे 50 ग्रॅम धने आणि 50 ग्रॅम जिरे
कृती Procedure:::
सर्वप्रथम तांदूळ हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ या सर्व पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या आणि तांदूळ हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ वेगवेगळे चादर वर वाढत घाला… तांदूळ डाळ वाळवण्यासाठी आपण घरामध्येच फॅन खाली वाढवणार आहे…. साधारण चार ते पाच तास वाळल्यानंतर आता ही भाजणी आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे….. सर्वप्रथम कडे गरम करा त्यामध्ये तांदूळ घाला तांदूळ आला तांबूस रंग येईपर्यंत चांगला खरपूस भाजून घ्या….. आता हरभऱ्याची डाळ घालून तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्या….. आता उडदाची डाळ घाला तांबूस रंग येईपर्यंत चांगली भाजून घ्या….. आता पोहे चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या ते हातावर तोडून बघा चांगले कुरकुरीत झाले की नाही कुरकुरीत झाले की काढून घ्या….. आता कढईमध्ये साबुदाणा घाला साबुदाणा हा चांगला फुलून येतो म्हणजेच त्याच्या लाह्या तयार होतात त्याच्या तयार झाल्या की मग आपला साबुदाणा भाजून झाला असे समजावे आणि ते काढून घ्यावे….आता आपल्याला धने आणि जिरे सुद्धा भाजून घ्यायचे आहे धने आणि जिऱ्याला चांगला सुगंध सुटला की ते काढून घ्यायची आहे… छान असा सुगंध सुटलेले जिरे आणि धने चे मिश्रण सर्व तांदूळ हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ यामध्ये एकत्र करावे आणि हे चक्की मधून भाजणी दळून आणावी… आता हे तयार झालेले आहे आपले भाजणीचे पीठ!!!
या भाजणीच्या पिठापासून तयार केलेल्या चकल्या पातळ होणार नाही….
टिप्स Tips:::
भाजणी तयार करत असताना वरील जे प्रमाण दिले आहे तेच प्रमाण तुम्ही वापरावे यामधील प्रमाण कमी जास्त केल्यास चकली वातावर होण्याची दाट शक्यता असते…
वेळ आणि परिमाण Time and Quantity:::
तयारीची वेळ::१० मिनिट
एकूण वेळ::५ तास
परिमाण::१ भाजणी पीठ
टॅग्स आणि कीवर्ड Tags and Keywords




