अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी शुद्ध अशी बनवा काजू कतली !! KajuKatali !!

Easy Homemade Kaju Katli Recipe

by Vaishali Chaudhari
296 views

काजू कतली Kaju Katli Recipe

अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी शुद्ध अशी बनवा काजू कतली !! KajuKatali !!

अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी शुद्ध अशी बनवा काजू कतली !! KajuKatali  !!

रेचीपीचे नाव (Racipe Name ):: बाजारासारखी चव आणि परफेक्ट पोत असलेली काजू कतली!

काजूकतली

प्रस्तावना (Introduction):

काजू कतली हा सणासुदीला केला जाणारा गोड पदार्थ आहे.

काजूकतली हि दिवाळी आली की एकमेकाना भेट देण्यासाठी किवा कुठल्याही सणाला भेट देण्यासाठीचा खास …..

दिवाळीला खास करून काजुकातालीला जास्त मागणी असते पण जर ती आपण घरीच केली तर एकदम छान तर होतेच पण बिना मिलावटीची तयार होते …

कारण सणासुदीला मार्केट मधून आणणाऱ्या मिठाई मध्ये मिलावट असण्याची शक्यता असते अशी भेसळयुक्त काजूकतली खाण्यापेक्षा घरीच बनवा. आणि भेट द्या …..

आपली काजूकतली अगदी मार्केट सारखी तयार होईल फक्त मार्केटप्रमाणे चांदीचा वर्क तुम्ही लावू शकता,

तर मग सुटले न तोंडाला पाणी ऐकताच काजूकतली !!!!!!

साहित्य (Ingridients):-

  • ५०० ग्रॅम काजू
  • ४०० ग्रॅम साखर
  • १० ग्रॅम केसर मसाला,
  • चांदीचा वर्क असल्यास
  • तूप
  • पाणी

कृती(Procedure) –

प्रथम काजू फिज मध्ये ठेवा….

फ्रीज मध्ये ठेवले की ते कडक होतील त्यामुळे ज्या आपण काजूची पावडर बनवू तेव्हा त्याला तेल सुटणार नाही …. आणि गोळा तयार होणार नाही…. [फ्रिजमधील काजूचे एकदम बारीक पीठ होते.]

काजू लगेचच ते पुसून घ्या आणि मिक्सर मध्ये थोडे थोडे घालून फिरवा …

अधून मधून थांबवून फिरवा नाहीतर काजूला तेल सुटेल …..

मिक्सरमध्ये काजु थोडे थोडे बारीक करा…..

मिक्सर सतत सुरु ठेवू नका. बंद चालू सतत करत काजूची पावडर करा…..

हि काजूची पावडर चाळणीने गाळून घ्या …..

जाडसर पावडर पुन्हा मिक्सर मध्ये फिरवा आणि बारीक करून घ्या ……

सर्व काजू पावडर बारीक हवी …..

नंतर एका कढाईत साखर घालून ती ओली होईल इतपत पाणी घाला.आणि सतत ढवळत रहा…

आणि एकतारी पाक होईपर्यंत ढवळत रहा……

साखरेचा एकतरी पाक झाला की मग तुम्ही त्यामध्ये गाळलेले काजूची पावडर पाकात घाला…..

आणि सतत एकत्र करा ……

केसर पुडी घाला.

काजुच्या मिश्रणाचा गोळा झाला की एका प्लाटीक पेपरला साजूक तूप लावा व गोळा चांगला मळून घ्या.पेपरमुळे हाताला चटके लागणार नाही ……

गोळा तयार झाला की मग लाटण्याच्या साहाय्याने पातळ अशी पोळी लाटा. काजूकतली किती पातळ हवी त्याप्रमाणे पोळी लाटा……

नंतर चाकू, सुरीने पट्टी ठेवून चौकोनी वड्या पाडून घ्या.पट्टी ठेवल्याने एकाच आकारामध्ये काजूकतली कट होईल ……

अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी शुद्ध अशी बनवा काजू कतली !! KajuKatali  !! – फोटो 2

आवडत असल्यास चांदीचा वर्क लावा…..हे नाही केले तरी चालेल ….आपली शुद्ध काजूकतली तय्यार !!!!

टिप्सः-

मला मिठाईमध्ये चांदीचा वर्क वापरलेला आवडत नाही.

मिक्सरमध्ये काजु थोडे थोडे बारीक करा मिक्सर लगातार सुरु ठेवू नका कारण त्याने काजूला तेल सुटेल चालू ,बंद करत पावडर करा….गोल तयार होणार नाही ……

वेळ व परिमाण(Time and Quantity)::

एकू तयारीची वेळ – २५ मिनीटे

एकूण वेळ १ तासू

परिमाण – १ किलो

अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी शुद्ध अशी बनवा काजू कतली !! KajuKatali  !!

#KajuKatli #KajuKatliRecipe #HomemadeKajuKatli #PureKajuKatli #CashewBurfi #IndianSweets #DiwaliSweets #TraditionalSweets #HomemadeSweets #EasyRecipes #FestivalSpecial #SwaadGharcha

#KajuKatli #KajuKatliRecipe #HomemadeKajuKatli #PureKajuKatli #CashewBurfi #IndianSweets #DiwaliSweets #TraditionalSweets #HomemadeSweets #EasyRecipes #FestivalSpecial #SwaadGharcha

अजून काही अशा गोड recipe

बाजारासारखी चव आणि परफेक्ट पोत असलेली काजू कतली!

मोजक्या साहित्यात बनवा शुद्ध काजू कतली | सोपी रेसिपी

तोंडात विरघळणारी घरगुती काजू कतली!

सणासुदीसाठी खास पारंपरिक काजू कतली बनवा घरच्या घरी!

Easy Homemade Kaju Katli Recipe

Pure Homemade Kaju Katli | Simple & Delicious Recipe

Perfect Kaju Katli Recipe at Home

Market Style Kaju Katli with Simple Ingredients

Traditional Indian Cashew Burfi Recipe

घर पर बेहद आसान तरीके से बनाएं शुद्ध और स्वादिष्ट काजू कतली!

बाजार जैसी परफेक्ट काजू कतली बनाने की आसान रेसिपी

कम सामग्री में बनाएं मुलायम और स्वादिष्ट काजू कतली

त्योहारों के लिए खास घर की बनी काजू कतली

You may also like

Leave a Comment

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.