झटपट तयार होणारी अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारी बेसन रवा बर्फी !!! Besan Rava Barfi

by Vaishali Chaudhari
0 views

झटपट तयार होणारी अगदी कमी साहित्यातील बेसन रवा बर्फी – चवीला अप्रतिम आणि बनवायला सोपी!

बर्फी म्हटली की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते परंतु ही बर्फी झटपट आणि पाक कसा करायचा हा मोठा प्रश्न पडतो आणि पाकाचे प्रमाण कधी कधी जास्त घट्ट झाले तर बर्फी आपली एकदम कडक होते अगदी दातालाही तुटणार नाही अशी बर्फी आपली तयार होते परंतु आपली मऊसूद बर्फी अशी तयार व्हावी त्यासाठी आपण आज ही रेसिपी तयार करणार आहे…..

अर्धी वाटी बेसन अर्धी वाटी रवा अर्धी वाटी इतके साजूक तूप (५ ते ६ चमचे) पाऊण वाटी साखर आणि केशरी रंग किसलेले खोबरे ड्रायफ्रूटचे काप चार ते पाच चमचे दूध

सर्वप्रथम बेसन आणि रवा चांगला चाळून घ्या म्हणजे तो हलका होईल….

बेसन आणि रवा एका लहानपणी काढा आणि त्यामध्ये चार ते पाच चमचे दुधाचे घाला आणि चांगले व्यवस्थित एकत्र करून घ्या म्हणजे मिश्रण रवेदार तयार होईल….

कढईमध्ये साजूक तूप पाच ते सहा चमचे म्हणजे जवळपास अर्धी वाटी इतके वितळवून घ्यायचे आहे…..

कढईमध्ये छान कडकडीत तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये बेसन आणि रवा दोन्हीही घालायचे आहे आणि सतत परतवत राहायचे आहे गॅसची आज आपल्याला मंद ठेवायची आहे मंद आचेवर हे सर्व मिश्रण अगदी तूप सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहे…..

आपल्या बेसनाला अगदी छानसं तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हे मिश्रण सतत परतवायचे आहे….

बेसन रव्याचे मिश्रण परतवत असताना तळाशी चिकटणार नाही याची काळजी घ्यायची आहे मध्येच आपण हात थांबवला की कढईमध्ये तळाशी ते चिकटते…. त्यामुळे सतत आपल्याला हे मिश्रण परतवत राहायचे आहे म्हणजे खाली चिकटणार नाही……

साधारण वीस मिनिटे आपल्याला हे मिश्रण परतवण्यास लागतात म्हणजे तुम्हाला जर हे लक्षात येत नसेल की किती वेळ परतवायची तर साधारण वीस मिनिटे आपल्याला मंद आचेवर परतवत राहायचे….

त्यानंतर दुसऱ्या साईडला एका पातेल्यामध्ये अर्धी वाटी साखर बुडेल इथपर्यंतच पाणी घ्यावे आणि साखरही सतत ढवळत राहावी आपल्याला साखरेचा एक तारी पाक तयार करायचा आहे…

पाक हा कसा ओळखायचा हे तुम्हाला मी माझ्या बऱ्याच रेसिपी मध्ये सांगितले आहे आपल्या चमच्यामध्ये पाक घेऊन तो पाक खाली खाली पडतो त्यावेळेस शेवटच्या थेंबाला अगदी हळुवारपणे थेंब पडतो म्हणजे आपला पाक तयार झाला…..

आणि तसेच दुसरी पद्धत म्हणजे आपल्या हातावर थोडासा पाकाचा थेंब घेऊन त्याचा एक तार होतो का ते बघावे….

आता आपला एक तारी पाक तयार झाल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर केशरी रंग घाला….

आता आपण परतवलेल्या बेसन रवा च्या मिश्रणामध्ये आपण तयार केलेला पाक घाला आणि साधारण दोन ते तीनच मिनिटे परतावा आणि गॅस बंद करा….

एका ताटाला तूप लावून घ्या आणि हे मिश्रण ताजामध्ये पसरवा त्यावरून तुम्ही खोबऱ्याचा कीस घालून तसेच ड्रायफ्रूट चे तुकडे घालून पसरवून घ्या थोडे ते वाटीच्या सहाय्याने प्रेस करून घ्या म्हणजे आपले तुकडे वेगळे होणार नाही आणि बर्फीला छान दिसतील….

दहा ते पंधरा मिनिटे बर्फी छान थंडी झाली की त्याचे काम करून घ्या आपले रवा बेसन बर्फी तयार आहे…

बेसन बर्फी तयार करत असताना तुम्ही साखरेचा पाक अगदी योग्य पद्धतीने करावा नाहीतर आपली बेसनाची बर्फी इतकी कडक होईल किती दाताने सुद्धा तुटणार नाही… त्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही पाक तयार केला तर आपली बर्फी एकदम मऊ आणि जास्त दिवसही टिकेल…. पाक जर कच्चा राहिला तर आपली जी बर्फी आहे ती पातळसर होईल आणि ती आठ ते पंधरा दिवसात दिवसात खावी लागेल कारण त्यानंतर त्याला बुरशी येईल…..


तयारीची वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ::३५ मिनिटे
परिमाण::२५० ग्रॅम

झटपट तयार होणारी अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारी बेसन रवा बर्फी !!! Besan Rava Barfi


टॅग्स आणि कीवर्ड Tags and Keywords:
:

#BesanRavaBarfi #BesanBarfi #RavaBarfi #EasySweetRecipe #QuickSweetRecipe #HomemadeSweets #IndianSweets #DiwaliFaral #बेसनरवाबर्फी #गोडपदार्थ #SwaadGharcha

कमी साहित्यात तयार होणारी खमंग बेसन रवा बर्फी | झटपट गोड पदार्थ

बेसन आणि रव्यापासून बनवा मऊ, स्वादिष्ट बर्फी | Besan Rava Barfi

ना जास्त साहित्य, ना जास्त मेहनत! झटपट बेसन रवा बर्फी

दिवाळी फराळासाठी सोपी बेसन रवा बर्फी | Homemade Indian Sweet

कम सामग्री में झटपट बनाएं बेसन रवा बर्फी | आसान और स्वादिष्ट मिठाई

You may also like

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.