दराबा: खान्देशच्या दिवाळीचा खास अस्सल गोडवा !!! Daraba – खान्देशची पारंपरिक चव, दिवाळीचा खास गोडवा – दराबा खान्देश!

by Vaishali Chaudhari
208 views

🥘रेसिपीचं नाव दराबा (RacipeName) Daraba Khandesh – The Authentic Sweet Taste of Khandeshi Diwali

📸

The current image has no alternative text. The file name is: WhatsApp-Image-2025-10-13-at-23.19.35.jpeg

दराबा हा पारंपरिक सणाला केला जाणारा गोड पदार्थ दिवाळी सणाला हा खास करून केला जातो.दिवाळी आली की आवर्जून दराबा हा गोड पदार्थ खान्देश ला केला जातो …

दराबा म्हणजे अस्सल साजूक तुपाची मेजवानीच होय …..दराबा करताना सुटणारा सुगंध सर्व दूर पसरतो ….

  • 500 ग्रॅम दराबा पीठ
  • 250 ग्रॅम तूप
  • 250 ग्रॅम पिठी साखर
  • पाच वेलदोडे पूड

सर्वप्रथम सोजी म्हणजेच दरब्याचे पीठ कसे बनवायचे १ किलो गहू 30 मिनिटे पाण्यात ठेवा ….नंतर ते गहू निथलाण्यासाठी एका चाळणीत ठेवा …

१० मिनिटे झाले की मग हे गहू एका चादर मध्ये गठली बांधा …टी गठली एक ते दीड तास तसेच बांधून ठेवा.नंतर गहू दाताखाली खून बघा …

हळूच तुटला की गहू झाले असे समजावे आणि त्याचे पीठ दळून आणा आणि पिठीच्या चाळणीने गळून घ्या…हि झाली दराबा सोजी तय्यार ….

एका कढाईतू तूप गरम करावे तूप गरम झाल्यावर दराबा पीठी त्यात खरपूस भाजावी..

दराबा: खान्देशच्या दिवाळीचा खास अस्सल गोडवा !!! Daraba – खान्देशची पारंपरिक चव, दिवाळीचा खास गोडवा – दराबा खान्देश!

मंद आचेवर दराबा पीठी अर्धा तास भाजावी …..

पिठी भाजत असताना आच मंद असावी …किवा induction वर कमी पोवेर करून भाजावी …..

पिठी भाजत असताना सतत ढवळत राहावे नाहीतर दराबा तांबूस रंगाचा होईल ……

दराबा हा नेहमी शुभ्र असावा ….

तूप सुटेपर्यंत भाजा… अर्थातास भाजावी तूप सुटे पर्यन्त भाजावे….

अर्धा तास साधारण पिठी भाजावी लागते …..

पिठीचा गोळा तयार होतो ….

दराबा: खान्देशच्या दिवाळीचा खास अस्सल गोडवा !!! Daraba – खान्देशची पारंपरिक चव, दिवाळीचा खास गोडवा – दराबा खान्देश! – फोटो 2

एका मोठ्या पातेल्यात काढून घ्या सात-आठ् तास भाजलेला दराबा थंड होऊ दया. नंतर आठ तासानंतर त्यात पीठीसाखर घालून खूप फेटावे

साखर त्यात मोडली तो दराबा मऊसुद होईपर्यंत रगडा……

दराबा तूप सुटे पर्यंत रगडा.साधारण १५ ते २० मिनिटे दराबा फेसून घ्या …,

अत्यंत मऊ झाला की त्यात वेलची पूड घालून पुन्हा रगडा. हा नरम मऊसूद दराबा तयार आहे.

The current image has no alternative text. The file name is: WhatsApp-Image-2025-10-13-at-23.19.35.jpeg

(सर्व साहित्य मेझरींग कप व बाकी स्पून ने मेझर केलेले आहे)

💡 टिप्स (Cooking Tips)

दराबा भाजतांना जाड बुडाच्या पातेल्यात भाजा. कारण दराबा लागू शकतो. साधारण भाजणे तोपर्यंत थांबवायचे दराव्याला तूप सूटत नाही

🍽️ सर्व्हिंग सुचना (Serving Suggestion)

• तयारीची वेळ: १५ मिनिटे
• एकूण वेळ: १ तास

हा पदार्थ आरोग्यदायी, आणि पारंपरिक चवीचा आहे. ह्या दिवाळीला नक्की करून बघा!

दराबा: खान्देशच्या दिवाळीचा खास अस्सल गोडवा !!! Daraba – खान्देशची पारंपरिक चव, दिवाळीचा खास गोडवा – दराबा खान्देश!

#SwaadGharCha #IndianRecipes #HomemadeFood #EasyCooking #MarathiFood #HomemadeRecipe #DarabaKhandesh #KhandeshiDiwali #KhandeshiFood #KhandeshiRecipes #KhandeshSpecial #DiwaliFaral #DiwaliSpecial #TraditionalSweets #MaharashtrianFood #AuthenticTaste #FestiveDelights #SwaadGharcha

असेच काही अजून गोड पदार्थ खालीलप्रमाणे

दराबा पीठ कसे तयार करावे यासाठी येथे क्लिक करावे

दराबा खान्देश – खान्देशच्या दिवाळीचा खास अस्सल गोडवा!

खान्देशची पारंपरिक चव, दिवाळीचा खास गोडवा – दराबा खान्देश!

खान्देशची खास ओळख असलेला अस्सल पारंपरिक गोड पदार्थ – दराबा!

दिवाळीच्या फराळात खान्देशी गोडव्याची खास मेजवानी!

खान्देशची परंपरा जपणारा अस्सल गोड पदार्थ – दराबाखान्देश!

एकदा चाखाल तर पुन्हा पुन्हा खावासा वाटेल असा खान्देशी दराबा!

खान्देशच्या मातीतील अस्सल चव आणि दिवाळीचा गोडवा!

You may also like

1 comment

Leave a Comment

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.