झणझणीत खान्देशी वांग्याचे भरीत | घरच्या घरी बनवण्याची सोपी पद्धत

Introduction | प्रस्तावना:: हे खान्देशी व्यंजन अतिशय रुचकर आणि आरोग्य दाई
खान्देशी जेवण म्हटलं की डोळ्यासमोर येते ती अस्सल गावरान चव आणि झणझणीतपणा. त्यातही खान्देशी वांग्याचे भरीत हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. भाजलेल्या वांग्याचा खास धुरकट स्वाद, भाजलेल्या मिरचीचा तिखटपणा आणि लसूण-कांद्याच्या पातीची चव एकत्र आली की या भरीताची खरी मजा अनुभवायला मिळते.
वांग्याचे भरीत करण्याच्या अनेक पद्धती आहेत; मात्र खान्देशी पद्धतीच्या भरीताची खासियत म्हणजे वांगे उकडण्याऐवजी भाजून घेणे. चुलीवर किंवा गॅसवर जाळी ठेवून वांगे व्यवस्थित भाजले की त्याला जो छान भाजका स्वाद येतो, तोच या पदार्थाची चव अधिक खुलवतो. त्यानंतर भाजलेल्या मिरच्या, लसूण आणि मीठ यांचा ठेचा करून त्यामध्ये वांगे मिसळले जाते.
खान्देश भागामध्ये भरताच्या मोठ्या पार्ट्या होतात. भरीत पार्टी म्हटली म्हणजे ती शेतातच आणि काट्यावरचे, चुलीवरचे भरीत. वांग्याचे भरीत म्हटलं की खान्देश भागातील शेतातील जेवणाची आठवण आल्याशिवाय होतच नाही. काट्यावर, चुलीवर भाजलेल्या वांग्याचा धुरकट स्वाद आणि येणारा सुगंध , कांदा-लसूण आणि हिरव्या मिरचीची लसलसित व झणझणीत चव यांचा सुंदर ताळमेळ म्हणजे खान्देशी वांग्याचे भरीत. गरमागरम कळण्याच्या भाकरीसोबत आणि पुरी सोबत हे भरीत वाढलं की साधं जेवणही अगदी झक्कास बनतं. सोबत हवी आमसुलाची कढी….. [कळण्याची भाकरीचे पीठ म्हणजे उडीद + ज्वारीचे पीठ ]
आज आपण घरच्या घरी झणझणीत खान्देशी वांग्याचे भरीत अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहणार आहोत. या भरीताची खासियत म्हणजे कमी आणि सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यामधूनही चव मात्र एकदम अस्सल खान्देशी मिळते.
चुलीवरची भरीत म्हटले की कसे तोंडाला पाणी सुटते बघा तर मग.
साहित्य [Ingredients]
- १ किलो भरताचे वांगे,
- आठ जाड मिरच्या,
- १० शेंगदाणे,
- ४ बारीक मिरची,
- १० लसूण पाकळ्या
- १०० ग्रॅम तेल,
- ओवा, जीरे
- कांदयाची पात,
- कोथींबीर
- १०० ग्रम तेल,
- चिमूटभर, मीठ चवीप्रमाणे,
- बडगी-ठेचणी
कृती (Steps)
“वांगी भाजणे“ :
• भरताचे वांगे धुवून घ्या, घराच्या बाहेर एक चूल मांडून त्यामध्ये लाकडी घालून ती पेटवून घ्या,अथवा घरातील gas वर एक जाळी ठेवा,
• जाळीवर वांगे ठेवा. वांगी भाजून झालेवर ते काळसर होईल तोवर ते भाजावे. वांग्याची साल काळी दिसेल इतपत भाजून घ्या. भाजून झाल्यावर वांगी नरम होतील व बाहेरून गॅसवर, चुलीवर वांगे ठेवून छान नरम होईपर्यंत भाजून घ्या. [ Gas वर हि आपण जाळी ठेवून वांगी भाजू शकतात, ] चुलीवरील भरीत चवीस एकदम रुचकर आणि हटके लागते.

• वांगे डिशमध्ये काढून घ्या, व त्या वांग्याची काळसर साल काढून घ्यावी.

• नंतर, चुलीवरच्या कोळशांमध्ये, किंवा gas वर तवा ठेवून त्यावर मिरच्या घाला त्या सतत हलवत राहा मिरच्या भाजून घ्या .
• चुलीवरच्या मिरच्यांचे भरताची चव काही वेगळीच लागते. आपण तव्यावर सुद्धा या मिरच्या भाजून घेऊ शकतो.
ठेचा:
• त्यानंतर एका बडगीमध्ये मिरच्या लसूण, मीठ घालून बारीक ठेचा बनवावा.

वांगे मॅश करणे /ठेचून घेणे :
• नंतर या ठेच्यामध्ये आपण जी वांगे सोललेले आहेत ती चांगली बारीक असे ठेचून घ्यावे वांगी बारीक ठेचल्याने भरताचे दोरे अथवा गाठी राहत नाही. [ठेचताना गाठी राहणार नाही तोवर एकदम बारीक ठेचावे.] भाजलेल्या वांग्यास भाजल्या नंतर तेल सुटते ते वांग्यातले तेल वाया जाऊ देऊ नये ते तेल वांग्याच्या भरतात घालावे.
• त्यामुळेच भरीत अत्यंत रुचकर बनते.साल काढलेले (सोललेले ) वांगे ठेचून घ्या. भरीत चांगले ठेचून ठेचा घ्या.

फोडणी :
• कढईत तेल घालून जीरे फोडणी घाला आणि मग त्यात चिरलेले कांदयाची पात शेंगदाणे घालून परतवा नंतर ठेचलेले भरीत घालून किमान ५ मिनीटे परतवा. त्यात चिरलेली कोशीबीर घाला. गरमागरम भरीत तयार आहे.
• गरमागरम भरता सोबत आपण कळण्याची भाकरी, कळण्याची पुरी ,तसेच साधी पुरी खाऊ शकतो त्यासोबत आमसूल ची कढी असली तर खूपच छान मेनू होईल. आमसूल ची कडी आपण लवकरच बघूयात पुढच्या रेसिपी मध्ये.

भरता सोबत तेलातल्या तळलेल्या मिरच्या, दह्यातली कोशिंबीर तसेच तळलेले पापड भरतासोबत एकदम रुचकर लागते.
सर्व्हिंग सुचना (Serving Suggestion)
भाकरी, कळणा भाकरी सोबत, पुरी , कळणा पुरी व चपाती रुचकर लागते.
वेळ व परिमाण
• तयारीची वेळ: १० मिनिटे
• शिजवण्याची वेळ: १५ मिनिटे
• एकूण वेळ: २५ मिनिटे
• परिमाण: २ जणांसाठी
टिप्स (Cooking Tips)
१) बऱ्याच ठिकाणी वांग्याचे भरीत करताना वांगी उकडतात, मात्र वांग्याच्या भरताची खरी मज्जा घ्यायची असल्यास वांगी भाजूनच त्याचे भरीत बनवावे.
२) भरीत तळताना त्यामध्ये तेलाचा वापर जास्त करावा त्यामुळे भरीत रुचकर लागते.)
३) बरेच झण भरीत करतांना त्यात टमाटर, कांदा त्यात टाकतात, यात फक्त कांद्याच्या पातीचा वापर करावा, कांदा वापरू नये.
४) वांगी निवडताना वांग्याला दाबले जाईल इतपत ते नरम असावे जास्त मोठे वांगी घेवू नये त्यामध्ये जाड बिया असतात, कोवळी वांगी निवडावी, कडक वांगी निवडू नये, कडक वांग्या मध्ये बियाचे प्रमाण भरपूर असते. त्या बियांचा पोटाला त्रास होऊ शकतो.
५) (सर्व साहित्य मेझरींग कप व बाकी स्पून ने मेझर केलेले आहे. भरताची वांगी हे ऑगस्ट पासून सुरू होतात ते फेब्रुवारी पर्यंत असतात.
६) वांगी भाजल्यानंतर वांग्यामध्ये जे पाणी निघते त्यामुळे भरीत लुसलुशीत बनते
निष्कर्ष / लेखकाची टिप्पणी
हा पदार्थ आरोग्यदायी, झटपट आणि पारंपरिक चवीचा आहे. नक्की करून बघा!
#SwaadGharCha, #IndianRecipes, #HomemadeFood, #EasyCooking, #MarathiFood, #HomemadeRecipe
VangyacheBharit #VaranBatti #DalBatiRecipe #KhandeshiVaranBatti #LolgeRecipe
- आईसक्रीम
- इतर
- उडीपी
- उपवास
- उपवास पापड
- उपवास विशेष
- ऋतु नुसार
- किलबिल
- केक
- कैरी लोणचे
- कोजागिरी
- खान्देश विशेष
- गणेश चतुर्थी
- गुजराती
- गोड
- गोडवा
- चटणी-कोशिबीर
- चटर पटर
- चायनीज
- झटपट (फास्ट फूड)
- झणझणीत-मसालेदार
- तांबडा रस्सा
- दिवाळी फराळ
- नानकटाई
- न्याहरी
- पंजाबी
- पराठा / भाकरी
- पापड
- पेय
- बर्फी
- बेकरी
- मकरसंक्राती
- मसालेदार
- महाराष्ट्रीयन
- मुंबई स्पेशल
- रस्सा भाजी
- लस्सी
- लाडू
- लिंबू लोणचे
- लोणचे
- वर्षभर साठवणूक चटपटीत
- शिरा
- शेक
- सण विशेष
- सरबत
- सुकी भाजी
- सूप
- हिरवा रस्सा
- होळी
ही रेसिपी करून पाहिल्यावर तुम्हाला कशी वाटली, हे आम्हाला खालील comment मध्ये लिहून नक्की कळवा. तसेच आपण हि ह्याच पद्धतीने भरीत बनविता काय ? आपण कोणत्या पद्धतीने बनविता ते हि कळवा
अशाच पारंपरिक, घरगुती आणि खानदेशी चवीच्या रेसिपीसाठी Swaad GharCha ला भेट देत राहा.








Leave a Reply