भाकरीसोबत ११०% परफेक्ट गावरान पिठले | Authentic Maharashtrian Pithla Recipe | Besan Pithla

by Vaishali Chaudhari
356 views

🥘 १. रेसिपीचं नाव

 पिठले

📸 २. फोटो / फीचर्ड इमेज : रेसिपीचा एक सुंदर, नैसर्गिक फोटो —

भाकरीसोबत ११०% परफेक्ट गावरान पिठले | Authentic Maharashtrian Pithla Recipe | Besan Pithla

✨ ३. प्रस्तावना

थोडक्यात त्या पदार्थाबद्दल माहिती — हा खाद्य पदार्थ सर्व ऋतूत बनवतात,पिठले म्हणजे झटपट तयार होणारी अकदी एन वेळेस कोणी आले तर झटपट त्या होते …असे हे पिठले !!!!

बेसनाचा पदार्थ अगदी सहग आवडीने खाणार असा बेसन म्हटले म्हणजे सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटणारे आणि झटपट असे तयार होणारे भाजी नसल्यास अगदी छान असा ऑप्शन तो म्हणजे पिठले!!!!!
अगदी वेगवेगळ्या प्रकारांमध्ये हे पिठले बनवले जाऊ शकते जसे की साधी पिठले आंबट तुका त्याचे पिठले टोमॅटोचे पिठले पालकाचे पिठले…

📝 ४. साहित्य (Ingredients

भाकरीसोबत ११०% परफेक्ट गावरान पिठले | Authentic Maharashtrian Pithla Recipe | Besan Pithla – फोटो 2
  • १ वाटी बेसन,
  • १ कांदा,
  • १ टमाटर,
  • ६ लसूण पाकळ्या,
  • अर्धा इंच आले तुकडा,
  • हळद,
  • जीरे-मोहरी
  • कढीपत्ता
  • 4 बारीक मिरच्या
  • १ जाड लाल मिस्ची,
  • कोथींबीर,
  • ४ टेबलस्पून तेल,
  • मीठ,
  • पाणी

कृती:

  • एक टमाटर एक कांदा चांगला बारीक चिरून घ्या. मिरचीचे बारीक असे तुकडे करून घ्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आल्याची पेस्ट करून घ्या.
  • एका साईडला छोट्या पातेल्यामध्ये गरम पाणी करून घ्या. एक कढईमध्ये चार पळी तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घाला.
  • त्यामध्ये कढीपत्ता मिरच्या परतून घ्या. ती परतल्यानंतर त्यात कांदा आणि टमाटर परतून घ्या. त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घाला तीही परतवून घ्या.
  • त्यात हळद घालून परतून घ्या. त्यामध्ये आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये गरम केलेले पाणी घाला हे पाणी आपण गरजेप्रमाणे घालू शकतो .
  • जसे घरात दोन मेंबर असतील तर आपण एक ग्लास पाणी वापरू शकतो आणि पाच मेंबर असतील तर दोन ग्लास पाणी वापरू शकतो.
  • पाण्याला चांगली खडखडीत उकळी येऊ द्या. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात चवीप्रमाणे मीठ घाला. त्यामध्ये एक वाटी बेसन घालून गुठळ्या न होऊ देता घोटून घ्या.
  • हे बेसन घालताना एक वाटीतले थोडे थोडे बेसन घालून घोटत राहावे म्हणजे गुठळ्या होत नाही एकदम एक वाटी बेसन टाकू नका थोडे थोडे घालून घोटून घ्या.
  • पिठले तयार करत असताना झटपट कसे तयार होईल आणि त्यामध्ये गुठळ्या होऊ नये यासाठी सोपी पद्धत म्हणजे आधीच दोन वाट्या पाणी मध्ये एक वाटी बेसन आधीच विरघळून घ्या…
  • नंतर हे मसाला परतून झालेले मिश्रण म्हणजे मसाला मिश्रणाच्या पाण्यामध्ये घालावे त्यामुळे पिठल्यामध्ये गुठळ्या होत नाही…
  • आता याला चार ते पाच उकळ्या येऊ द्या. आपल्याला पिठले घट्ट वाटत असल्यास तुम्ही पाव ग्लास गरम पाणी घालून पुन्हा ते पातळ करू शकतात.
  • आता मंद आचेवर तीन मिनिटे ते शिजू द्या आणि त्यामध्ये कोथिंबीर घाला.
  • हे पिठले तुम्ही गरमागरम ज्वारीच्या भाकरी सोबत तसेच पोळी सोबत खाऊ शकतात…. तसेच आपण पिठलं हे भातासोबत सुद्धा खाऊ शकतो…
  • बरेच लोक पिठलं भात तयार करतात… कधीकधी छोटी भूक असते त्यावेळेस आपण भाकरी किंवा पोळी बनवण्याऐवजी आपण पिठलं भात करू शकतो…
  • पिठलंभात हा एकदम सोपा असा ऑप्शन आहे…

(वरील पध्दतीने पिठले केल्यास गुठळ्या होत नाहीत(सर्व साहित्य मेझरींग कप व बाकी स्पून ने मेझर केलेले आहे)

भाकरीसोबत ११०% परफेक्ट गावरान पिठले | Authentic Maharashtrian Pithla Recipe | Besan Pithla – फोटो 3

💡 ६. टिप्स (Cooking Tips)

पिठले करताना कधी कधी आपल्या गुठळ्या जास्तच होतात त्यासाठी एक सोपी पद्धत मी तुम्हाला आज सांगते ती म्हणजे अर्ध्या ग्लास पाण्यामध्ये एक वाटी पीठ चांगले गुठळ्या न होऊ देता मोडून घ्या….

आणि कांदा टोमॅटोच्या मिश्रणामध्ये अर्धा ग्लास उकडलेले पाणी घाला .त्यानंतर त्यामध्ये बेसनाचा हा आपण बनवलेला गोल घाला हे पिठले अत्यंत चिकन येते. यामध्ये कुठल्याही प्रकारची गुठळी होत नाही.

🍽️ ७. सर्व्हिंग सुचना (Serving Suggestion)

भाकरी, चपाती किंवा भातासोबत उत्तम लागते.

🕒 ८. वेळ व परिमाण

• तयारीची वेळ: १० मिनिटे
• शिजवण्याची वेळ: १५ मिनिटे
• एकूण वेळ: २५ मिनिटे
• परिमाण: २ जणांसाठी

❤️ ९. निष्कर्ष / लेखकाची टिप्पणी

हा पदार्थ आरोग्यदायी, झटपट आणि पारंपरिक चवीचा आहे.

📚 १०. टॅग्स / कीवर्ड्स

#PitalBhakari #MaharashtrianPitalaFood #GavaranThali#BesanRacipe

You may also like

2 comments

शेपू पालकाचे पिठले - swaadgharcha.com October 1, 2026 - 4:08 pm

[…] https://youtu.be/NAICvSu2iKU भाकरीसोबत ११०% परफेक्ट गावरान पिठले | Au… […]

Reply

Leave a Comment

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.