गिलके भरीत Gilake Bharit साधी सोपी घरगुती पद्धत ने बनलेले खान्देश स्पेशल

by Vaishali Chaudhari
510 views

🥘 १. रेसिपीचं नाव

📸 २. फोटो / फीचर्ड इमेज :रेसिपीचा एक सुंदर, नैसर्गिक फोटो

गिलके भरीत Gilake Bharit साधी सोपी घरगुती पद्धत ने बनलेले खान्देश स्पेशल

गिलके भरीत 

✨ ३. प्रस्तावना

थोडक्यात त्या पदार्थाबद्दल माहिती — हा खाद्य पदार्थ सर्व ऋतूत बनवतात, आणि खाण्यास….भरीत हा खानदेशातील स्पेशल पदार्थ आहे वांग्याचे भरीत केले जाते असे नाही ….

त्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार असतात जसे की गिलक्याचे भरीत ,पिकलेल्या टोमॅटोचे भरीत, तसेच कच्च्या टोमॅटोची भरीत अशी वेगवेगळ्या भरतांचे प्रकार आहेत….

गिलक्याची भाजी म्हटलं की सगळेच नाक मुरडतात अरे बापरे !!!!

आज काय गिलक्याची भाजी पण हे भरीत एकदाच पहाल तर नेहमीच खायला आवडेल असे हे गिलक्याचे भरीत!!!

भरीत म्हटले म्हणजे तोंडाला पाणी सुटले सवे पाहिजे असे वेगवेगळे प्रकार त्यासोबत असलेले गरमागरम पोळी पराठा किंवा फुलका आहा!!!
सुटले की नाही पाणी गरमागरम भरतासाठी!!

📝 ४. साहित्य (Ingredients)

  • दोन गिलके,
  • 4 जाड मिरची
  • बारीक मिरची
  • लसूण पाकळ्या,
  • तेल.
  • शेंगदाणे,
  • मीठ,
  • कोथींबीर

🔥 ५. कृती (Steps)

  • दोन गिलके म्हणजेच जवळपास पाव किलो गिलके आहेत…. आपण भरतासाठी जाडसर गिलक यांचा वापर करू शकतो… कोवळे गिलके जरी घेतले तरी चांगले भरीत होते….
  • पण भारताला जरा जाडसर गिलक्यांचा वापर केला जातो जाडसर गिलक्यांमध्ये घराचे प्रमाण जास्त असते….
  • दोन गिलके धुवून घ्यावेत व त्याचे छोट्या छोट्या चकत्या करुन घ्यावे, त्यानंतर चकत्या कुकरमध्ये पाणी टाकून दोन शिट्ट्‌या होऊ दयावेत,
  • (गिलके आपण कुकरमध्ये लावलेत पण काही वेळा पूर्वीचे लोक कुकरमध्ये गिलके लावलेले त्यांनी चव जाते असे म्हणायचे त्यामुळे आपण एका कढईमध्ये थोडे तेल घालून त्यामध्ये गिलक्याच्या चकत्या वाफवून घेऊ शकतो.कढाई मध्ये चकत्या वाफवताना त्या बाहेरील साल पूर्णपणे वाफली गेली आहे का हे बघून घ्यावे मगच गॅस बंद करावा.)
  • नंतर तवा गरम करून त्यावर मिरच्या भाजून घ्याव्यात. तसेच शेंगदाणे ही भाजून घ्यावे. नंतर शेंगदाण्याचे साल काढून घ्यावे.(यामध्ये तुम्ही फक्त जाड मिरचीचाही वापर करू शकतात.
  • गिलक्याचे भरीत करताना आपण बारीक मिरच्यांचा वापरही केलेला आहे कारण हे भरीत झणझणीत टेस्ट असली तर एकदम अप्रतिम लागते)
  • बडगीमध्ये मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे , कोथिंबीर चांगले ठेचून घ्यावेत.आपण मिरच्या शेंगदाणे आणि कोथिंबीर ठेचून घेऊ शकतात …….
  • किंवा तुम्ही मिक्सरमध्ये अलगद फिरवून घेऊ शकतात एकदम बारीक अशी पेस्ट करायची नाही ती जाडसरच राहू द्यायची….
  • नंतर त्यात गिलके धालून व्यवास्यित “ठेचून घ्या. नंतर आपल्या चवीनुसार मीठ घाला
  • पुन्हा एकत्र ठेचा….
  • भरीत ठेचताना एकदम व्यवस्थित ठेचावे गिलक्याचे जे बाहेरील आवरण असते ते योग्य पद्धतीने ठेसले गेले पाहिजे म्हणजे त्यामध्ये ठेचाची चव एकदम व्यवस्थित मिसळेल आणि भरीत एकदम चवदार लागेल…
  • क‌ढाईत तेल गरम करून घालून जीरे मोहरी घालून हे गिलके मिश्रण चांगले परतवा.साधारण तीन ते चार मिनिटे आपल्याला तेलामध्ये भरीत घातल्यानंतर परतवून घ्यायचे आहे….
  • अधून मधून ते हलकेच ढवळून घ्यायचे आहे… यामध्ये तुम्ही वरून सुद्धा चिरलेली कोथिंबीर घालू शकतात…..
  • गिलक्याचे भरीत तयार आहे..गिलक्याच्या भरीतासोबत आपण गरमागरम कढी घेऊ शकतो. कोरडे भाजी सोबत एखादा पातळ पदार्थ पिण्यास असल्यास भाजी पोळी सहजच खाल्ली जाते.

💡 ६. टिप्स (Cooking Tips)

(गिलके हा प्रकार बऱ्याच जणांना आवडत नाही त्यामुळे गिलक्याचे भरीत अत्यंत चवीला रुचकर लागते. नेहमीच्या भाजीपेक्षा ही भाजी वेगळी बनते तसेच ती आपण पोळी सोबत किंवा फुलक्या सोबत खाऊ शकतो.)

• गिलके घेताना छोटे छोटे घ्यावेत,
• थोडं शेंगदाणा कुट, पावडर घातल्याने चव वाढते.

🍽️ ७. सर्व्हिंग सुचना (Serving Suggestion)

भाकरी, चपाती सोबत उत्तम लागते.

🕒 ८. वेळ व परिमाण(Time and Quantity)

• तयारीची वेळ: १० मिनिटे
• शिजवण्याची वेळ: १५ मिनिटे
• एकूण वेळ: २५ मिनिटे
• परिमाण: २ जणांसाठी

❤️ ९. निष्कर्ष / लेखकाची टिप्पणी

हा पदार्थ आरोग्यदायी, झटपट आणि पारंपरिक चवीचा आहे.

, #SwaadGharCha, #IndianRecipes, #HomemadeFood, #EasyCooking, #MarathiFood, #HomemadeRecipe

You may also like

Leave a Comment

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.