रेसिपीचे नाव(Racipe Name):::
खारी बूंदी

प्रस्तावना(Introduction)
:खारी बूंदी ही चिवडयात वापरतात ,तसेच पाणी पुरी यामध्ये खारी बुदी लागते. त्यापासून बरेच लोक बुंदी रायता करतात…तसेच दिवाळी आली की लोक आवर्जून बुंदी बनवतात …….खरी बुंदी हि चिवडा तसेच मिक्स चिवडा यामध्ये घालू शकतो चाट वर घालून खाऊ शकतो अगदी चटपटीत लागणारी हि बुंदी लहान मुलांना तर अत्यंत आवडते…..ते अगदी आवडीने हि बुंदी खातात ….बुंदीचे प्रमाण इथे एक किलोचे दिले आहे …परंतु तुम्ही पाव किलो पिठाची बुंदी हि भरपूर होते….
साहित्यः(Ingridients)
थोड जाड बेसन १ किलो,
१ किलो तेल,
५० ग्रॅम लाल तिखट.
५० ग्रॅम मीठ,
५० ग्रॅम चाट मसाला
२० ग्रॅम काळे मीठ,
१० ग्रॅम हिंग,
पाणी
झारा
कृती(Procedure):-
१ किलो जाड बेसन दळून घ्या …..बेसनामध्ये मीठ घाला ….सर्व एकत्र करून घ्या…..बेसन मध्ये गरजेप्रमाणे पाणी घालून भज्याप्रमाणे भिजवा..
अगदी भाज्याचे मिश्रण भिजवतो त्याप्रमाणे हे मिश्रण भिजवा ….जास्त पातळ नको जास्त घट्ट पण नको…..कारण योग्य घट्ट पण असला की आपली बुंदी अगदी गोल गरगरीत पडते …..ती अगदी योग्य आकारात पडते….
कढाईत तेल गरम करण्यास ठेवा ………नंतर झा-याला तेल लावा……झारयावर बेसनाचे मिश्रण घाला ….. बुंदी आपोआप तेलात पडेल …..मिश्रण योग्य असले की ती आपोआप तेलात गोल पडते ……
झाऱ्यावर मिश्रण टाकत राहा…… कढईत बुंदी पडत राहील ……तेलात बुंदी व्यवस्थित तळून घ्या …..
बुंदी चागली फ्राय की मग तेलातून बुंदी काढून घ्या ……अशा पद्धतीने बाकी मिश्रणाची सुद्धा बुंदी तळून घ्या …..
त्याच पद्धतीने झारयावर घाला आणि तेलात बुंदी पडू द्या आणि फ्री करून घ्या…. नंतर बुत्तेर पापर कडून घ्या …लगेच त्यावर गरम असतानाच तिखट काळे मीठ चाट मसाला हिंग पावडर घाला.
आणि व्यवस्तीत मिक्स करून घ्या …,..हि बुंदी चिवडा पाणीपुरी मध्ये तुम्ही खाऊ शकतात ……लहान मुलांना हा प्रकार तर अतिशय आवडतो ….अगदी भन्नाट असा हा प्रकार आहे ……
छान चटपटीत खरी बुंदी तयार झाली आहे…..

टिप्सः(Tips)
बेसन भिजवल्यानंतर तळतांना झारा हा तेलात हळूच झट्का कारण बुंदी गोलू पडायला मदत्त होते. झारा चांगला मोठा वापरा बुंदी चांगली पडेल
वेळ: आणि परिमाण (Time and Quantity)-
तयारीची वेळ -२५ मिनीटे
एकूण वेळ:: १ तास
परिमाण ::१ किलो बुंदी
TAGs & keywords
, #SwaadGharCha, #IndianRecipes, #HomemadeFood, #EasyCooking, #MarathiFood, #HomemadeRecipe







