मूंगफली कतली किंवा शेंगदाण्याची कतली
प्रस्तावना:::

गोड खायची इच्छा होते ना मग पण घरात काजू नाहीये पण मला तर काजूकतली सारखीच कतली खायची आहे मग काय करायच???
आता चिंता करू नका आपण शेंगदाणा चकली बनवूया झटपट तयार होणारी आणि अगदी चविष्ट अशी लागणारी शेंगदाणा कतली!!!! अगदी उपवासाला सुद्धा ही चालते आणि झटपट तयार होते कमी मेहनत मध्ये तर बघूया शेंगदाणा कतली!!!
साहित्य ::

- 200 ग्रॅम शेंगदाणे
- 125 ग्राम साखर
- अर्धी वाटी पाणी
- पाव चमचा साजूक तूप
कृती:::
प्रथम शेंगदाणे 200 ग्रॅम मोजून घ्या याच प्रमाणामध्ये तुम्ही शेंगदाणे घ्या आणि तुम्हाला दुप्पट प्रमाणामध्ये करायचे असतील तर तुम्ही करू शकतात….

फक्त साखरेचे प्रमाण पण त्याच पद्धतीने दुपटीने वाढवावे लागेल…. इथे 200 ग्रॅम शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहे…

शेंगदाणे खरपूस भाजल्यानंतर एका कॉटनच्या बॅगमध्ये घालून ते चोळून घ्यायचे आहे त्यामुळे आपली शेंगदाण्याची सर्व साल निघून जाईल हळुवार पद्धतीने ते चोळून घ्यायचे …..
शेंगदाण्याची साल अगदी पटकन निघते त्यानंतर ते एका डिशमध्ये काढून त्यामधील साल पकडून उडवून घ्यायची आहे…
अशा पद्धतीने शेंगदाण्याची साल अगदी सगळी वेगळी होईल….. किंवा ज्यावेळेस आपण शेंगदाणे तव्यावर भाजत असतो त्यावेळेस थोडा पाण्याचा शिपका घातला ….
आणि पुन्हा भाजून घेतल्यानंतर शेंगदाण्याची साल मोकळी होते आणि चोळल्यानंतर ती लगेचच निघते…. ही सुद्धा एक दुसरी पद्धत आहे…
शेंगदाण्याची साल मात्र आपल्याला काढायचीच आहे… आता शेंगदाणे गार झाली असतील मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे शेंगदाणे घेऊन मिक्सरचे भांडे सिम सिम वर फिरवावे….
म्हणजेच अगदी दोन सेकंद फिरवल्यानंतर थांबायचे पुन्हा दोन सेकंद फिरवायची पुन्हा दोन सेकंद थांबायचे आणि पुन्हा दोन सेकंद फिरवायचे या पद्धतीने आपल्याला बारीक असे कूट करून घ्यायचे आहे ….
कारण सतत आपण मिक्सर चालवल्यानंतर शेंगदाण्याचे तेल तयार होईल आणि आपले शेंगदाण्याचे कूट व्यवस्थित बारीक होणार नाही तेल सुटल्यामुळे त्याचा गोळा तयार होतो …
आपल्याला शेंगदाण्याचा गोळा तयार होऊ द्यायचा नाही…. या पद्धतीने थोडे थोडे करून सर्व शेंगदाण्याचे अगदी बारीक कुट करून घेतले…
अगदी बारीक करून घेतलेले असल्यास गाळायची गरज नाही मात्र आपले शेंगदाण्याचे कूट जर आपल्याला जाडे वाटत असल्यास ते चाळणीच्या साह्याने चाळून घ्या …
आणि जाड शेंगदाण्याची कूट वेगळे करून घ्या…. आता एका कढईमध्ये साखर घाला अर्धी वाटी त्यामध्ये पाणी घाला आणि त्याचा एक तारी पाक तयार करून घ्या….
साखर सतत ढवळत राहायची आहे त्यामुळे पाक पटकन तयार होतो… एकतारी पाक झाल्यावर लगेचच त्यामध्ये आपण शेंगदाण्याचे कूट घालणार आहे…

कूट घातल्यानंतर आपल्याला मिश्रण सतत ढवळत राहायचे आहे त्यानंतर त्याचा गोळा तयार होईल म्हणजेच मिश्रण कढईपासून वेगळे होऊन गोळा तयार होईल अशा वेळेस समजावे….

आपले मिश्रण तयार झाले आहे… हे मिश्रण तुम्हाला जर समजत नसल्यास तुम्ही थोडे मिश्रण हातावर घेऊन त्याची गोळी तयार करून बघा गोळी जर तयार झाली तर मिश्रण झाले असे समजावे….

त्यानंतर एका प्लास्टिकच्या बॅगलात तूप लावावे आणि तो गोळा त्यामध्ये चांगला एकजीव करून घ्यावा….

सर्व बाजूने व्यवस्थित गोळा अगदी मळून घ्यावा त्यानंतर लाटण्याच्या साह्याने आपल्याला किती जाड हवी त्या पद्धतीने लाटून घ्यावी….

आणि आपल्या पट्टीच्या साह्याने एकसारखे काप करून घ्यावे शंकरपाळ्याच्या आकारामध्ये आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहे….

पट्टीच्या साह्याने वापरल्यामुळे एकसारखे काप तयार होतील एकदम छान आकार येईल त्यामुळे तुम्ही पट्टीचा वापर करू शकतात…
आपली शेंगदाणा कतली किंवा मूंगफलीकतली आता तयार झालेली आहे चला तर आपण एन्जॉय करूया मूंगफली कतली!!!

आहा काय छान चवदार लागते तुम्ही पण नक्की करून बघा….
टिप्स::
कसली करताना मी जे प्रमाण सांगितले आहे ते योग्य प्रमाण आहे त्यामुळे आपली कतली जास्त गोड ही होणार नाही आणि जास्त फिकीही होणार नाही…
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ :१०मिनिटे
एकूण वेळ :३०मिनिटे परिमाण ::साधारण 325 ग्रॅम
