उपवासाची कच्चा केळ्याच्या पिठाची केळीची दशमी
प्रस्तावना::::
आषाढी एकादशी तसेच कार्तिकी एकादशी किंवा नेहमीच्या एकादशी तसेच गणेश चतुर्थी असे वेगवेगळे उपास आपण करत असतो आपल्याला फराळाची आवश्यकता असते…. फराळ मध्ये आपल्याला वेगवेगळे पदार्थ बनवता यावे यासाठी मी आज घेऊन आले आहे कच्च्या केळ्याच्या पिठाची दशमी!!!!! झणझणीत चटपटीत चवीला लागणार!!!
साहित्य:::

- एक किलो केळीचे पीठ
- चार मोठे बटाटे
- दोन चमचे जाड भरडे कोरड्या मिरच्यांचे तिखट
- अर्धी वाटी शेंगदाण्याचे बारीक असे कूट
- दीड चमचा मीठ
- एक चमचा ओवा
- पाणी
- तेल
कृती::::
सर्वप्रथम केळीचे पीठ घ्यावे… त्यानंतर बटाटे सोलून घ्यावे त्याचा किस पाडून घ्यावा… सुकलेल्या मिरचीचा जाड भरडा करून घ्यावा….
शेंगदाणे भाजून घ्यावे त्याची साल काढून बारीक असे कूट करावे…. इथे आपण बारीक कुटाचाच वापर करणार आहे कारण सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्र होतील ….
आणि भाकरीच्या पिठाला चिकटपणा येईल… केळीचे पीठ आधी चिकट असते… केळीच्या पिठामध्ये शेंगदाण्याचे कूट बटाट्याच्या बारीक किस तिखट मीठ ओवा हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यावे ….

व्यवस्थित एकत्र केल्यानंतर त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून त्याचा गोळा मळून घ्यावा ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो त्याप्रमाणेच केळीच्या पिठाचा सुद्धा गोळा मळून घ्यावा…..
त्यानंतर एक तास ही केळीचे पीठ मरू द्यावे… ज्याप्रमाणे आपण पोळी लाटतो त्याप्रमाणे दशमी लाटून घ्यावी…

ही दशमी तुम्ही भाकरी प्रमाणे सुद्धा जाड करू शकतात…. आणि तव्यावर शेकण्यासाठी घालावी त्याला तुम्ही भाकरी प्रमाणे वरून पाणी सुद्धा लावू शकता किंवा नाही लावले तरी चालेल….

त्यानंतर दोघं बाजूने चांगले शेकून घ्या आणि त्याला शेंगदाण्याची तेल लावा…. शेकल्यानंतर काढून घ्या…

या पद्धतीने सर्वच केळाच्या दशमी बनवून घ्या…. आता या केळ्याच्या दिशेने आपल्या तयार झालेल्या आहे या तुम्ही शेंगदाण्याची चटणी सोबत खाऊ शकतात किंवा दही सोबत सुद्धा खाऊ शकतात…

आणि साधी जरी दशमी खायची म्हटली तर ही एकदम चटपटीत लागते कारण यामध्ये असणाऱ्या तिखट मीठ शेंगदाण्याचे कूट योग्य प्रमाणात असते…
त्यामुळे दशमी एकदम चवदार लागते….

टिप्स:::
दशमी करताना पीठ मळताना सुरुवातीला हा गोळा हा कडक भिजवावा….. कारण या पिठाला मीठ घातल्यामुळे पाणी सुटते त्यामुळे एक तासानंतर तो नरम होतो त्यामुळे सुरुवातीला तो कडक भिजवा…. यामध्ये बटाट्याच्या किसामुळे दशमी ही नरम येते त्यामुळे आपण इथे बटाट्याच्या कीसाचा वापर केला आहे….
वेळ व परिमाण::
तयारी वेळ:: २०मिनिटे
एकूण वेळ:: ६०मिनिटे
परिमाण:: ५जणांसाठी
उपवासाची चटणी
प्रस्तावना:::
उपवासाची चटणी हा असा पदार्थ आहे की जो एखाद्या दशमी सोबत किंवा भाकरी सोबत लागणारा आहे…. उपवास असला की काही झणझणीत खाण्याची फार इच्छा होते…
साहित्य:::

- १वाटी शेंगदाणे
- ८जाड हिरव्या मिरच्या
- मीठ
- कढीपत्ता पाच पाने
- पाणी
- फोडणीसाठी तेल
- जिरे
कृती:::
सर्वप्रथम शेंगदाणे खरपूस भाजून घ्या त्याची साल काढून घ्या तसेच हिरव्या मिरच्या सुद्धा चांगल्या खरपूस भाजून घ्या….

मिरच्या भाजल्यानंतर त्यावर तुम्ही थोडे तेल घालू शकता त्यामुळे दोघं बाजूने चांगले भाजले जाते..
त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बसलेल्या मिरच्या शेंगदाणे कढीपत्त्याची पाने मीठ घालून व्यवस्थित बारीक चटणी वाटून घ्या…

त्यात थोडे पाणी घालून ती पातळ करून घ्या… चटणी एकदम व्यवस्थित बारीक वाटावी… त्यानंतर पातेल्यामध्ये तेल घालून त्यामध्ये जिऱ्याची फोडणी घालावी ….
आणि कढीपत्ता घालावा आणि त्यामध्ये चटणी घालावे… गॅस बंद करावा तुम्हाला चटणी घट्ट वाटत असल्यास त्यामध्ये पाणी घाला…..

आपली चटणी तयार झालेली आहे वरळीच्या दशमी सोबत खाऊ शकतात…
टिप्स:::
उपवासाची चटणी तयार करताना शेंगदाणेसोबत ओले खोबरं दोन ते तीन काप सुद्धा तुम्ही वापरू शकता….
वेळ आणि परिमाण:::
तयारीची वेळ १० मिनिटे
एकूण वेळ:२० मिनिटे
परिमाण::पाच व्यक्तींसाठी
