दिवाळीमध्ये खाल्ले तयार केले जाणारे अगदी खुसखुशीत गोड पारे ! Sweet Crispy Pare

by Vaishali Chaudhari
0 views

दिवाळीमध्ये खाल्ले तयार केले जाणारे अगदी खुसखुशीत गोड पारे

रेसिपी नाव Racipe Name::

खुसखुशीत गोड पारे


प्रस्तावना /Introduction::

पूर्वीच्या काळी छान असे गोड पारे तयार केले जायचे… दिवाळी आली की असा छान छान फराळ तयार केला जातो…. गोड म्हटलं की तोंडाला पाणी सुटते…

आणि गोड आणि नमकीन हे दोन्ही प्रकार दिवाळीला तर केले जातात….. तसेच कुठलाही सांगा जसे की गोकुळाष्टमी आहे ज्यावेळेस आपल्याला 56 भोग लागतात …..

अश्या त्यावेळेस सुद्धा तुम्ही पटकन बनवू शकतात आणि लहान मुलांना अत्यंत आवडतात….. आजीच्या बटव्यातील गोड अशी बापाची रेसिपी ही मस्त आणि चवदार!!!!


साहित्य /Ingridident:::

  • एक मोठी वाटी मैदा
  • अर्धी वाटी साखर
  • चिमूटभर मीठ
  • मोहन साठी तेल
  • तळण्यासाठी तेल
  • खाण्याचा लाल रंग


कृती/ Procedures:::

सर्वप्रथम मैदा चाळून घ्या…. त्यामुळे मैदा मऊसर होतो…. आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ घाला…..आणि ४चमचे इतके मोहन घालण्यासाठी तेल घाला…

आणि मैद्याचा गोळा होईल इतपत आपल्याला तेलाचे मोहन घालायचे आहे…. त्यानंतर मैद्यामध्ये पाणी घालून गोळा मळून घ्यायचा आहे….

गोळ्याला पुन्हा थोडे तेल लावून चांगला एकदम मळून घ्यायचा आहे अगदी मऊ होईपर्यंत मला गेला पाहिजे…. त्यानंतर पाटावर गोळा करा…..

गोळा तयार करत असताना छोटी पुरी तयार करून ती पाच ते सहा वेळा फोल्ड करा…. यामुळे आपल्या पाऱ्यांना छान असे लेयर तयार होतात…

आणि आपले लेयर तळताना छान उमले जातात… अगदी फुगीर असेल पारे तयार होतात त्यामुळे पाच ते सहा वेळा नक्की फोल्ड करावा…

फोल्ड करून मग त्याची पोळी लाटून घ्या… पोळी बारीक अशी लाटून घ्या…. नंतर आपल्याला हव्या त्या आकारांमध्ये तुम्ही कापून घेऊ शकतात……

तुम्ही शंकरपाळे म्हणजेच स्क्वेअर या शेप मध्ये सुद्धा कापून घेऊ शकता तसेच बारीक असे लांब लांब तुकडे करून त्याचे सुद्धा कापू शकतात इथे मी लांब तुकडे केलेले आहेत….

यामध्ये वेगवेगळे शेप किंवा आकार तुम्ही देऊ शकतात…. इथे मी चंपाकळीच्या आकार सुद्धा दिलेला आहे तेही दिसायला एकदम छान दिसतात…..

आता हे पारे आपल्याला मंद आचेवर त्याची लेयर उमले पर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे…..

गॅसची आच एकदम मंद ठेवावे त्यामुळे आपण जे फोल्ड केलेले आहे ते लेयर छान उघडून खुसखुशीत असे पारे तळले जातात….. या पद्धतीने तुम्ही सर्व पारी तळून घ्या….


साखरेचा पाक तयार करण्याची कृती/Procedure for Making Sugar Two String Syrup:::


कढईमध्ये साखर घालून त्यामध्ये पाव वाटी ते पाणी घालावे म्हणजे साखर ओली होईल इतपत पाणी घालावे आणि साखरेचा पाक सतत ढवळत राहावे……

त्यामध्ये चिमूटभर फूड कलर घालावा…… इथे आपल्याला दोन तारी साखरेचा पाक करायचा आहे… म्हणजे आपले जे पारे आहे साखरेत भिजल्यानंतर साखरेचा पाक त्याला व्यवस्थित चिकटेल….

दोन तारी पाक म्हणजे बोटाला थोडेसे पाक घेऊन दोन तार तयार होतात का किंवा दोन धागे तयार होतात का असे पहावे म्हणजे आपला बाप दोन तारी तयार झालेला आहे हे समजून….

आणि आपले छानसे पारे तयार होतील… ही पारी तयार करत असताना साखर सारखे सारखे घट्ट होते…. ते तुम्ही दोन ते तीन चमचे पाणी घालून सारखे वितळवून घेऊ शकतात……

. जसे जसे आपले पारे तयार होतील तसेच साखरेच्या पाकामध्ये दोघं साईड अल्टी पलटी करून लगेचच तेल लावलेल्या किंवा तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यावे…

पुन्हा दुसरेही पारे तयार करून पुन्हा साखरेच्या पाकामध्ये घोळवून घ्या…. आणि पुन्हा ताटामध्ये काढून घ्या…..

ताटामध्ये काढल्यानंतर त्यावर तुम्ही थोडी पिठीसाखर भुरभुरवू शकतात….. नाही घातली तरी चालू शकते…..

आणि थोडा वेळ ठेवल्यानंतर आपले साखरेचा पाक हा सुकून जाईल आणि आपले पारे तयार होतील…. खमंग खुसखुशीत आणि गोड असे पारे आपले तयार होतील…..


ही गोड पारे लहान मुलांना खूप आवडतात….. अगदी खुसखुशीत आणि खमंग लागतात…..


टिप्स/Tips::::

पारे तयार करत असताना ज्यावेळेस आपण मैदा भिजवतो त्यावेळेस त्यामध्ये मोहन नक्की घालावे…. त्यामुळे आपले पारे अगदी खुसखुशीत होतात…

. इथे मी तेलाचा वापर केला आहे पण तुमच्याकडे तुपाचं आवडत असल्यास साजूक तूप वापरल्यास हे पारे अत्यंत चविष्ट आणि चवदार लागतात …..

आणि खुसखुशीतही होतात त्यामुळे तुम्ही साजूक तुपाचा नक्की वापर करून बघा मात्र मोहन देताना तुम्ही तुपाचा वापर केला आणि तिला तळले तरी चालेल…..


वेळ व परिमाण/Time and Quantity:::


तयारीची वेळ:: १०मिनिटे
एकूण वेळ::: ४०मिनिटे
परिमाण:::पाव किलो/ २५० gram


टॅग्स आणि कीवर्ड/Tags/ Keyword::

#, #SwaadGharCha, #IndianRecipes, #HomemadeFood, #EasyCooking, #MarathiFood, #HomemadeRecipe

You may also like

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

17226

Edtiors' Picks

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.