Traditional Besan Ladoo Recipe | Grandma’s Old-Style Besan Ladoo | Swaad Gharcha
रेसिपीचे नाव(Racipe Name):
बेसन लाडू
प्रस्तावना(Introduction)
बेसनाचे लाडू हा पारंपारिक लाडू आहे आपले आजीचा खास पदार्थ जसा की मोतीचूर लाडू!!!! माझी आजी तर खूपच छान असे बेसन पुरीचे लाडू बनवायची …….तसेच लाडू आपण आता बनवणार आहे…. अगदी मऊ छान अगदी तोंडात विर्घरणारे लाडू !!!! तोंडाला तर एकडून पाणीच सुटले अहाहा !!!!!
पद्धत एकदम सोपी न बुंदी तळायची कटकट आहे यात झटपट सोप्या पद्धतीने चव मात्र अगदी मोतीचूर सारखी लागणारी !!!!!
साहित्य (Ingridients):
- बेसन अर्धा किलो,
- पाव किलो साखर,
- पाणी, तूप तळण्यासाठी,
- वेलची पूड,
- काजू-बदामचे काप.
कृती(Procedure) :-
सर्वप्रथम बेसन घेऊन ते एका तगारीमध्ये घाला. गुठळ्या मोडून घ्या.बेसन जाडसर (दाणेदार )दळून घ्या…….
त्यामध्ये वितळलेले गरम तूप घाला. ते सर्व बेसनाला व्यवस्थित चोळून घ्या. म्हणजे बेसनाला मोहन बसेल.
मोहन दिल्यानंतर पाणी घालून त्याचा कडक सर गोळा तयार करून घ्या.. गोळा तयार झाला की त्याला थोडे तुपाचा हात लावा.
आता त्याची गोल गोल गोळे करून घ्या. आता हे आता हे बेसनाचे गोळे ज्याप्रमाणे आपण पुऱ्या लाटतो त्याप्रमाणे पुऱ्या लाटून घ्या.
एका कढईमध्ये तूप गरम करा. तूप गरम झाले की त्यामध्ये एक एक पुरी घालून तळून घ्या. पुरी ही तांबूस रंगावर तळा.
चांगली खरपूस होऊ द्या. ठरलेल्या पुऱ्या थंड होऊ द्या. आता एका पातेल्यामध्ये साखर घ्या. त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घाला.
साखर वितळले की मग त्याचा एक तारी पाक करून घ्या. थोडासा बोटाला हात लावून त्याचा तार होतो का ते बघून घ्या.
हा पाक झाला की गॅस बंद करा. दुसऱ्या साईडला आपण ज्या पुऱ्या केलेल्या आहे त्या एकेक मिक्सरमध्ये घालून त्याचा बारीक भुगा करून घ्या.
आता हा केलेला भुगा पाकामध्ये घाला. पुन्हा गॅस थोडासा चालू करून त्याचा गोळा होईपर्यंत हलवत रहा.
एक चमचा आजूबाजूंनी तूप सोडा. आता गॅस बंद करा. मिश्रण जास्त कडक होऊ देऊ नये. लाडू कडक होतील.
मध्यम ठेवल्यास लाडू मऊसुद राहतील. आता या मिश्रणामध्ये काजू बदाम वेलची पूड घालून एकत्र करा.
आता हाताला तूप लावून छान छोटे छोटे लाडू वळून घ्या. हे लाडू साधारण सात ते आठ दिवस बाहेर राहतात.
नंतर साठवणूक करायची असल्यास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात.. आपले आजीच्या हाताच्या चवीचे बेसन पुरीचे लाडू तयार आहे…..
टिप्स(Tips) :-
साखरेचा पाक पक्का होऊ देऊ नका. पाक पक्का झालाकी लाडू कडक होतील.
वेळ आणि परिमाण (Time and Quantity)::
तयारीची वेळ – 30 मिनीटे
एकूण वेळ – १ तास १५ मिनीटे
परिमाण – साधारण २०-२५ लाडू
Tags/Keywords
#BesanLadoo
#BesanLadooRecipe
#TraditionalBesanLadoo
#GrandmaStyleRecipe
#GrandmasRecipe
#HomemadeBesanLadoo
#IndianSweets
#TraditionalSweets
#MaharashtrianRecipes
#MaharashtrianFood
#DiwaliFaral
#DiwaliSweets
#IndianDesserts
#GramFlourLadoo
#BesanKeLaddu
#HomemadeSweets
#FestiveRecipes
#TraditionalIndianFood
#SweetRecipes
#SwaadGharcha
#SwaadGharCha, #SweetCravings, #HomemadeDessert, #MaharashtrianSweets, #MarathiFood, #HomemadeRecipe








1 comment
[…] Previous Next […]