१ किलो या प्रमाणामध्ये उपवासाची गुलाबजाम (रताळ्याचे)

by Vaishali Chaudhari
10 views

१ किलो या प्रमाणामध्ये उपवासाची गुलाबजाम (रताळ्याचे)


प्रस्तावना:::

यापूर्वी मी गुलाबजाम ची रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे…. परंतु आज मी एक किलो या प्रमाणामध्ये रेसिपी तुम्हाला सांगणार आहे…


साहित्य:::

  • १ किलो रताळे
  • ३०० ग्राम मिल्क पावडर
  • ४ हिरवी वेलची पूड
  • तळण्यासाठी साजूक तूप
  • पाकासाठी ७०० ग्राम साखर
  • पाणी


कृती:::

रताळे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या त्याची माती संपूर्ण काढून घ्या… त्यानंतर रताळ्याचे काप करून घ्या त्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी उकळून घ्या …..

त्यावर चाळणीमध्ये रताळे ठेवा त्यावर झाकण ठेवा..आणि पंधरा मिनिटे वाफवून घ्या… पंधरा मिनिटे झाल्यानंतर गॅस बंद करा आणि रताळ्याची साल काढून घ्या..

हे रताळे चाळणीच्या साह्याने किसून घ्या… किसून घेतल्यानंतर त्यामध्ये 300 ग्राम इतकी मिल्क पावडर घाला….

मिल्क पावडर घातल्यानंतर मिश्रणाचा गोळा चांगला मळून घ्या त्याला थोडा तुपाचा हात लावा… तुपाचा हात लावून त्याचे लहान लहान गोळे तयार करून घ्या…

एका पातेल्यामध्ये 700 ग्राम साखर घेऊन त्यामध्ये दोन ग्लास इतके पाणी घाला आणि साखरेचा पाक तयार करून घ्या हा पाक एकतारी पेक्षा कमी करावा पाक एकदम घट्ट करू नये….

त्यामध्ये वेलची सोलून वेलचीची पूड कुटून साखरेच्या पाकामध्ये घाला….आता एका कढईमध्ये तूप गरम करण्यास ठेवा…

तूप गरम झाल्यानंतर सर्वप्रथम दोनच गुलाबजाम तळून बघा ते गुलाबजाम विरघळले किंवा वितळले नाही तर सर्व गोळे करून घ्या…

आणि तुमची गुलाबजाम थोडे वितळत असतील तर त्यामध्ये अजून 50 ग्रॅम इतकी मिल्क पावडर तुम्ही घालू शकता…..

या पद्धतीने गोळे करून सर्व गुलाबजाम तांबूस रंगावर तळून घ्या… तळलेले गुलाबजाम जसे जसे तळून होतील तसे तसे पाकामध्ये घालत जा म्हणजे ते गुलाबजाम पाकामध्ये मुरतील…

हे गुलाबजाम सर्व तळल्यानंतर पाकामध्ये न घालता जसे तळून झाले तसेच पाकामध्ये घालावे… सर्व गुलाबजाम तळून झाले की मग त्यावर झाकण ठेवून दोन तास गुलाबजाम तसेच ठेवून द्यावे…

त्यानंतर गुलाबजाम मध्ये पाक चांगला मुरलेला असेल आपले गुलाबजाम आता तयार झालेले आहेत तर उपवासाचे गुलाबजाम तयार आहे….


टिप्स:::

इथे मी तीनशे ग्रॅम मिल्क पावडर सांगितली आहे.. कारण आपण ज्या वेळेस गुलाबजाम करतो त्यावेळेस कधीकधी गुलाबजाम विरघळतात …….

त्यामुळे मिल्क पावडर चे कधी कधी रताळी धाग्यांवाले निघतात ते थोडे चिकटअसतात त्यामुळे मिल्क पावडर चे प्रमाण जास्त लागतेप्रमाण कमी जास्त करावे लागते…

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

10995

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.