साबुदाणा वडा

by Vaishali Chaudhari
2 views

साबुदाणा वडा


प्रस्तावना:::

उपवासाला बऱ्याचदा साबुदाणा खाऊन कंटाळा आलेला असतो त्या ऐवजी मुलांना साबुदाणा वडा करून दिला तर किती छान!!! मला अगदी आवडीने खातील!!!


साहित्य:::

  • एक मोठी वाटी साबुदाणा
  • तीन बटाटे
  • दहा ते बारा बारीक हिरव्या मिरच्या
  • एक वाटी शेंगदाणे
  • मीठ चवीप्रमाणे
  • तळण्यासाठी तेल


कृती:::

साबुदाणा रात्री पाण्यात भिजवून घ्या…. साबुदाणा वडा तयार करताना साबुदाणा चांगला भिजलेला हवा त्यामुळे वडे अगदी चांगले होतात….

तसेच साबुदाणा भिजवताना साबुदाण्याच्या वर साधारण एक पेड इतके पाणी राहील या पद्धतीने साबुदाणा भिजवावा….

बटाटे सोलून घ्या आणि त्याचा बारीक असा कीस पाडून घ्या…. मिक्सर मधून हिरव्या मिरच्या बारीक फिरवून घ्या….

खरपूस भाजून घ्या शेंगदाण्याचे साल काढून घ्या मिक्सरमध्ये शेंगदाण्याचे कूट करून घ्या…. त्यानंतर भिजलेल्या साबुदाणा मध्ये किसलेला बटाट्याचा कीस घाला….

त्यावर मिरचीचा खुराडा घाला…. त्यानंतर त्यावर शेंगदाण्याचे कूट घाला कूट बारीकच हवे त्यामुळे वड्यांना चांगले एकसंध होण्यास मदत होते….

सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र केले की त्याचा चांगला गोळा तयार करून घ्या… या मिश्रणामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला मीठ चांगले योग्य प्रमाणात घाला त्यामुळे वडा व्यवस्थित फुगतो…

कमी मिठाचा वडा बऱ्याचदा फुगत नाही… आता हाताला पाणी लावून त्याचे लहान लहान गोळे तयार करून घ्या….


एक जाडसर बॅग घेऊन त्याला पाण्याचा हात लावा आणि त्यावर वडा तयार करून घ्या…

त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या त्यामध्ये हळूच हातावर घेऊन हा वडा कढईमध्ये तेलात सोडा…

झाऱ्याच्या साह्याने वड्यावर तेल सोडा म्हणजे वड्या चांगला फुगून येईल… आता वड्या दोन्ही बाजूने चांगला तळून घ्या…

या पद्धतीने सर्व वडे तळून घ्या आणि हे उपवासाच्या चटणी सोबत खायला एकदम अप्रतिम लागतात किंवा तळलेल्या मिरची सोबत सुद्धा तुम्ही हे सर्व्ह करू शकतात….

(इथे मी बटाट्याचा कीसचा वापर केलेला आहे… तुम्ही त्याऐवजी ते बटाटे उकडून सोलून त्याचा लगदा करून सुद्धा साबुदाण्याच्या वड्यांच्या मिश्रणामध्ये घालू शकतात परंतु हे वडे थोडे तेलकट होतात)

आपले गरमागरम साबुदाण्याचे वडे तयार झाले आहे….


टिप्स::

साबुदाणा वडे तयार करत असताना बटाट्याचा कीस घातल्यानंतर वडे अत्यंत खमंग होतात…. तेलकट होत नाही…..


वेळ व परिमाण::


तयारीची वेळ::२० मिनिटे
एकूण वेळ::४० मिनिटे
परिमाण::३ जणांसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

10995

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.