पारंपरिक ओल्या नारळाची तोंडात विरघळणारी मऊ वडी !! Coconut Vadi

by Vaishali Chaudhari
1 views

पारंपरिक ओल्या नारळाची तोंडात विरघळणारी मऊ वडी !! Coconut Vadi


प्रस्तावना (Introduction):::

ओल्या नारळाची वडी ही पूर्वीपासून तयार केली जाणारी तसेच पारंपारिक अशी रेसिपी आहे खोबऱ्याची वडी अत्यंत प्रसिद्ध अशी रेसिपी आहे…..

कारण त्या भागामध्ये नारळ खूप प्रमाणात असतात त्यामुळे सर्व गोष्टींमध्ये ते नारळाचा चव वापरतात…. आणि नारळ पासून तयार केलेले गोड पदार्थ तसेच भाज्या असे वेगवेगळे पदार्थ तिथे तयार केले जातात त्यातलाच हा एक प्रकार म्हणजे ओल्या नारळाच्या वड्या…..

खास करून नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन किंवा आपण कुठल्याही सणाला गोड म्हणून नारळाच्या वड्या तयार केल्या जातात जसे की दिवाळीला ओल्या नारळाचे लाडू ओल्या नारळाच्या वड्या असे वेगवेगळे प्रकार तयार केले जातात…. हे वड्या साधारण एक महिना टिकतात….

पारंपरिक ओल्या नारळाची तोंडात विरघळणारी मऊ वडी !! Coconut Vadi


साहित्य (Ingredients)::::

पारंपरिक ओल्या नारळाची तोंडात विरघळणारी मऊ वडी !! Coconut Vadi – फोटो 2
  • एक मोठा नारळ
  • पाऊण वाटी साखर (अर्धी वाटी आणि पाव वाटी)
  • पाच ते सहा वेलची अर्धी वाटी ताजी मलाई


वड्यांची पूर्वतयारी (Starting Preparation):::


सर्वप्रथम मोठा नारळ घेऊन तो छान स्वच्छ सोलून घ्या त्यानंतर नारळ फोडून घ्या… नारळ फोडल्यानंतर त्याचे दोन भाग होतात….

तुम्ही खवणीच्या साह्याने नारळाचा किस तयार करून घेऊ शकतात म्हणजे नारळाचा जो बाहेरील काळा भाग असतो तो यामध्ये येणार नाही….

किंवा दुसरे असे नारळाच्या तुकडे करून घ्या आणि शिर्डीच्या साह्याने तुम्ही खोबऱ्या वरील काळा भाग काढून घ्या…. आणि खोबऱ्याचे एकदम बारीक काप करून घ्या आणि ते मिक्सरमध्ये फिरवून त्याचा अगदी बारीक किस तयार करा…..

पारंपरिक ओल्या नारळाची तोंडात विरघळणारी मऊ वडी !! Coconut Vadi – फोटो 3


कृती ( Procedures)::


खोबऱ्याचा कीस हा एकदम बारीक तयार करून घ्यायचा आहे…. खोबऱ्याचा कीस तयार केल्यानंतर कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घाला आणि तूप गरम झाले की मग त्यामध्ये खोबऱ्याचा कीस घाला……

पारंपरिक ओल्या नारळाची तोंडात विरघळणारी मऊ वडी !! Coconut Vadi – फोटो 4

खोबऱ्याचा कीस घातल्यानंतर आपल्याला लगेचच त्यामध्ये अर्धी वाटी मलई घालायची आहे इथे तुम्ही ताज्यामलईचा वापर करू शकतात….

पारंपरिक ओल्या नारळाची तोंडात विरघळणारी मऊ वडी !! Coconut Vadi – फोटो 5

किंवा तुमच्याकडे खवा असल्यास 50 ग्रॅम इतका खवा तुम्ही या मिश्रणामध्ये घालू शकतात खव्याची नारळाची बर्फी चवीला एकदम अप्रतिम लागते…..

पारंपरिक ओल्या नारळाची तोंडात विरघळणारी मऊ वडी !! Coconut Vadi – फोटो 6

मी इथे मलाई चा वापर केलेला आहे त्यानंतर तुम्ही पाऊण वाटी इतकी साखर घाला…. आता या वड्यांचे मिश्रण सतत ढवळत रहा कढईला खाली चिकटू देऊ नका…..

हे मिश्रण सतत ढवळत राहिल्यामुळे ते खाली चिकटत नाही हळूहळू साखर वितळून आणि मलई सुद्धा विरघळून त्याला पाणी सुटेल….

पारंपरिक ओल्या नारळाची तोंडात विरघळणारी मऊ वडी !! Coconut Vadi – फोटो 7

आणि मिश्रण पातळ होईल आता हे मिश्रण सतत ढवळत रहा हळुवारपणे ते घट्टसर होण्यास सुरुवात होईल साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर आपल्याला मिश्रण सतत ढवळत राहायचे आहे….

जोपर्यंत या मिश्रणाचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचे आहे… या मिश्रणामध्ये पाच ते सहा वेलचींची पूड घाला…

मिश्रण तयार झाले हे कसे समजावे ते कढईला साखर म्हणजेच पांढरट पणा आला की आपले मिश्रण तयार होते आणि शिवाय गोळ्याचे मिश्रण ढवळत राहण्यास कठीण जाते…..

पारंपरिक ओल्या नारळाची तोंडात विरघळणारी मऊ वडी !! Coconut Vadi – फोटो 8

म्हणजेच हे मिश्रण तयार झाले आहे अजून दुसरी पद्धत अशी हाताला थोडे तूप लावून थोडा मिश्रणाचा गोळा घेऊन हातावर गोळी तयार होते का हे बघा गोडी जर तयार झाली तर मिश्रण आपले तयार झालेले आहे…..

एका ताटाला तूप लावून घ्या ताटाला तूप लावल्यानंतर आपण तयार झालेला नारळाच्या वळ्यांचा गोळा ताटामध्ये घाला आणि हातामध्ये पॉलिथिन बॅग घाला….

पारंपरिक ओल्या नारळाची तोंडात विरघळणारी मऊ वडी !! Coconut Vadi – फोटो 9

त्या बॅगला थोडे तूप लावून घ्या आणि झटपट असे हे मिश्रण थापून घ्या कारण हे मिश्रण लगेच सेट होते….

आता एखाद्या वाटीला खालून तूप लावून घ्या आणि ती वाटी त्यावरून फिरवा म्हणजे अगदी छान असा वरील भाग एकदम एक सारखा होईल आता सुरीला तूप लावून घ्या….

पारंपरिक ओल्या नारळाची तोंडात विरघळणारी मऊ वडी !! Coconut Vadi – फोटो 10

आणि त्याच्या छान अशा चौकोनी आकारामध्ये वड्या पाडून घ्या….. गरम असतानाच या वड्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहे जेणेकरून वड्यांचा भुगा होणार नाही….

पारंपरिक ओल्या नारळाची तोंडात विरघळणारी मऊ वडी !! Coconut Vadi – फोटो 11

वड्या पाडल्या नंतर थोड्या वेळाने वड्या काढा…. आपल्या छानशा तोंडात विरघळणाऱ्या मऊ वड्या तयार झालेल्या असतील….

या वड्या थंड झाल्या की एकदम छान तयार होतात….. या चवीला अगदी अप्रतिम लागतात…. आपल्या ओल्या नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत…..


टिप्स/Tips:::

वड्या तयार करत असताना आपले वड्यांचे मिश्रण हे किती शिजवायचे आहे हे कसे समजेल??? तर हे मिश्रण शिजवत असताना म्हणजे ज्यावेळेस हे मिश्रण तयार होते त्यावेळेस कढईच्या आजूबाजूला ज्याप्रमाणे पिठीसाखर असते त्याप्रमाणे साखर चिकटते आणि पांढरे होते म्हणजेच आपला गोळा तयार होण्यास सुरुवात झालेली आहे असे समजावे आणि हातावर घेऊन त्याची गोळी तयार करून बघावी. म्हणजे आपले मिश्रण तयार झाले….


वेळ आणि परिमाण/Time and Quantity::


तयारीची वेळ::१५ मिनिटे
एकूण वेळ::४० मिनिटे
परिमाण::२५० ग्रॅम


टॅग्स आणि कीवर्ड Tags/ Keyword::

#, #SwaadGharCha, #IndianRecipes, #HomemadeFood, #EasyCooking, #MarathiFood, #HomemadeRecipe

You may also like

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.