मऊ आणि सोपी ज्वारीची भाकरी चिरा न जाता तयार होणारी !!Jwarichi Bhakari

by Vaishali Chaudhari
1 views

रेसिपी नाव (Racipe Name)

मऊ आणि सोपी ज्वारीची भाकरी चिरा न जाता तयार होणारी !!Jwarichi Bhakari

फोटो/Photo::


प्रस्तावना (Introduction)::


ज्वारीची भाकरी ही भाकरी म्हणजे एक अमृतच होय… म्हणजे कारण ज्वारीच्या भाकरीमध्ये खूप सारी व्हिटॅमिन असतात….ज्वारीमध्ये भरपूर फायबर (तंतुमय पदार्थ) असतात, ज्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते आणि पचनक्रिया सुधारते.


साहित्य (Ingredients)::

  • १ मोठी वाटी ज्वारीचे पीठ,
  • चवीप्रमाणे मीठ
  • १ वाटी गरम पाणी


कृती ( Procedures)::

एक वाटी ज्वारीचे पीठ घ्या… ज्वारीच्या पिठामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला म्हणजे भाकरी अगदी चवदार लागते… ते व्यवस्थित मिक्स करून घ्या…

आणि एका पातेल्यामध्ये कडकडीत गरम पाणी घाला….. पिठाचे आणि करून घ्या त्यामध्ये गरम पाणी घाला आणि सरटयाच्या साह्याने हळूहळू मिक्स करा….

पीठ थोडे थंड झाले की लगेचच त्याचा गोळा मरून घ्या पीठ जास्त गार करायचे नाही गरम गरम असतानाच त्याचा गोळा मळून घ्यायचा थोडा थंड पाण्याचा हात घेऊन लगेचच गोळा मळून घ्यावा म्हणजे हाताला चटके लागणार नाही….

आणि ज्वारीचा चांगला गोळा मळून घ्या गोळा मळल्यानंतर ताटाला खाली पीठ घाला आणि गोळा हळूहळू थापून घ्या गोल चटकदार भाकरी तयार करा….

तुम्हाला भाकरी थापता येत नसल्यास तुम्ही पोळीपाटावर थोडे पीठ भुरभुरा आणि गोळा ठेवून त्यावर थोडे पीठ घाला … भाकरी लाटून घ्या …..

गोळा तयार केल्यानंतर तुम्ही पोळी पाटावर पीठ घालून तो गोळा ठेवून लाटून सुद्धा घेऊ शकता….. भाकरी झाल्यानंतर तवा गरम करा तवा चांगला गरम झाला की त्यावर भाकरी घाला …..

आणि वरून थोडे पाणी घेऊन सर्व भाकरीला पाणी लावून घ्या… पाणी पूर्णपणे भाकरीला लागले पाहिजे नाहीतर भाकरीला तडे जातील…

आता वरचं पाणी थोडे कोरडे झाले की लगेच भाकरी पलटून घ्या…. भाकरी पलटली की मग दोघं बाजूने भाकरी चांगली शेकून घ्या….

भाकरी शेकली की मग ती फुलल्यानंतर भाकरी काढून घ्या ….गरमागरम ज्वारीची भाकरी तयार झाली आहे…..

ही भाकरी तुम्ही हिरव्या भाजीसोबत किंवा कुठल्या कोरड्या भाजी सोबत तुम्ही खाऊ शकतात…. किंवा कुठेही प्रकारच्या चटणी सोबत खाऊ शकतात….

किंवा कुठल्याही रस्सा भाजी सोबत छान मोडून तुम्ही खाऊ शकता…..


टिप्स /Tips::

भाकरीचे पीठ भिजवताना गरम पाण्यामध्येच भाकरी पीठ कारण थंड पाण्यामध्ये पीठ आपण भिजवल्यास भाकरीला तळा जातात आणि आजूबाजूने भाकरी चिरली जाते आणि भाकरीचे तुकडे सुद्धा होऊ शकतात…

अगदीच तुम्हाला भाकरी जमत नसल्यास तुम्ही एक वाटी ज्वारीचे पीठ घेतले आहे त्यामध्ये थोडे दोन चमचे इतके गव्हाची कणिक घालू शकता आणि मग पीठ मळून घेऊ शकता….


वेळ आणि परिमाण (टाइम And Quantity):::


तयारीची वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ::४० मिनिटे
परिमाण:: १व्यक्तींसाठी

Tags/Keyword::

, #SwaadGharCha, #IndianRecipes, #HomemadeFood, #EasyCooking, #MarathiFood, #HomemadeRecipe

अजून काही अशा भाकरी racipe

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

16058

Edtiors' Picks

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.