आलू पराठा

by Vaishali Chaudhari
107 views

🥘 १. रेसिपीचं नाव

आलू पराठा

📸 २. फोटो / फीचर्ड इमेज :

३. प्रस्तावना

थोडक्यात त्या पदार्थाबद्दल माहिती — हा खाद्य पदार्थ सर्व ऋतूत बनवतात,

📝 ४. साहित्य (Ingredients)

  • 4 हिरवी मिरची,
  • 3 लसूण पाकळी, छोटे आले तुकडा,
  • कोथींबीर,
  • चिमूटभर हळद
  • मीठ चवीप्रमाणे,
  • तूप कणिक,
  • तेल, पाणी

इथे फोटोमध्ये काही पदार्थ दाखवायचे राहून गेले असल्यास माफ करा. पण मी ते साहित्य मध्ये लिहून दिलेले आहे.

🔥 ५. कृती (Steps)

दोन बटाटे कुकरमध्ये लावून दोन तीन शिट्या घेऊन उकळवून घ्या. कुकरची वाफ निघाल्यानंतर बटाटे थंड झाले की त्याचे साल काढून घ्या.

साल काढल्यानंतर बटाटे बटाटे चांगले स्मॅश करून घ्या किंवा बारीक किसून घ्या. आता आपण चटणी करून घेणार आहोत.

एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन लसूण पाकळी अद्रकाचा छोटा तुकडा चार हिरव्या मिरच्या ची पेस्ट करून घ्या.

एका कढईमध्ये थोडे तेल गरम करा. त्यामध्ये अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घालून चांगली परतून घ्या.

त्यामध्ये थोडी हळद घाला. आता आपण उकडलेल्या बटाट्याचा लगदा त्यामध्ये घालून चांगले परतवा. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला.

वरून चिरलेली कोथिंबीर घाला. आता गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या.

एका परातीमध्ये कणिक घेऊन त्यामध्ये मीठ घालून चांगली पूर्णाला जशी कणिक आपण भिजवतो तशी मऊसूत कणीक भिजवून घ्या.

कणिक मऊ असेल तर पराठा फाटणार नाही. किंवा तुटणार नाही. कणिक मुरण्यास साधारण 15 मिनिटे झाकण ठेवून द्या.

कणकेचे छोटे छोटे गोळे बनवा. तसेच आपण केलेल्या बटाट्याच्या मिश्रणाचे सुद्धा छोटे छोटे गोळे बनवा.

गोळे बनवल्यानंतर आता तवा तापण्यास गॅसवर ठेवा. आता कणकेचा गोळा घेऊन तो थोडा लाटून घ्या त्यामध्ये बटाट्याचा लगद्याचा एक गोळा भरून घ्या.

कोणाची पारिप्रमाणे आपण बंद करतो त्याप्रमाणे बंद करून गोळा तयार करून घ्या. आता याचा गोल पराठा लाटून घ्या.

पराठा तव्यावर घाला व दोन्ही बाजूंनी चांगला खरपूस शेकून घ्या. पराठ्याला दोन्ही बाजूस तूप लावा. ज्याला तू आवडत नसेल त्यांनी तेलही लावले चालेल.

पराठा चांगला खरपूस भाजा. आता हा आपला पराठा खाण्यास तयार झालेला आहे. आलूचा पराठा आपण दही सोबत खाऊ शकतो .

तसेच चिंचेच्या चटणी सोबत खाऊ शकतो खजुराच्या चटणी सोबत खाऊ शकतो टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकतो.

नाश्त्याला तर अत्यंत सोपा असा पदार्थ आहे. चला तर मग आपण आता एन्जॉय करूया आलू पराठा.

(यामध्ये तुम्ही अर्धी कणिक आणि अर्धी वाटी मैदा असाही वापर तुम्ही करू शकतात. कारण मैदा घातल्यानंतर लवचिकता वाढते त्यामुळे पराठा फाटण्याची भीती कमी होते. पण कणकेचा ही पराठा जर कणिक चांगली मुरली असल्यास पराठा फाटत नाही.) (सर्व साहित्य मेझरींग कप व बाकी स्पून ने मेझर केलेले आहे)

💡 ६. टिप्स (Cooking Tips)

इथे बटाट्याचा पराठा करताना मी कणीक जी भिजवायला सांगितलेली आहे ती भिजवताना पाण्याचा जास्त वापर करायचा मात्र कणिक चांगली मळायची हाताला तेल लावून ती चांगली लांबून घ्यायची म्हणजे तिच्यामध्ये वाघ तयार होईल आणि आपला पराठा फाटणार नाही.

🍽️ ७. सर्व्हिंग सुचना (Serving Suggestion)

सॉससोबत सर्व्ह करणे

🕒 ८. वेळ व परिमाण

• तयारीची वेळ: १० मिनिटे
• शिजवण्याची वेळ: १५ मिनिटे
• एकूण वेळ: २५ मिनिटे
• परिमाण: २ जणांसाठी

❤️ ९. निष्कर्ष / लेखकाची टिप्पणी

हा पदार्थ आरोग्यदायी, झटपट आणि पारंपरिक चवीचा आहे. आठवड्याच्या शेवटी नक्की करून बघा!

📚 १०. टॅग्स / कीवर्ड्स

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

11638

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.