खुसखुशीत अशी करंजी
प्रस्तावना:::

करंजी खुसखुशीत कशी होईल त्यासाठी काय काय साहित्य लागेल ते आपण सर्वप्रथम बघणार आहे…. करंजी वरचा लेयर एकदम खमंग लागायला हवा…
साहित्य:::

- एक वाटी मैदा
- एक वाटी खोबऱ्याचा कीस
- अर्धी वाटी पिठीसाखर
- पाच ते सहा बदाम
- पाच ते सहा काजू
- पंधरा ते वीस चारोळी
- दोन ते तीन हिरवी वेलची
- तळण्यासाठी तेल
- मोहन देण्यासाठी दोन चमचे इतके तूप
- आणि चिमूटभर मीठ
कृती:::
सर्वप्रथम आपण करंजी मध्ये भरायचे सारण तयार करून घेऊ… करंजी तयार करत असताना खोबऱ्याचा कीस तयार करून घ्या…

करंजीचे सारण:::
वेलची बारीक पूड करून घ्या काजू बदामचे काप करून घ्या… खोबऱ्याच्या किस मध्ये बारीक पिठीसाखर अर्धी वाटी घाला त्यामध्ये काजू-बदामाचे काप घाला…

त्यामध्ये चारोळी घाला वेलची पूड आणि बदाम काजूचे काप मिक्स करून घ्या… आपले सारण आता तयार झाले आहे…
करंजी करण्यासाठी पाती:::
एक वाटी मैदा परातीमध्ये घालून त्यामध्ये चिमूटभर असे मीठ घाला.. त्यानंतर दोन चमचे मोहन घाला.. दोन्ही हातांनी मोहन चांगले मैद्याला चोळून घ्या…

मैद्याचे लाडू तयार होईल इतपत आपल्याला मोहन घालायचे आहे… जर कमी वाटत असल्यास आणखी एक चम्मच तूप घाला…
त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून गोळा तयार करून घ्या… आता हा गोळा पाच मिनिटे मळून घ्या… गोळा पाच मिनिटे तसाच राहू द्या…

गोळ्या मुरल्यानंतर त्याचे गोळे तयार करून घ्या पुऱ्या लाटून घ्या……

तुमच्याकडे करंजीचा साचा असल्यास करंजीच्या साच्याला पुरी ठेवून त्यामध्ये आपण तयार केलेले खोबऱ्याचे सारण भरा आणि पाणी लावून त्याच्या पाठ बंद करा….

तसेच एक नवीन प्रकार म्हणजेच पीळाची करंजी ती मी तुम्हाला करून दाखवणार आहे सर्वप्रथम पुरीच्या अर्ध्या भागात सारण करावे आणि आजूबाजूला काठांना पाणी लावून घ्यावे….

आणि दोन्ही काठ बंद करावे आणि तिरकस असे फोल्ड करत जावे त्यामुळे पीळाची अशी करंजी तयार होते… करण्यास थोडा वेळ लागतो पण दिसायला एकदम सुबक दिसते…
आता करंजी सर्व आपण तयार करून घेऊ.. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घ्या किंवा तुम्ही साजूक तुपामध्ये सुद्धा या करंज्या तळू शकतात…

पण मी तेलाचा वापर केलेला आहे तेल गरम झाल्यानंतर आपली करंजी तांबूस रंग येईपर्यंत दोघं बाजूने तळून घ्या…

आपली खमंग अशी करंजी तयार झालेली आहे…
टिप्स :::
करंजीचे पीठ मळताना मोहन तेलाची किंवा तुपाचे अवश्य घालावे त्यामुळे करंजी खुसखुशीत लागते बाहेरील आवरण खुसखुशीत होते आणि खमंग लागते…
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ :१०मिनिटे
एकूण वेळ ::४०मिनिटे
परिमाण 10 ते 12 करंज्या
