रोट स्पेशल सांबारि डाळ

by Vaishali Chaudhari
1 views

रोट स्पेशल सांबारि डाळ

चण्याची पातळ भाजी मिरची चा वापर न करता तरीही एकदम अप्रतिम अशी चविष्ट भाजी


प्रस्तावना:::

रोटांना तयार केलेली जाणारी सांबरी डाळ ही अत्यंत उत्कृष्ट लागते…
पूजेसाठी ही आवर्जून लागते….


साहित्य::

  • एक वाटी हरभऱ्याची डाळ
  • तीस ते पस्तीस खोबऱ्याचे काप
  • दहा ते बारा लसूण पाकळ्या
  • अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
  • दहा लवंग
  • दहा मिरे
  • पाच कापूर चिनी
  • दोन हिरवी वेलची
  • एक दालचिनीचा तुकडा
  • एक चक्रीफुल
  • एक चमचा खसखस
  • एक तेजपान
  • पाव चमचा हळद
  • पाव चमचा जिरे
  • पाव चमचा धणापूड
  • कोथिंबीर
  • फोडणीसाठी तेल
  • चवीप्रमाणे मीठ


कृती:::

हरभऱ्याची झाड दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. दहा मिनिटे तिला भिजत ठेवा…. हरभऱ्याची डाळ कुकरमध्ये घालून त्यामध्ये पाणी घालून पाच ते सहा शिट्टी घेऊन शिजवून घ्या…

नंतर ही डाळ बाहेर काढून तिला वळणाप्रमाणे लोणून घ्या…..


मसाला तयार करण्याची पद्धत::;


सर्वप्रथम खोबऱ्याचे काप तव्यावर भाजून घ्या… मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरे घाला त्यामध्ये लसूण पाकळ्या तसेच अद्रकाचा तुकडा लवंग मिरे कापूरचीनी हिरवी वेलची तेजपान खसखस दालचिनी चक्रीफुल पाव चमचा धनापूर पाव चमचा जिरे घाला…

सर्वप्रथम हे मिश्रण कोरडे वाटून घ्या.. नंतर त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्या…

जर तुम्ही पूजेसाठी करत असाल तर इथे तेलाचा वापर करू नका कढई डायरेक्ट गरम करा आणि चटणी बिना तेलाची परतवा….

पूजेचे नसल्यास कढईमध्ये थोडे तेल घाला जिरे घाला आणि त्यामध्ये तेल सुटेपर्यंत चटणी परतवा… ज्यावेळेस आपण बिना तेलाची चटणी परतवतो…..

त्यावेळेस चटणीला तेल सुटेपर्यंत चटणी परतायची आहे… आणि बिना तेलाच्या चटणी परतवणीच्या वेळेस चटणीचा रंग तांबूस येईपर्यंत परतवत राहा सतत ढवळत रहा….

त्यामध्ये पाव चमचा हळद घाला …. नंतर त्यामध्ये डाळीचे मिश्रण घाला…. त्यामध्ये आवडीप्रमाणे गरम पाणी घाला पातळ करा….

भाजीला चांगला दोन ते तीन उकळ्या येऊ द्या… भाजीला उघड्या आल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला…

मीठ घातल्यानंतर पुन्हा दोन ते तीन उकळ्या येऊ द्या अर्धवट झाकण ठेवा आता त्यावर चिरलेली कोथिंबीर घाला…

दोन ते तीन उकड्या आल्यानंतर भाजीचा गॅस बंद करा… आपली सांभारी दाळ तयार झाली आहे….


टिप्स:::

मसाला परतवत असताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते कारण बिना तेलाची मसाला पसरवताना तो लावून जाऊ नये यासाठी सतत तो ढवळावा लागतो…


वेळ आणि परिमाण::


तयारीची वेळ::२० मिनिटे
एकूण वेळ::५० मिनिटे
परिमाण::४व्यक्तीसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

13390

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.