रोट(जाड ठेंगी पोळी)

by Vaishali Chaudhari
0 views

रोट(जाड ठेंगी पोळी)


प्रस्तावना:::

रोट सर्वांकडेच असतात असे नाही परंतु काही जणांना या गोष्टी खायला आवडतात त्यामुळे तुम्ही त्या रेसिपी बघून नक्कीच बनवू शकतो., ही रोड कशी बनवायची ते आपण सर्वप्रथम बघू…


साहित्य ::

  • 12 पोळ्यांना लागते इतपत कणिक पाणी


कृती:::

सर्वप्रथम परातीमध्ये कणिक काढून घ्या.. या रोटांना कुठल्याही प्रकारचे आपण तेलाचा वापर करणार नाही…

म्हणूनच याला ठेंगी पोळी किंवा रोट असे म्हणतात… कणिक भिजवताना सुद्धा आपण इथे तेल याचा वापर करणार नाही…

पाणी घेऊन ज्याप्रमाणे नेहमी कणिक मळतो त्याप्रमाणे कणिक मळून घ्या त्याला तेल लावायचे नाही कणिक भरपूर वेळ मिळून घ्या आणि तिला मऊ करा…

त्यानंतर दहा मिनिटे कणिक तशीच मुरू द्या… आता त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या.. आणि हे ज्याप्रमाणे पोळी लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्या मात्र त्याला तेल लावायचे नाही…

आणि ही पोळी थोडी जाडसरच ठेवा… आणि तव्यावर दोघ बाजूने ती शिकून घ्या तवा काढून गॅसच्या आचेवर तुम्ही ते भाजू शकता…

या पद्धतीचा हा रोट तुम्ही पंजाबी डिशेस सोबत सुद्धा खाऊ शकतात एकदम हेल्दी आहे कारण यामध्ये कुठल्याही मैद्याचा वापर केलेला नाही …..

त्यामुळे आपण हा पंजाबी भाजी सोबत सुद्धा खाऊ शकतो…हे रोट गंगा फळाच्या भाजी सोबत किंवा संभारी डाळ सोबत आपण खाऊ शकतो…

याप्रमाणे सर्व रोट आपल्याला तयार करून घ्यायचे आहे… सोबतच इथे मी दिवे सुद्धा तयार करून घेतलेले आहे कारण आमच्याकडे पूजेला दिवे ही लागतात….

आपले गरमागरम रोट किंवा ठेंगीरोटी तयार झालेली आहे…


टिप्स:::

कणिक भिजवताना किंवा मळताना तिला व्यवस्थित मळावी कारण त्यामुळे तरोट चांगले तयार होतात….

वेळ व परिमाण::


तयारीची वेळ:: १०मिनिटे
एकूण वेळ::३० मिनिटे
परिमाण::११ मोदक

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

13390

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.