मोतीचूर मोदक

by Vaishali Chaudhari
0 views

मोतीचूर मोदक


प्रस्तावना:::

मोतीचूर मोदक बनवण्याची पद्धत ही अत्यंत सोपी हवी… परत आपल्याला सोप्या पद्धतीने ते बनवता येतील…. मोदक बनवताना त्याची बुंदी कशी काढायची किंवा बुंदी नको पाडतात त्याची दाणे कसे पडतील हे आपण बघू ..


साहित्य::

  • एक वाटी बेसन
  • एक वाटी पाणी
  • 3/4 वाटी साखर
  • चांदीचा वर
  • दोन ते तीन थेंब फूड कलर
  • तळण्यासाठी तेल किंवा साजूक तूप


कृती:::

एक वाटी डोसा त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घाला आणि आपण भज्यांना भिजवतो त्याप्रमाणे भिजवून घ्या ना घट्ट न पातळ या पद्धतीने आपल्याला बेसनाचे घोल बनवायचा आहे…

आता साजूक तूप एका कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवा त्यामध्ये याची छोटी भजी किंवा चमच्याच्या साह्याने राहून राहून या पद्धतीने तुम्ही टाकून दोघं बाजूने व्यवस्थित चांगला तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्या…

आणि मिक्सरमध्ये याची जाडसर चुरा करून घ्या… एकदम जाड आणि एकदम बारीकही आपल्याला हा करायचा नाही दाणेदार करायचा आहे म्हणजेच आपली दाणेदार मोतीचूर चा मोदक तयार होईल…

एका बाजूला एका पातेल्यामध्ये 3/4 वाटी साखर आणि 3/4 वाटी पाणी घाला आणि साखर सतत ढवळत रहा…

याचा एक तारी पाक तयार झाला की मग त्यामध्ये आपण जे बेसनाचा चुरा तयार केलेला आहे हा दाणेदार असा चुरा आपल्याला या पाकामध्ये घालायचा आहे….

त्यामध्ये तुम्ही खरबुजाचे बीज घालू शकतात आणि व्यवस्थित एकत्र करून घ्या… आता हे मिश्रणाचा गोळा तयार झाला की मग गॅस बंद करा…

आणि मिश्रण थोडे गार होऊ द्या..


त्यानंतर मोदकाच्या साच्याला तूप लावून घ्या आणि या मिश्रणाचे मोदक तयार करा… आपले मऊ लुसलुशीत छान असे दाणेदार मोतीचूरचे मोदक तयार झाले आहे…

मला बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही नक्की करून बघा मोतीचूर मोदक!!!!

टिप्स::

रवणाची भजी तळत करत असताना त्याला अगदी तांबूस रंग येऊ द्यावा म्हणजे आपले मोतीचूरच्या लाडूला चांगली अशी चव येते….


वेळ व परिमाण::
तयारीची वेळ::२० मिनिटे
एकूण वेळ::५० मिनिटे
परिमाण::११मोदक

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

13362

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.