पान मोदक
प्रस्तावना::
ज्याप्रमाणे आपण पान खातो त्याप्रमाणेच आपल्या बापाला पान मोदक खाऊ घालूया…. पान खायची इच्छा झाली मग ती पान मोदकाने आपण पान मोदक करून पूर्ण करूया….
साहित्य:::
- विड्याची चार पाने
- दीडशे ग्रॅम खोबरा किस
- तीन चमचे मिल्क पावडर
- 80 ग्राम पिठीसाखर
- अर्धी वाटी दूध
- एक चमचा साजूक तूप
- एक चमचा शोप
- ४ चमचा गुलकंद
- एक चमचा छोटी तुटी फुटी
- काजू बदामाचे काप
कृती::::
सर्वप्रथम आपण मोदकांमध्ये भरण्याचे सारण तयार करून घेऊया… एका बाऊलमध्ये चार चमचे गुलकंद घालून त्यामध्ये टूटी फ्रुटी चे तुकडे आणि काजू बदामाचे काप एक चमचा सोप घालून व्यवस्थित एकत्र करून घेऊ…….
त्याचे लहान लहान अकरा गोळी तयार करून घेऊ…. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये विड्याचे पाने स्वच्छ धुऊन घ्या त्याचे तुकडे करून घ्या …….
आणि थोडा खोबरा कीस घाला आणि या खोबरा कीस सोबत हे पान मिक्सरमध्ये फिरवून घ्या त्यामध्ये थोडे दूध घाला …….
म्हणजे त्या मिश्रणाचा गोळा तयार होईल… हे मिश्रण बाऊलमध्ये काढा बाकीचे उरलेले खोबरे सुद्धा त्यामध्ये घाला ……
त्यामध्ये मिल्क पावडर आणि पिठीसाखर घाला आणि त्याचाही एक ते दोन चमचे दूध घालून चांगला गोळा तयार करून घ्या …..
गोळा तयार करत असताना दूध एकदम घालायचे नाही थोडे थोडे घालायचे तुम्हाला गरज वाटत असल्यास एक चमचा या पद्धतीनेच दूध घालावे ……
नाहीतर गोळा चिकट होईल…. आता मोदकाचा साच्याला साजूक तूप लावून घ्यावे खोबऱ्याचे मिश्रण आजूबाजूने दाबावे …..
आणि मध्ये आपण जो गुलकंदाचा गोळा तयार केला आहे तो घालून पुन्हा वरून खोबऱ्याचा मिश्रण घालून मोदक बंद करावा छान असा पान मोदक आपल्या तयार झालेला आहे…
आपण आपल्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी नक्की करून बघा पान मोदक!!!!
टिप्स:::
इथे तुम्ही मिश्रण तयार झाले की त्यामध्ये दोन ते तीन थेंब हिरवा फूड कलरचा वापर करू शकता मी इथे वापर केलेला नाही इथे नॅचरल पानाचा हिरवा रंग जितका आला आहे तितकाच वापरलेला आहे…. तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही पानाची कॉन्टिटी कमी जास्त करू शकतात इथे मी चार पानांचा वापर केलेला आहे तुम्ही सहा पानांचा सुद्धा वापर करू शकतात फक्त पानांच्या मोदकाची चव स्ट्रॉंग लागेल…
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ::१०मिनिटे
एकूण वेळ::३० मिनिटे
परिमाण::११ मोदक
