काजूचे मोदक
प्रस्तावना:::
काजूचे मोदक हे अत्यंत सोप्या पद्धतीने बनवायचे असतील तर ते कसे बनवायचे पाक न तयार करता ते कसे तयार करता येतील… याची पद्धत आपण आज बघणार आहे.. बऱ्याच जणांना पाक करायला जमत नाही किंवा तो बिघडतो त्यामुळे झटपट कसे मोदक तयार होतील ते आपण बघू….
साहित्य::
- 150 ग्रॅम काजू
- 75 ग्रॅम पिठीसाखर
- दोन चमचे मिल्क पावडर (50 ग्रॅम)
- अर्धी वाटी दूध
कृती:::
150 ग्रॅम काजू फ्रीजमध्ये ठेवले की ते कडक होतात…. आणि मिक्सरमध्ये घालून हळुवारपणे सिम सिम वर काजू फिरवून घ्यावे….
म्हणजे काजूला तेल सुटणार नाही काजूची एकदम बारीक पूड तयार होईल… किंवा दुसरे म्हणजे काजू तुम्ही भाजून घेऊ शकतात …..
आणि ते थंडगार करून घ्यायचे त्यानंतर मिक्सरमध्ये थोडे थोडे घालून मिक्सर बंद चालू बंद चालू करून त्याची पूड करून घ्यावी …..
सतत मिक्सरला लावल्यास त्याला तेल सुटेल… आता ही पूड चाळणीच्या साह्याने गाळून घ्या …. आणि नंतर एका बाऊलमध्ये हे मिश्रण काढा त्यामध्ये मिल्क पावडर आणि पिठीसाखर घाला…
आणि एक एक चमचा दूध घालून त्याचा गोळा तयार करून घ्या… दूध हे आपल्याला जितके लागेल तितकेच घालायचे आहे…..
पूर्ण अर्धी वाटी दूध एकदा वापरायचे नाही त्यातील एक एक चमचा घालून मगच गोळा मळायचा…. आता मोदकाच्या साच्याला तूप लावून घ्या …..
आणि या मिश्रणाचा गोळा घालून त्यामधून मोदक तयार करून घ्या अगदी सोप्या पद्धतीने काजूचे मोदक तयार होतील…
आपल्याला पाक तयार करायची गरज नाही… आणि कमी वेळेत हे आपले काजूचे मोदक तयार होतात.. काजूचे मोदक तयार केल्यानंतर तुम्ही वरून चांदीचा वर्क सुद्धा लावू शकतात…
त्यानंतर छानसे आपले मोदक तयार झाले आहे…
टिप्स:::
काजूचे मोदक तयार करत असताना बाहेर काजूचे बारीक पूड सुद्धा मिळते त्याचा वापर तुम्ही करू शकता… आपण ही पाक न वापरता केलेले मोदक चवीला सुद्धा अप्रतिम लागतात…
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ::२० मिनिटे
परिमाण::११ मोदक
