पनीर मोदक

by Vaishali Chaudhari
0 views

पनीर मोदक


प्रस्तावना:::

मोदकाचे प्रकार तर अनेक असतात त्यातल्या त्यात मावा मोदक खोबरा मोदक असे अनेक प्रकार आपण बघत असतो… घरगुती पनीर पासून तयार केलेल्या मोदक आपण बघणार आहे…


साहित्य ::

  • दोनशे ग्रॅम पनीर
  • अर्धा कप साखर
  • अर्धा कप मिल्क पावडर
  • काजू-बदामाचे काप
  • दोन चमचे साजूक तूप


कृती:::

सर्वप्रथम पनीर किसून घ्या किंवा घरी तयार केलेले असले तर ते मोडून घ्या… त्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून घ्या…

ते फिरवल्यानंतर चिकन होईल… त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तूप घाला त्यामध्ये आपण तयार केलेले पनीरचे मिश्रण घाला…

हे मिश्रण विरघळायला सुरुवात होईल त्यानंतर त्यामध्ये साखर किंवा पिठीसाखर घाला आता मिश्रण सतत ढवळत रहा त्यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर घाला…

मिश्रण आठ ते दहा मिनिटे आपल्याला परतावे लागेल मिश्रण अगदी मंद आचेवर परतायचे आहे… या मिश्रणाचा गोळा तयार होईपर्यंत आपल्याला परतायचे आहे..

हे मिश्रण साधारण कढईपासून वेगळे होईल आणि गोळ्या तयार होईल… गोळा होण्याची वाट झाले की त्यामध्ये काजू-बदामाचे काप घाला…

असल्यास तेच त्याची काम सुद्धा तुम्ही घालू शकतात आणि गॅस बंद करा… मिश्रण थंड झाले की मग मोदकाच्या साच्याला तूप लावा आणि त्यामध्ये पनीरचे जे आपण सारण तयार केलेले आहे …

ते घाला आणि मोदक तयार करून घ्या… साच्याला ज्यावेळेस आपण तूप लावतो त्यावेळेस सुद्धा आपण बदाम काजूचे काप लावू शकतो…

आणि वरून मग सारण घालू शकतो त्यामुळे बाहेरून छान बदामाचे काप दिसते आपली पनीर मोदक आता तयार झालेले आहेत!!!

पनीर मोदक अत्यंत चवदार लागतात… पनीर मोदक!!!!


टिप्स:::

यामध्ये तुम्ही केसर दुधाचा सुद्धा वापर करू शकतात मी इथे केलेला नाही केशर दुधामुळे मोदकांना पिवळसर रंग येतो..


वेळ व परिमाण::


तयारीची वेळ:: १०मिनिटे
एकूण वेळ::३० मिनिटे
परिमाण::११ मोदक

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

13362

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.