गणेशोत्सवासाठी सोपे आणि मऊ मावा मोदक | Instant Khoya / Mawa Modak Recipe | मावा मोदक

by Vaishali Chaudhari
44 views

मावा मोदक


प्रस्तावना::

चला गणपतीची आता सर्वांनाच आतुरता लागली आहे की आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे मोदक तयार करता येतील…

आणि मुलांना उत्सुकता असते मला कोणकोणते मोदक खायला मिळतील….मावा मोदक म्हटला म्हणजे मुलांना अत्यंत आनंद होतो…..

आजकाल मार्केटमध्ये नकली खवा जास्त विक्रीस येत आहे पण तो तुम्ही तपासून मगच घ्या… असली खवा थोडा पिवळसर असतो आणि त्याला दुधाचा सुगंध असतो… तर असाच आपण खवा घेऊ मोदक तयार करणार आहे…


साहित्य:::

  • 150 ग्रॅम खवा
  • 75 ग्रॅम पीठीसाखर
  • एक चमचा तूप
  • ५ काजू
  • ५ बदाम


कृती:::

सर्वप्रथम मावा घ्या… मावा घेऊन त्याचे व्यवस्थित तुकडे तोडून घ्या… कारण कधी कधी मावा फ्रीजरमध्ये कडक झालेला असतो…….

त्यामुळे पटकन विरघळण्यासाठी तो तुकडे करा… आता कधी गरम करून त्यामध्ये एक चमचा तूप घाला आणि त्यामध्ये खवा घाला…

खवा विरघळल्यानंतर त्याचा गोळा तयार होऊ द्या… कढीपासून गोळा वेगळा झाला की मग ते मिश्रण एखाद्या डिश मध्ये काढा…

त्यानंतर खव्याचे मिश्रण एकदम थंडगार होऊ द्या… मिश्रण एकदम थंडगार झाले की त्यामध्ये पिठीसाखर आणि काजू-बदामाचे काप घाला ….

आणि वेलची पूड घाला….

ही एक पद्धत झाली आहे…
तसेच दुसरी पद्धत म्हणजे ज्यावेळेस आपण खवा शिजवत असतो त्याच वेळेस पिठीसाखर आपण घालू शकतो…

खवा विरघळल्यानंतर त्यामध्ये पिठी साखर घाला आता हा खवा जवळपास घट्ट गोळा तयार होईपर्यंत सतत ढवळत रहा…

गोळा तयार झाल्यानंतर त्यामध्ये बदामाची आणि काजूचे काप घाला……. त्यानंतर तयार केलेले माव्याचे मिश्रण ताटामध्ये काढून घ्या की थंड होऊ द्या….

मोदकाच्या साच्यामध्ये खव्याचे सारण भरून मोदक तयार करून घ्या…. मोदकाच्या साच्यामध्ये सारण घालताना दोन्ही बाजूला थोडे थोडे बदामाचे काप घाला……

आणि मग सारण भरा म्हणजे आपल्या मोदकाला बाहेरून सुंदर असे बदामाची काप दिसतील…. आपली मावा मोदक तयार झालेली आहे…


टिप्स:::

ज्यावेळेस आपण खवा वितळवतो त्यावेळेस खव्याचे मिश्रणाचा गोळा हा थोडा मऊसर असावा एकदम कडक करू नये नाहीतर मोदक कडक होतात….


वेळ व परिमाण::


तयारीची वेळ :१०मिनिटे
एकूण वेळ :३०मिनिटे
परिमाण :११ मोदक

#UkadicheModak #ModakRecipe #EasyModakRecipe #GanpatiRecipe #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #SwaadGharcha

Recipees खालील लिंक्स वर click करून माहिती माहिती मिळवून घ्यावी.

  1. रवा मोदक किंवा सुजी मोदक
  2. मोतीचूर मोदक
  3. ड्रायफूट मोदक
  4. पान मोदक
  5. पनीर मोदक
  6. खुसखुशीत खोबरा मोदक
  7. चॉकलेट खोबरा मोदक
  8. गुलकंद खोबरा मोदक
  9. खोबरा मोदक
  10. पाकाचे काजूचे मोदक
  11. काजूचे मोदक
  12. उकळीचे मोदक
  13. मावा मोदक
  14. चॉकलेट मावा मोदक
  15. मावा गुलकंद मोदक
  16. ओरिओ बिस्कीट मोदक
  17. केसर मावा मोदक
  18. सुजी मोदक प्रकार 2
  19. रवा मोदक किंवा सुजी मोदक प्रकार 1

आपणास हा पोस्ट आवडली असल्यास जास्तीत जास्त share करा

ही रेसिपी करून पाहिल्यावर तुम्हाला कशी वाटली, हे आम्हाला खालील comment मध्ये लिहून नक्की कळवा. तसेच आपण हि ह्याच पद्धतीने भरीत बनविता काय ? आपण कोणत्या पद्धतीने बनविता ते हि कळवा

अशाच पारंपरिक, घरगुती आणि खानदेशी चवीच्या रेसिपीसाठी Swaad GharCha ला भेट देत राहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

5 comments

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

17493

Edtiors' Picks

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.