पाकाचे काजूचे मोदक
प्रस्तावना::
आजचे मोदक तयार करताना पाक कसा करायचा आणि गोळा कसा तयार होईल आणि तो गोळा कडक होईल का???
असे अनेक प्रश्न मनात येतात.. पण आज आपण या प्रश्नांचे उत्तर शोधणार आहे.. आणि सोप्या पद्धतीने पाकाचे काचेचे मोदक तयार करणार आहे…
साहित्य:::
- २०० ग्रॅम काजू
- 80 ग्रॅम साखर
- चांदीचा वर्क असल्यास
कृती:::
सर्वप्रथम काजू पाच ते सहा तास फ्रीजमध्ये ठेवा… म्हणजे ते कडक होतील… आता हे काजू मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे घालून थांबून थांबून फिरवा….
म्हणजेच सिम सिम वर फिरवा सतत मिक्सरला फिरवू नका… नाहीतर त्याला तेल सुटेल… अशा पद्धतीने सर्व काजू मिक्सरमध्ये फिरवून बारीक असे पूड करून घ्या…..
जाडसर वाटत असल्यास ती चाळणीमधील चाळून घ्या… आणि बाकीची जाड पुड पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून ती पुन्हा काढून घ्या…
एका पातेल्यामध्ये साखर घाला साखर ओली होईल इतपत फक्त पाणी घाला म्हणजेच आपल्याला फक्त साखर ओली करायची आहे ….
आणि ती सतत ढवळत रहा साखर वितळली की मग गॅस बंद करा… एका कढईमध्ये हा पाक घाला त्यामध्ये काजूचे पूड घाला …
[एक तारी पाक जर आपण बनवला तर आपल्याला पाकामध्येच काजू पावडर एकत्र करून लगेच त्याचा गोळा मळून घ्यावा लागेल…
हे मिश्रण शिजवण्याची गरज नाही परंतु एक तारी पेक्षा जरा कमीच पाक शिजवावा म्हणजे मिश्रण कडक होणार नाही……]
आता सर्व मिश्रण गोळा होईपर्यंत सतत ढवळत रहा ते कढईपासून वेगळे होईल वेगळे झाले म्हणजे समजावे की मिश्रण तयार झाले आहे…..
हे मिश्रण अगदी दोन ते तीनच मिनिटे परतावे लागते जास्त परतण्याची गरज नाही लगेचच गोळा तयार होतो….
त्या मिश्रणाचा गोळा तयार होतो त्यातील थोडसं गोळी करून बघा त्याची जर गोळी तयार झाली म्हणजे मिश्रण तयार झाले लगेचच ते ताटामध्ये थंड होण्यास ठेवा….
आणि मोदकाच्या साच्याला तूप लावून त्यामध्ये गोळा घालून त्याचे मोदक तयार करून घ्या… आपले पाकाचे काजूचे मोदक तयार झालेले आहे….
हे अत्यंत नरम होतील कडक होणार नाही… आपले पाकाचे काजूचे मोदक तयार!!
टिप्स:::
पाकात काजूची पूड घातल्यानंतर साधारण दोनच मिनिटे परता गोळा लगेचच तयार होईल त्यातील छोट्याशी गोळी हातावर तयार करून बघा गोळी तयार झाली म्हणजे आपल्या मिश्रण तयार झालेले आहेत गॅस लगेच बंद करायचा आहे…
वेळ व परिमाण:::
तयारीची वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ::३० मिनिटे
परिमाण::११ मोदक
