गुलाब जामुन मोदक

by Vaishali Chaudhari
2 views

गुलाब जामुन मोदक


प्रस्तावना:::

मोदक खूप प्रकारचे बघितले आहेत आपण आज आपण गुलाब जामुन मोदक बनवले ती पण खव्यापासून अगदी छान असे मोदक आपले तयार होतात…


साहित्य:::

125 ग्रॅम खवा 40 ग्रॅम मैदा 150 ग्रॅम साखर दोन वेलची करण्यासाठी तू प


कृती:::

सर्वप्रथम खवा चांगला मिक्स करून घ्या… त्यातील गाठी मोडून घ्या.. हाताच्या साह्याने तो चांगला स्मॅश करा…

हाताच्या तळव्याने तो मऊ करा… त्यानंतर त्यामध्ये 40 ग्रॅम मैदा घाला आणि व्यवस्थित गोळा तयार करा…

त्यानंतर मोदकाच्या साच्याला साजूक तूप लावून मोल्डमध्ये मोदकाचा आकार द्या.…या पद्धतीने 11 मोदक तयार करून घ्या…

अकरा मोदक तयार झाले की मग… एका पातेल्यामध्ये साखर घाला त्यामध्ये अर्धा ग्लास इतके पाणी घाला….

त्यानंतर त्यामध्ये आपण दोन वेलचींचे पूड घालणार आहे… आणि एकतारी पाक तयार करून घ्या… पाकाचा गॅस बंद करा त्यानंतर कढईमध्ये तूप घाला…

तूप गरम झाल्यानंतर त्यानंतर आपण तयार केलेले खव्याचे मोदक तळून घ्या…. त्यानंतर हे तळलेले मोदक पाकामध्ये घाला…

मोदक तयार करत असताना मोदक फुल्यामुळे मोदकांचा जो आकार असतो तो तळल्यानंतर पाकामध्ये घातल्यानंतर बदलून जातो ……

त्यामुळे सुरीच्या साह्याने तुम्ही आपण ज्या कळ्या पडल्या आहेत त्या सुरीच्या साह्याने दाबून घेऊ शकता म्हणजे जेणेकरून जो आकार आहे तो पूर्ववत येईल….

पाक मुरल्यानंतर एक ते दोन तासानंतर पाकातून मोदक वेगळे करून घ्या… आपले गुलाबजाम मोदक तयार झालेले आहे…


टिप्स:::

खव्यामध्ये मैद्याचे प्रमाण अगदी योग्य घालावे तुमचा कवा पाव किलो असल्यास त्याला 125 ग्रॅम इतका मैदा वापरायचा आहे….

तसेच तुमचा खवा एक किलो या प्रमाणामध्ये असल्यास त्यामध्ये पाव किलो इतका मैदा घालायचा आहे… म्हणजे तुमचे गुलाबजाम मोदक विरघळणार नाही किंवा तेलात वितळणार सुद्धा नाही एकदम उत्तम असे गुलाबजाम मोदक तयार होतील….


वेळ व परिमाण:::


तयारीची वेळ::२० मिनिटे
एकूण वेळ:: ४०मिनिटे
परिमाण::११ मोदक

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

13987

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.