फ्रेंच फ्राईज बटाटा काप भाजी

by Vaishali Chaudhari
233 views

फ्रेंच फ्राईज बटाटा काप भाजी


प्रस्तावना:

फ्रेंच फ्राईज बटाटा का भाजी स्पेशली लहान मुलांसाठी बनवलेली भाजी आहे रोजच्या डब्यामध्ये लहान मुलांना नवीन नवीन भाजी हवी असते. कमी साहित्यात झटपट होणारी भाजी.

साहित्य :

फ्रेंच फ्राईज बटाटा काप भाजी
  • दोन बटाटे,
  • पाव टीस्पून तिखट ,
  • मीठ ,
  • तेल ,
  • जिरे,
  • कोथिंबीर ,
  • फ्रेंच फ्राईज काप करण्याचे यंत्र


कृती:

प्रथम बटाटा सोलून घ्या बटाटा धुऊन घ्या. धुतल्यानंतर फ्रेंच राईसच्या यंत्रातून काप करून घ्या.

एका कढईत तेल गरम करून घ्या त्यात जिऱ्याची फोडणी घाला फोडणी घातल्यानंतर त्यात बटाट्याचे काप घाला.

त्यामध्ये पाव चमचा तिखट घाला ते चांगले परतवून घ्या त्यावर झाकण ठेवून पाच मिनिटे चांगली शिजवून घ्या.

अधून मधून झाकण उघडून बटाट्याचे काप अल्टी पलटी करा बटाट्याचे काप शिजल्यानंतर त्यात चवीप्रमाणे मीठ घाला .

हे बटाट्याचे काप अत्यंत खरपूस होतात. त्यावर चिरलेली कोथिंबीर घाला .

फ्रेंच फ्राईज बटाटा काप भाजी – फोटो 2

आता आपली फ्रेंच फ्राईज बटाट्याचे काप भाजी तयार आहे. ही भाजी फुलक्या सोबत किंवा चपाती सोबत खाऊ शकतात.

फ्रेंच फ्राईज बटाटा काप भाजी – फोटो 3

टिप्स :

बटाटे कापताना ते लांब (फ्रेंच प्राईज च्या शेपमध्ये) कापावे, लांब कापल्याने मुलांना खाण्यामध्ये आवड निर्माण होते.


वेळ व परिमाण:


तयारीची वेळ :१०मिनिटे
एकूण वेळ :२०मिनिटे
परिमाण :१ मुलासाठी

लहान मुलांसाठी फ्रेंच फ्राईज बटाटा काप भाजी

रोज डब्यात तीच भाजी नको वाटते, तेव्हा ही भाजी चांगला बदल आहे. बटाट्याचे फ्रेंच फ्राईजसारखे काप केल्यामुळे मुलं आवडीने खातात. साहित्य कमी आणि वेळही कमी लागतो.

बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • काप केल्यानंतर बटाटे धुऊन पाणी निथळू द्या; ओले काप कढईत चिकटू शकतात.
  • मध्यम आचेवर झाकण ठेवून शिजवा आणि मधूनमधून झाकण उघडून काप हळूवारपणे उलटा-पालटा करा.
  • मीठ शेवटी घाला, म्हणजे काप जास्त पाणी सोडत नाहीत.
  • मुलांसाठी तिखट कमी ठेवा.

कशासोबत खावा

फुलके किंवा चपातीसोबत ही भाजी छान लागते. डब्यासाठीही सोयीची आहे.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

फ्रेंच फ्राईज काप करण्याचं यंत्र नसेल तर?

सुरीने बटाट्याचे साधारण सारख्या जाडीचे लांब बोटांसारखे काप करता येतात.

काप खरपूस कसे होतील?

मध्यम आचेवर शिजवा, जास्त ढवळू नका आणि कढईत जास्त गर्दी करू नका.

भाजीत आणखी काय घालू शकतो?

चवीसाठी थोडा चाट मसाला किंवा किसलेलं चीज वरून घालता येतं.

You may also like

1 comment

स्पायसी झणझणीत तोंडाला तिखट चव आणणारा आलू मसाला - swaadgharcha.com October 2, 2026 - 12:20 pm

[…] उपासाची बटाट्याची भाजी फ्रेंच फ्राईज बटाटा काप भाजी […]

Reply

Leave a Comment

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.