कांदा करोड्याची कोरडी भाजी

by Vaishali Chaudhari
0 views

कोरडी कांदा करोड्याची कोरडी भाजी


प्रस्तावना::

करोड किंवा सांडगे हे पारंपरिक वळवण्याचा पदार्थ आहे हे करोडे वर्षभरासाठी करून ठेवलेले असतात… करोडे बनवण्याची पद्धत मी दाखवलेलीच आहे .;….

त्यासाठी काय काय साहित्य लागते तेही दाखवलेले आहे…. याची छान कांदा करण्याची भाजी केली जाते.. आपण ती आज बघणार आहे.. ज्यावेळेस आपण रस पोळी बनवतो त्यावेळेस सोबत भाजी म्हणून तोंडी लावण्यासाठी किंवा सोबत खाण्यासाठी करोड्याच्या भाजीचा वापर केला जातो…


साहित्य::

  • एक वाटी कोरडे करोडे किंवा सांडगे
  • दोन कांदे
  • कोथिंबीर
  • पाच ते सहा हिरव्या मिरच्या
  • सात ते आठ लसूण पाकळ्या
  • मोहरी जिरे
  • अर्धा चमचा धनापूर
  • पाव चमचा हळद
  • एक चमचा तिखट
  • पाव चमचा गरम मसाला
  • चवीप्रमाणे मीठ
  • फोडणीसाठी तेल


कृती::

सर्वप्रथम सांडगे एका भांड्यामध्ये काढून थोडे कुटून घ्या.. जास्त बारीक तुकडे करायचे नाही नाहीतर भाजीचा गचका होईल…

मिरच्यांचे काप करून घ्या लसणाच्या सुद्धा काप करून घ्या… एका कढईमध्ये कडकडीत तेल गरम करा.. कढई मध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरीची फोडणी घाला.

त्यानंतर त्यामध्ये चिरलेले लसूण मिरचीचे काप घाला आणि परतवून घ्या… हे परतल्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा चांगला तांबूस रंग येईपर्यंत परतवून घ्या…

कांद्याला तांबूस रंग आल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा तिखट अर्धा चमचा धना पूड पाव चमचा गरम मसाला घालून भाजीचा मसाला व्यवस्थित परतवून घ्या..

साधारण दोन ते तीन मिनिटे मसाला परतल्यानंतर त्यामध्ये करोडे किंवा सांडगे घाला.. ही सुद्धा साधारण दोन मिनिटे तेलावर परतून घ्या…

त्यानंतर एका पातेल्यामध्ये एक ग्लास इतके गरम पाणी करून घ्या.. गरम उकळते पाणी झाल्यानंतर आपल्या करोड्यांच्या भाजीमध्ये घाला..

भाजीवर झाकण ठेवा.. अधून मधून भाजी एकत्र करून घेत जा.. त्यानंतर त्यावर झाकण ठेवा.. आणि पाच ते सहा मिनिटे भाजी शिजू द्या…

करोडे बाहेर काढून बघा करोडे शिजले का हाताने दाबून बघा.. त्यानंतर या भाजीमध्ये चवीप्रमाणे मीठ घाला… लगेच चिरलेली कोथिंबीर घाला…

त्यानंतर पुन्हा एक दोन मिनिटाची वाफ येऊ द्या… आणि भाजीचा गॅस बंद करा आपली करोड्यांची भाजी तयार झालेली आहे..

ही भाजी तुम्ही आमरस सोबत खाऊ शकतात…. किंवा कधी भाजी नसल्यास भाजी चपाती सुद्धा खाऊ शकतात….

यामध्ये कांद्याचा वापर आपल्याला जास्त केलेला आहे… या भाजीला कांदा करोड्याची भाजी म्हटले जाते….

तर आज आपण आपल्या आजीच्या बटव्यातील कांदा करोड्याची भाजी बघितली तुम्ही नक्की बघ करून बघा…. आता आपण एन्जॉय करूया गरमागरम कांदा करोड आमरस आणि पोळी….


टिप्स:::

करोड्याची भाजी करताना भाजी शिजली की नाही हे बघण्यासाठी एक करोड्याचा तुकडा बाहेर काढून हाताने चेपून बघा भाजी शिजली नसल्यास पुन्हा दोन ते तीन मिनिटे झाकण ठेवून भाजी वाफवून घ्या… झाकण ठेवल्यामुळे भाजी पटकन शिजते…


वेळ व परिमाण:::
तयारीची वेळ:१० मिनिटे
एकूण वेळ :३०मिनिटे
परिमाण :दोन व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

8175

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.